दिनांक : २६-२७ जुलै २०१०
अंतर : ६१ किमी
तालुका : पन्हाळा / शाहुवाडी, जिल्हा : कोल्हापूर
मोहिमप्रमुख : अमित मेंगळे, मुंबई
सहभागी सदस्य : ६८
बाजींच्या शौर्याला आणि असिम त्यागाला वंदन करण्यासाठी आम्ही सलग 15 वर्षांपासून आषाढ
वद्यप्रतिपदेला पावनखिंडीत नतमस्तक होण्यास जात आहोत पण या वर्षी त्या अजरामर रणसंग्रामाला
३५० वर्ष होणार होती. महाराज आणि त्यांच्या शूर मावळयांनी कुठच्या परिस्थितीत रात्रीचं
खडतर मार्गव्रत्र्मण केलं असेल, याचं प्रचंड कुतूहल पूर्वीपासून मनात होतं. आणि या
कुतूहलातून 'पन्हाळगड ते पावनखिंड ते विशाळगड पालखीसह पदभ्रमण मोहिम' सुचली. ३५० वर्षांपूवी
ज्या दिवशी आणि ज्या प्रहरी महाराजांची पालखी पन्हाळ्याहून निघाली तोच इतिहास आपण जिवंत
करायचा या ध्येयाने आम्ही झपाटले गेलो. आणि त्या दृष्टीने तयारी सुरु झाली. आतापर्यंतचे
ट्रेकिंगमध्ये जमलेल्या मित्रांनी सुद्धा कल्पना उचलुन धरली. काहीजण येउ शकणार नव्हते
त्यांनीही हर तर्हेंची मदत करण्याचे कबूल केले. हजारो जणांना फोन, ईमेल्सच्या माध्यमातून
सदर मोहिमेचा प्रचार केला गेला. एक महिना झटून मोहिमेची तयारी पूर्ण केली. अखेर २५
जुलै रात्री १० वाजता ८० शिवरायांचे मावळे मुंबई, ठाणे, पनवेल, पुणे., नाशिक, अमरावती
येथून पन्हाळगडाकडे रवाना झाले. करवीर नगरीत आगमन झाल्यावर महालक्ष्मी मातेला मोहिम
यशस्वी करण्याचे साकडे घालून सकाळी 8 वा. पन्हाळगडावर पोहोचलो. चहा नाष्ता घेऊन ताजे
तवाने झाल्यावर शिवाजी महाराजांचे जास्तीत जास्त वास्तव्य असलेल्या पन्हाळ्याचे दर्शन
करायला बाहेर पडलो. स्थानिक मार्गर्शक हनीफ नगारजीने गडाचे सर्व बारकावे दाखवून दिले.
काही दिमाखात तर काही कोसळलेले अवशेष इतिहासाची साक्ष देत होते. पावनखिंडीचा रणसंग्राम
शिवाकाशिच्या बलिदानाने सुरु होऊन बाजीप्रभू आणि त्यांच्या 300 बांदल वीरांच्या बलिदानाने
समाप्त होतो.
सायंकाळी या ऐतिहासिक मोहिमेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपर्याातून आलेल्या सर्व मावळ्यांची
एकमेकांशी ओळख झाली. शिवप्रेमातून पालखीचे भोई व्हायचंय हेच उत्तर सर्व मावळ्यांकडून
मिळत होते. ८० मावळ्यांमध्ये ७ महिला, २ वर्षांची छोटी राज्ञी, १२ वर्षांचे शंतनु आणि
अजिंक्य हे शालेय वि़द्यार्थी तसेच ७६ वर्षांचे तरुण वामन कदम असा सर्व वयोगटातील मावळ्यांचा
सहभाग होता. जेवणाची वेळ झाल्यावर सर्वांनी जेवण घेतले. मोहिमेची वेळ समीप येत होती.
एक अनामिक दडपण मोहिम प्रमुखासकट उर्वरीत सर्व सदस्यांवर स्पष्ट दिसत होते. कारण अशी
मोहिम आज पर्यंत कोणीही केली नव्हती. सर्वांना मोहिमेत येणारे संभाव्य धोके, शारिरीक
इजा याची स्पष्ट कल्पना आम्ही दिली. नवख्या सस्यांनी रात्रीच्या मोहिमेत उतरु नये,
दिवसा उतरावे असा सल्ला दिला. पण शिवप्रेमाने झपाटलेल्या मावळ्यांनी प्रेमाचा सल्ला
तितक्याच प्रेमाने धुडकावला. कसलाही धोका पत्करायची आणि स्वतः मुळे मोहिमेत अडथळा येणार
नाही याची स्पष्ट ग्वाही दिली. मावळ्यांच्या उत्साहामुळे मोहिम यशस्वी होणार हा आत्मविश्वास
आमचा दुणावला. पन्हाळ्याचे नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, माजी नगराध्यक्ष विजय पाटील स्वतः
मोहिमेला शुभेच्छा देण्यासाठी आले होते. युद्धाला निघालेल्या सैन्याचे वातावरण पन्हाळगडावर
पसरले होते. ठीक १०वा. शिवाजी महाराजांची पालखी किशोर खेडेकर आणि अमित मेंगळे यांनी
उचलली, आणि छत्रपति शिवाजी महाराज की जय या गगनभेदी घोषणांनी रात्रीचा पन्हाळगड दुमदुमून
गेला. पालखी बाजीप्रभूंच्या पुतळ्यापाशी पोहोचली. बाजींना वंदन केलं गेलं. पालखी राजदिंडीमार्गे
विशाळगडाकडे रवाना झाली. मिट्ट काळोख, धुक्याचा जाड पडा, आडवा तिडवा झोडपून काढणारा
पाऊस या सर्व संकटांशी मुकाबला करत महाराजांची पालखी मार्गक्रमण करत होती. तुरुकवाडी,
म्हाळुंगे गावं पार करत ११ कि.मी. लांब पसरलेल्या म्हसाई पठारावर पोहचलो. दिशेचा काहीच
अंदाज लागू न देणं हे या पठाराचे वैशिष्ट्य. पठार त्याच्या स्वभावधर्माला जागत होतं.
तरीही इतक्या वर्षांच्या अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्याने परिस्थितीवर मात करत पालखी
पुढे सरकत होती.
कुंभारवाडी, खोताचीवाडी, धनगरवाडा, मांडलाईवाडी पार करत सकाळी 5.30वाजता आंबेवाडीचे
निलगीरीचे जंगल लागले. रात्री 10 वा. निघालेले मावळे जराही न थांबता 30कि.मी. पार करुन
सकाळी 5.30वा. उजाडल्यावरच थांबले. गूळ शेंगाण्याचे लाडू, सुका खाऊ असा 10 मिनिटे अल्पोपाहार
झाला आणि मोहिम नव्या उत्साहाने निघाली. आता आसमंतात प्रभा फाकली होती. विविध पक्षांचे
नामधूर संगीत सुरु होते. पाणवठ्यावर निघालेल्या माय भगिनी आश्चर्याने आमच्याकडे बघत
होत्या. शेतावर निघालेले शेतकरी आमची चौकशी करुन आमचे कौतुक करत होते. रिंगेवाडी, कळकवाडी,
पाटेवाडी पार करत आम्ही घनादाट जंगलात शिरलो. वाटेत आडवी आलेली झाडी झुडपे बाजूला सारत
पालखी नेणं कष्टाचं जात होतं. पण त्याबद्दल कोणाची काहीच तक्रार नव्हती, पालखी आणि
त्यातील महाराजांच्या मूर्तीला झाडा झुडूपांची इजा पोहचू नये म्हणून सर्व मावळे पालखीची
काळजी घेत पुढे सरकत होते. जंगलातल्या ओढ्याने आज रौद्र रुप धारण केलं होतं. आमच्याकडे
मोठा रोप असल्यामुळे आम्ही ओढा पार करु शकलो. दुपारी 12.30 वा. म्हसवडे गावात आलो.
आता थोड्याच वेळात आम्ही डांबरी रस्त्याला लागणार होतो. काल रात्रीच्या मार्गावरचे
अनेक अडथळे आमच्या डोळ्यासमोरुन सरकत गेले. पांढरपाणीगावात आलो. आमचे उर्वरीत मावळे
ज्यात महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांचा समावेश होता ते सर्वजण पालखी खांद्यावर
घेण्यासाठी पुढे सरसावले. आता सर्व ८० मावळे पावनखिंडीच्या रोखाने निघाले. सर्व पांढर्या
झब्ब्यातील मावळे, प्रत्येकाच्या हातात भगवे ध्वज आणि पुढे दिमाखात जाणारी पालखी असा
प्रत्यक्ष शिवशाहीचा माहोल तयार झाला होता. पालखी पावनखिंडीत पोहचली. बाजींच्या रक्ताने
पावन झालेल्या भूमीतील माती सर्व मावळ्यांच्या कपाळी लावली गेली. तत्क्षणी सर्वांच्या
डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या होत्या. एवढ्या पवित्र ठिकाणी येऊन आपण पोहचलो, एक इतिहास
जिवंत केला. अगदी ३५० वर्षांपूर्वी घडला होता तसाच. सर्वजण बाजींच्या स्मारकापाशी नतमस्तक
झाले. वीररसात्मक गाणी, पोवाडे गगनभेदी आवाजात म्हटले गेले. नाशिकचे डी डी पाटील सरांनी
शिवबांचा गोंधळ सार वेत्र्ला, शिवस्तुती म्हणालो. ८० मावळयांचा तोंडून महाराष्ट्रगीत
खडया आवाजात गायले गेले आणि २ मिनिटे स्तब्ध उबे राहून त्या ज्ञात अज्ञात वीरांना मानाचा
मुजरा वेत्र्ला गेला. अतिवृष्टीमुळे विशाळगडाकडे जाणारे सर्व मार्ग पाण्याखाली गेले
होते. पुढील गावांचे संपर्वत्र्च तुटले होते. त्यामुळे मोहिमेची पावनखिंडीतच सांगता
झाली. आपल्या शूर पूर्वजांना अभिप्रेत असलेल्या मार्गाने आरांजली वाहून सर्व मावळे
धन्य झाले. एका ऐतिहासिक क्षणाचे आपण साक्षीार ठरलो ही आयुष्यभर सुखावणारी घटना या
८० मावळ्यांच्या आयुष्यात घडली होती.
पावनखिंडीच्याबाहेरील भाततळीगावांतील शाळेत गोष्टीची पुस्तके, पेन्सील, पट्टया, रबर
असे शैक्षणिक साहित्य दिले गेले. तसेच ती शाळा इयत्ता सातवी पर्यंतच असल्यामुळे आठवी
पासून मुलांना दूरच्या शाळेत जावे लागते. त्यासाठी २०१० या वर्षात इयत्ता सातवीतून
पहिला आलेल्या एका मुलाला आणि पहिली आलेल्या एका मुलीला सायकल बक्षिस दिली गेली. हे
सर्व शैक्षणिक साहित्य संस्थेचे हितचिंतक सुरेश राणावत, अभिजीत तांबे, शार्दुल खरपुडे,
रवी भोसले यांनी पुरवले. शिवशौर्य ट्रेकर्स इतिहासाबरोबर सामाजिक बांधिलीकीसुद्धा जिवंत
ठेवण्यास नेहमीच कटीबद्ध असेल.
सदर मार्गावर अनेक संस्थांनी, व्यक्तींनी अनेक वर्षे पभ्रमण केले, काही अंतरापर्यंत
पालखी सुद्धा नेली. पण आषाढपोर्णिमेच्या दिवशी रात्रीच्या त्याच प्रहरी पालखी पावनखिंडीत
नेणारी शिवशौर्य ट्रेकर्स संस्था ही पहिली संस्था ठरली. शिवशौर्य ट्रेकर्सने इतिहास
रचताना स्वतः एक इतिहास घडवला.
दिनांक : २-३ ऑक्टोबर २०१०
तालुका : भोर जिल्हा : पुणे
मोहिमप्रमुख : अमित मेंगळे, मुंबई
सहभागी सदस्य : १५
ट्रेकिंगच्या परंपरे प्रमाणे शुक्रवार रात्री शिवशौर्य ट्रेकर्स पाठीवर स्याक चढवून
मुंबईहून एस टी लाल डब्याने भोरला निघालो. पहाटे ५ वा. भोर पोहचलो. डेपोत सर्व आटपून
घेतले. छोटा टेम्पो आधीच ठरवला होता. आमचा प्रवास रोहिड्याच्या दिशेने सुरु झाला. बाजारवाडी
गावात पोहोचलो आणि आमचा ट्रेक सुरु झाला. साधारण तासाभराने आम्ही रोहिडा किल्ल्यावर
होतो. मुख्य दरवाज्याला शिवप्रेमी संस्थेने जुन्या दरवाजाचा look असलेले दार लावले
आहे. पहिल्या प्रवेश द्वारावर गणेश पट्टी मिह्रब आहे. दुसऱ्या द्वारातून आत गेल्यावर
सिंह आणि शरभ यांची शिल्पे आहेत. पाण्याचे टाके आहे त्यात १२ महिने गार पाणी असते.
तीसऱ्या द्वारावर अर्ध हत्तीचे शिल्प आहेत. या तिन्ही दरवाज्यातून आत गेल्यावर रोहीडमल्लाचे
मंदिर नजरेस पडते. गडाला एकूण सहा बुरुज आहेत. शिरवले, पाटणे, दामगुडे, वाघजाई, फत्ते
आणि सदरेचा बुरुज. गड प्रदक्षिनेत कोरीव टाक्या नजरेस पडतात. हे सर्व पाहण्यात आणि
पोट पूजा करण्यात गडावर २ तास गेले. गड उतरून गाडीत जावून बसलो. आता मोर्चा कान्होजी
जेध्यांच्या घरी वळवला. राईरेश्वरला जाताना वाटेत कान्होजींचे कारी गाव लागते. आता
त्यांची चौदावी पिढी त्याच घरात राहते आहे. आम्ही सर्वांनी जेध्येंची तलवार हात घेऊन
बघितली. त्यांचे चिलखत आहे अजून, तेही बघितले. ट्रेक संपण्यापूर्वीच ट्रेक सार्थकी
लागला होता.
आता रायरेश्वरला मुकाम्माला जायचे होते. वाटले होते कोरले गावापर्यंत गाडी प्रवास आहे.
पण टेम्पो मालक अरुण भंडारी आमच्या पेक्षा उत्साही होता. त्याने रायरेश्वराच्या शिडी
पर्यंत गाडी आणून उभी केली. असा adventures प्रवास करणे नशिबात होते. हा प्रवास कायम
स्मरणात राहील. रायरेश्वर पठारावरील गोपाल जंगम यांच्या घरी आम्ही आमचा डेरा टाकला.
दुपारचे जेवण मग विश्रांती आणि मग प्रसिध्द रायरेश्वरच्या शिव मंदिरात गेलो. शिवबाने
स्वराज्याची शपथ इथेच घेतली होती. नतमस्तक झालो त्या पवित्र वास्तूत. संध्याकाळ झाली
होती. सोनकी फुलांचा गालीचा पठारावर पसरला होता. संध्याकाळच्या सरत्या उन्हात पठार
अवर्णनीय दिसत होते. सकाळी उठून सर्व आटपून केंजळ गडाकडे सरकलो. वास्तविक रायरेश्वरला
लागूनच केंजळ आहे. एकाच सोंडेवरून चालत चालत केंजळच्या खोदीव पायरया पर्यंत आलो. पायरया
एकसंघ कातळातून खोदून काढल्या आहेत. गडावर एकाच वस्तूचा अवशेष उरला आहे. आकारानेही
किल्ला लहान असल्यामुळे गड चक्कर लगेच आटपून आम्ही उतरायला घेतले. कोरले गावात येवून
वाहत्या पाण्यात झोकून दिले. दुपारची ST आली आणि आम्ही मार्गस्थ झालो.
दिनांक : ५-६ डिसेंबर २०१०
तालुका : बागलाण जिल्हा : नाशिक
मोहिमप्रमुख : पाटील सर डी. डी.,नाशिक
सहभागी सदस्य : १९
मुंबई, नाशिकचे शिवशौर्य ट्रेकर्स मनमाड स्टेशन येथे भल्या पहाटे जमलो. मोहीम प्रमुख
पाटील सरांच्या घरी न्याहारी करून आम्ही साल्हेर कडे प्रस्थान केले. वाघांबे गावातून
आम्ही १० वा. गड चढण्यास सुरु केला. ९०% राजमार्गच आहे. मुख्य दरवाजा चांगल्या अवस्थेत
आहे. गडावर गंगासागर तलाव आहे. पृथ्वी दानासाठी श्रीपरशुरामाने केलेल्या यज्ञभूमीचे
गंगासागराजवळ असलेल्या यज्ञकुंड आणि यज्ञस्तंभ यामुळे घडते. हे सर्व पहात दुपारी २
वा. परशुराम मंदिरात म्हणजेच गडाच्या सर्वोच्च ठिकाणी पोहोचलो. साल्हेर हा महाराष्ट्रातील
सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. मंदिरा बाहेर विसावलो. किल्ल्याचा इतिहास वाचून
दाखवण्यात आला. पोटपूजा झाली आणि गड उतरायला घेतला. रात्रीचा मुक्काम आदिवासी आश्रम
शाळेत केला. इथला पट्टा प्रामुख्याने आदिवासी बहुल आहे. शिक्षणा पासून आदिवासी मुले
वंचित राहू नयेत यासाठी सरकारी खर्चाने त्यांच्या मोफत निवासाची, तसेच राहण्याची सोय
झाली आहे.
सकाळी चहा नाश्ता घेऊन आम्ही आश्रम शाळेचा निरोप घेतला. मुल्हेर गावात आलो. एका हॉटेलात
दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही मुल्हेरच्या पायथ्याशी गेलो. ट्रेक सुरु झाला.
मुल्हेर किल्ल्याचे मुल्हेर माची आणि बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. पायथा ते माची
दाट झाडातून पाउल वाट जाते. संपूर्ण माची गर्द झाडीने आच्छादलेली आहे. दरवाज्यातून
प्रवेश कर्ते झाल्यावर समोर नजरेस पडतो आणि नजरेत भरतो तो म्हणजे मोती तलाव. तलावा
शेजारी गणपतीचे मंदिर तर अगदी फोटोग्राफिक. तिथून बालेकिल्ल्याच्या दिशेने गेल्यावर
चंदनबाव विहीर, श्रीराम व सोमेश्वर मंदिरे पाहण्यास मिळाली. निसर्ग रम्य परिसर आहे
हा सर्व. आम्ही बालेकिल्ल्यावर जाण्यास निघालो. जशी चढण चालू झाली तशी थंडगार झाडातून
आम्ही उन अंगावर घेत मोठ्या दगड धोंड्यामधून वर चढत होतो. पायवाट नव्हतीच ती. वरचे
मोठे दगड ढासळून खाली आले आहेत. घळीतून वर आल्यावर डाव्या बाजूस छोटासा किल्ला आहे
तो म्हणजे मोरा किल्ला. मोरा किल्ल्याचे दर्शन लवकर आटपले. वरच्या सोंडेवरून मुल्हेरच्या
बालेकिल्ल्यावर पोहचलो. तांब्याचा मुखवटा असलेले भडंगनाथाचे उघडे मंदिर आहे. आटलेले
पाण्याचे टाके आहे. बालेकिल्ल्यावरून बागलाण परिसर न्याहाळता येतो. आता आम्ही परतीच्या
मार्गाला लागलो. उतरताना आम्ही दुसर्या वाटेने म्हणजे बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजातून
उतरायला घेतले. खोदीव पायऱ्या अंदाजे १ फुट उंचीच्या असतील. पायथ्याशी यायला साधारण
तास लागला. मुल्हेरचा निरोप घेऊन आम्ही मुल्हेर गावात आलो. या ट्रेक मध्ये आमचा फक्त
सालोटा राहिला. बाकी ट्रेक यशस्वी झाला
दिनांक : मार्च २०११
तालुका : पाटण, सातारा जिल्हा : सातारा
मोहिमप्रमुख : अमित मेंगळे, मुंबई
सहभागी सदस्य : २३
४ किल्ल्यांची भटकंती २ दिवसात शक्य आहे का? अशी शंका ट्रेकला येणाऱ्या प्रत्येकला
होती. पण थोडे नियोजन केले तर हे शक्य आहे, हे सगळ्यांना पटले. रात्री १० वा. मुंबईहून
निघालो. पुण्यातून काही जणांना बरोबर घेऊन आमची बस सकाळी ७ वा. सातार्यातील बामणोली
येथे पोहचली. सर्व आन्हिक उरकून आणि वन विभागाचे सोपस्कार पार पाडून आम्ही वासोटा किल्ल्याकडे
घेऊन जाणार्या बोटीत बसलो. १ तासाने हि बोट मेट इंदवली नामक कोयना जलाशयाच्या एका टोकाला
पोहचवते. बोट चालकाला साधारण दुपारच्या सुमारास परतीसाठी घ्यायला येण्याचे सांगून आम्ही
ट्रेक सुरु केला. जिथून चढ सुरु होतो तिथे हनुमानाची मूर्ती आहे. इथे पूर्वी गाव वसलेलं
होते. कोयना धरण बांधले गेले आणि हि जमीन पाणलोट क्षेत्राखाली आली. तांबी, मेट इंदवली
नामक आणि अशी अनेक गावांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर हे क्षेत्र वन्य प्राण्यांसाठी
संरक्षित करण्यात आले. असा हा जंगल परिसर. १.५ तासाने आम्ही वासोटा किल्ल्यावर पोहचलो.
तेव्हांच डोक्यावर उन आले. आता पर्यंत संपूर्ण चढण दाट झाडातून चढलो होतो. किल्ला छोटा
आहे. मोजकेच अवशेष शिल्लक आहेत. जंगल ट्रेकिंगचा आनंद मिळावा म्हणून ट्रेकर्स इथे येतात.
दुरवर नागेश्वरची गुहा दिसत होती. वेळ असता तर तिथेही जाण्याचा इरादा होता. पण वेळेअभावी
शक्य नव्हते. वासोट्याहून कीमान एक तास लागतोच नागेश्वरला जायला. तिथे एक स्वयंभू शकरांची
पिंडी आहे भल्या मोठ्या गुहेमध्ये. महाशिवरात्रीला तिथे गर्दी उसळते, पण उर्वरीत वर्षभरात
फक्त ट्रेकर्स मंडळी आणि खाली कोकणातून क्वचित गावकरी वर येतात. नागेश्वर पुन्हा कधीतरी
म्हणून आम्ही वासोटा उतरायला घेतला. मेट इंदवली येथे बोट पोहचतच होत्या. 4.45 वाजले
होते. बामणोली किनार्याघवर यायला 6 वाजले. किनार्या4वर सुर्यास्ताच नजारा मनात, वॅत्र्मेरात
टिपत आम्ही चहा फराळ उरकला. काळोख पडला होता. आता आम्ही सज्जनगडाकडे कुच केले. रात्री
8.30 वा. सज्जनगडाचे रवाजे बंद होतात, ते थेट सकाळी उघडतात. आम्ही 8.30 वाजण्याच्या
काही मिनिटेच अगोर गडावर दाखल झालो. समर्थ रामदास स्वामींचे प्रदीर्घ निवास या गडावर
होता. त्यामुळे रामदास स्वामी सेवा संस्थेतर्फे इथे प्रसाद आणि निवासाची सोय उपलब्ध
आहे. या सेवेचा लाभ आम्ही घेतला. स्वच्छ आंघोळ करुन प्रसदाचे जेवण घेतले आणि पहाटे
सुर्योदयाच्या आधी उठण्याचा निश्चय करुन झोपी गेलो. दुसर्याज विशी पहाटे सर्वच 5 ला
उठलो. सर्व आवरुन गड फिरायला बाहेर पडलो. प्रभा फाकली होती. बघता बघता लाल तेजाचा गोळा
वर आला आणि संपूर्ण सातारा परिसर सोनेरी उन्हाने लखाखला. मंदिरात जाऊन समर्थांचे दर्शन
घेतले. आणि सामान पाठीवर चढवून गड उतरुन खाली आलो. बस अंजिक्यतारा किल्ल्याकडे नेली.
ऐन सातारा शहरात असलेला हा किल्ला. सातारकरांच्या मॉर्निंग वॉक, जॉगींगचे केंद्र बनला
आहे. रोज शहरातून अजिंक्यतारावर येऊन व्यायाम होत असेल तर माणूस फिट राहीलच. असे भाग्य
मुंबईकरांच्या नशिबी नाही. किल्ल्याचा घेर कमी असल्यामुळे जास्त वेळ गेला नाही. मंगळाई
मातेचे मंदिराच्या गाभार्या त बसून आम्ही नाश्ता उरकला. किल्ल्याचे, किल्ल्यावरुन दिसणाार्यार
सातारा शहराचे आणि आमचे फोटोसेशन करुन आम्ही बस मध्ये जाऊन बसलो. आता जायचे होते नांदगिरी
उर्फ कल्याणगड किल्ल्यावर. शहरातूनच बस जरंडेश्वरच्या दिशेने निघाली. शाधारण तासा दीड
तासाने आम्ही नांदगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी आलो. उन टरारल होते आणि किल्ल्याची चढण
पूर्ण बोडकी होती. 45 मिनिटात किल्ला सर झाला. उन्हात तापलो होतो. किल्ल्यावर जाऊन
मोठ्या वडाच्या सावलीत विसावलो. किल्ल्याची माहीती सांगितली गेली. लांबवर दिसणारे अजिंक्यतारा,
सज्जनगड, चंदन, वंदन किल्ले वॅत्र्मेरात टिपले. थोडेसे उतरत्र्न आम्ही उजवीकडे गुहेच्या
दिशेला वळलो. हे या गडावरील मुख्य आकर्षण. संपूर्ण किल्ल्यावर झाडी कमी म्हणून जे तापलो
होतो ते त्या गुहेत जाऊन थंडावलो. संपूर्ण गुहा पाण्याने भरली आहे. 30 मिटर आत अंधारातून
पाण्यातून चालत गेल्यावर अन्नपूर्णा देवीची आणि दत्तात्रयांची मुर्ती आहे. गुहेच्या
बाहेर उन्हाच्या झळा आणि आत एअर वंत्र्डीशन असा निसर्गाचा चमत्कारच म्हणायला हवा. तिथून
निघावेसे वाटत नव्हते. पण पोटातले कावळे निघायचे म्हणत होते. 20 मिनिटात गड उतरायलो.
हायवे वर जेवण घेऊन आम्ही मुंबईच्या वाटेला लागलो.
दिनांक : २०११
तालुका : पन्हाळा / शाहुवाडी जिल्हा : कोल्हापूर
मोहिमप्रमुख : डी. डी. पाटील सर, नाशिक
सहभागी सदस्य : ४९
२०१० साली पन्हाळगड ते पावनखिंड असा पालखीसह ट्रेक कल्पनेपलिकडे यशस्वी झाला होता.
पालखी ट्रेक न थांबता सलग चालत असा होता. पण हे दरवर्षी ठेवले तर ज्यांची शारिरीक क्षमता
नाही आहे. त्यांना कधीच ट्रेकमध्ये सहभागी होता येणार नाही. म्हणूनच २०११ साली सर्व
लोक ट्रेक पूर्ण करु शकतील अशा पद्धतीने ट्रेकचे नियोजन नव्याने करावे लागले. दोन महिने
तयारी सुरु होती. पन्हाळगडावर, वाटेतील शाळांमध्ये मुक्काम आधी जाऊन नक्की करुन झाले.
आणि निघायचा दिवस उजाडला. सामानाची जमवा जमव करुन रात्री 9 वा. मुंबईहून निघालो. सकाळी
थेट ज्योतिबाच्या दर्शनाला पोहचलो. दर्शन घेऊन मग आम्ही पन्हाळगडावर आलो. आन्हिक उरवुत्र्न
चहा नाष्ता घेऊन हनीफ नगारजी या आमच्या स्थानिक गाईडने सर्वांना तासभर गडावर चक्कर
मारत्र्न आणली. संपूर्ण पन्हाळगड बघणे वेळापत्रकात बसत नसल्याने आणि पन्हाळ्याला जाऊन
गडाचे दर्शन न घेणे बरोबर नाही म्हणून फक्त १ तास गड फिरत्र्न आम्ही आमची मोहिम सुरु
वेत्र्ली. जुलैचा पाऊस बरसणारच. नरवीर बाजीप्रभुंच्या महा पुतळ्याला पुष्पहार घालून
आणि त्यांच्या पायाशी मोहिमेचे श्रीफळ वाढवून आमची मोहिम सुरवात झाली. राजंदिंडी मार्गे
महाराज आणि सर्व मावळ्यांनी गड सोडला होता. आम्हीही त्याच वाटेने गड उतरायला घेतला.
पुन्हा थोड्यावेळासाठी डांबरी रस्ता लागला. तुरत्र्कवाडी आली. डांबरी रस्ता सोडून शेताच्या
बांधावरत्र्न चालत जाऊन डोंगर चढण्यास घेतला. म्हाळुंगे गाव लागले. त्यानंतर मसाई पठार.
नजर जाईल तिथपर्यंत हीरवा गालीचा पसरलेला दिसतो. अर्थात धुकं नसेल तर. कारण पावसाळ्यात
मसाई पठारावरचे धुकं म्हणजे वेगळच प्रकरण आहे. धुक्याचे साम्राज्य असेल तर 10 पुत्र्टावरचा
माणूसही दिसेनासा होतो. दिशाहीन होणे म्हणजे काय असते ते फक्त मसाई पठारावरच्या धुक्यातच
समजते. थोडे आम्हीही दिशाहीन झालो आणि पांडवलेण्यांच्या दिशेला गेलो. पण गुराख्यांमुळे
परत मुळ वाटेवर आलो आणि पठार उतरत्र्न वुंत्र्भारवाडीत आलो. तिथल्या शाळेतील मगदुम
सरांनी शाळेतच मुक्काम करण्याचा आग्रह वेत्र्ला. पण आधीच नियोजन वेत्र्ले असल्यामुळे
आम्ही सरांचे आभार मानून वाटेला लागलो. यानंतरचा संपूर्ण रस्ता चिखल आणि खडीचा असून
तो सरळ खोतवाडी म्हणजेच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी येत होता. सायंकाळचे 6 वाजले होते.
खोतवाडी शाळेच्या वर्गात आम्ही मुक्काम ठोकला. आमच्या आचार्याचने आधीच जाऊन तिथे बस्तान
मांडले होते. त्यामुळे गेल्या गेल्या चहा मिळाला. वुत्र्डवुत्र्डणारे अंग थोड्यावेळासाठी
शांत झाले. दोन तीन वर्गात सर्वजण विखुरले गेले होते. प्रथम येणार्यां चे नविन मित्र
झाले होते. त्यांच्या त्यांच्या गप्पांचा फड रंगला होता. ९वा. जेवण होऊन सर्व झोपी
गेले. दुसर्याप दिवशी ऊठून म्हाळसवडेच्या दिशाने निघालो. कालच्यापेक्षा आजचा टप्पा
थोडा मोठा होता. पण दाट जंगलातून, शेताच्या बांधावरत्र्न, ओढ्यातून, चिखलातून असा मजेचा
ट्रेक होता. पाटेवाडीचा ओढा तर काय विचारता. इथे सर्वाधिक कल्ला होतो. वाहत्या ओढ्यात
बसून कल्ला करायचा आनंद काही वेगळााच. म्हाळसवड्यात धनगरांच्या घरात आमचा मुक्काम झाला.
चुली जवळ बसून गाण्यांची मैफिल रंगली होती. दुसरा दिवसही संपला. आज आषाढ वद्यप्रतिपदा,
पावनखिंडीतील युद्धाला ३५१ वर्ष पूर्ण झाली. आमची पाऊले त्या युद्धभूमीकडे पडत होती.
डांबरी रस्त्यावरुन चालत होतो. पावनखिंडीत पोहचलो. बाजी आणि त्या ज्ञात अज्ञात विरांचे
ढाल तलवारी उभारुन प्रतिकात्मक स्मारक उभे वेत्र्ले आहे. शेजारीच एक शेड ऊभारत्र्न
युद्धप्रसंगाची सचित्र माहीती लावण्यात आली आहे. वीर रसात्मक गाणी म्हणून आम्ही त्या
महान युद्धाला आणि त्या विरांना अभिवादन करुन विशाळगडाकडे निघालो. वाटेत कासारीचा ओढा
लागतो. दोराच्या सहाय्याने एकमेकांना आधार देत ओढा पार वेत्र्ला. पुन्हा डांबरी रस्त्यावर
आलो. आता याच रस्त्याने चालत थेट विशाळगडाच्या पायथ्याशी आलो. विशाळगडावरील भगवंतेश्वराचे
दर्शन घेऊन मोहिमेची सांगता वेत्र्ली. रात्री मुक्काम भाततळीच्या शाळेत वेत्र्ला. दुसर्या्
दिवशी सकाळी बसने आम्ही संगमेश्वर येथील मार्लेश्वरल या स्वयंभू देवस्थानाला भेट दिली.
दुपारचे जेवण तिथेच जेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
दिनांक : २९-३० ऑक्टोबर २०११
तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे
मोहिमप्रमुख : सुनील भूमकर, मुंबई
सहभागी सदस्य : ७३
जेष्ठ इतिहास तज्ञ श्री. आप्पा परब यांनी स्वतःहून इच्छा व्यक्त वेत्र्ली की शिवशौर्य
कधीही बोलावेल तेव्हा त्यांच्या ट्रेकला इतिहासाचे मार्गर्शन करायला मी येईन. आणखी
काय हवे होते. शिवशौर्यने राजगड मोहीमेची चोख आखणी वेत्र्ली. ''दिवाळीच्या सुट्टीत
वेत्र्वळ किल्ले न बनवता, प्रत्यक्ष किल्ला कसा बोलतोय ते अनुभवायला किल्ले राजगडावर
चला.'' असे आवाहन वेत्र्ले आणि ७३ लोकांनी आपली नोंदवली. दिवाळी संपली आणि आम्ही वय
वर्ष २ ते वय वर्ष ६० पर्यंतच्या शिवप्रेमींना घेऊन स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत
पोहचलो. गुंजवणे गावात सकाळी चहा नाष्ता उरवुत्र्न राजगड चढण्यास घेतला. दिड तासाने
वर पोहचलो. झेड पी च्या वास्तूत आमच्या सॅक ठेवून, जेवणाचा डबा/ पाणी सोबत घेऊन गड
फिरायला बाहेर पडलो. आप्पां सोबत राजगड फिरणे म्हणजे राजगड किल्ला स्वतःची डॉक्युमेंटरी
फिल्म दाखवतो आहे असेच वाटते. सुरवातीलाच सुवेळा माचीच्या दिशेने जात वाटेतील सर्व
अवशेष, बुरुज यांची माहीती घेत सुवेळा माचीवर पोहचलो. नेढयात जाऊन आलो. वेळेत जेऊनही
घेतले. पाली दरवाजात कलत्या उन्हात पोहचलो. सुर्यास्ताला मुक्कामाच्या ठिकाणी परतलो.
चहा बिस्कीटे झाली आणि आप्पानी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. महाराजांचे
२५ वर्ष वास्तव्य या गडावर होते. त्यांच्या जिवनातील अनेक महत्वाचे प्रसंग या गडावर
घडले, त्यामुळे साहजिकच राजगडावर इतिहास ठासून भरलेला आहे. मा. आप्पांमुळे तो गडावर
तो ऐकण्यास मिळत होता. कार्यव्रत्र्माच्या समाप्तीला अध्यक्षांनी आप्पांना शिवशौर्यचे
टीशर्ट श्रीफळ देउत्र्न त्यांचे आभार मानले. तर हर्ष परचुरेने कवि भुषणाचे छंद म्हणून
आजच्या दिवसाची सांगता वेत्र्ली. झेड पी च्या वास्तूत ७३ जणांची सोय होउ शकत नसल्याने
तरुण तुर्क मोकळ्या जागेत उघड्यावरच झोपले. गडावर चांगली कडाक्याची थंडी आणि वार्यातचा
जोर होता.
दुसर्याा दिवशी पहाटे ऊठून चहा नाष्ता करुन आम्ही बालेकिल्लयावर गेलो. बाले किल्लयाची
वाट रेलिंग लावल्यामुळे सोपी झाली आहे. भवानी मंदिरापाशी आप्पांनी आमच्याकडून प्रार्थना
म्हणून घेतली. बालेकिल्लाही तेवढ्याच तळमळीेने विशद वेत्र्ला. ''आधी लगीन कोंढाण्याचे
मग माझ्या रायबाचे'' हे ऐतिहासिक उदगार जिथे निघाले त्या जागेवर उभे राहून सर्वच जण
धन्य झाले. बालेकिल्ला उतरत्र्न खाली आलो तेव्हा दुपार झाली होती. संजिवनी माची बघायची
राहीली होती. पुन्हा येऊ तेव्हा पहीली संजिवनी असा निश्चय करुन आम्ही गड उतरत्र्न गुंजवण्यात
आलो. जेवण उरवुत्र्न परतीच्या वाटेला लागलो. अविस्मरणीय ट्रेक फक्त आप्पांमुळेच हीच
भावना प्रत्येकाच्या मनात होती.
दिनांक : २४-२५ डिसेंबर २०११
तालुका : मोखाडा जिल्हा : ठाणे
मोहिमप्रमुख : मृदुला तांबे, मुंबई
सहभागी सदस्य : ३३
आता पर्यंतच्या ट्रेकिंग मध्ये कधी जव्हार - मोखाडा या दुर्गम भागात जाण्याचा योग आला
नव्हता. किंवा कधी विचार सुचला नव्हता. पण मृदुला तांबे हिने अश्या आदिवासी दुर्गम
भागात ट्रेक करण्याची इच्छा व्यक्त केली आणि जबाबदारी घेतलीही. ट्रेकची आधी आखणी करून
आम्ही २४ डिसेंबरला सकाळी मुंबईहून निघालो. कसारा मार्गे जाऊन मोखाडा देवबांध येथील
गणपती मंदिरात गेलो. मंदिराचा परिसर अत्यंत रमणीय होता. इथे संघाचे प्रचारक श्री. साठे
काका अनेक वर्षापासून आदिवासींच्या उत्कर्षासाठी कार्य करताहेत. साठे काकांनी त्यांच्या
कार्याची माहिती दिली. त्या नंतर आम्ही भूपतगडाकडे निघालो. वाटेत खोडाळा गावातून जेवण
बांधून घेतले. किल्ल्यावर थेट गाडीने न जाता, त्याच्या पायथ्याच्या कुर्लोद गावातून
चढत वर गेलो. कारण एकच, जास्तीत जास्त दुर्गम पाडे जवळून अनुभवता यावेत. किल्यात पोहोचलो
तेव्हा सूर्य कलला होता. बांधून घेतलेले जेवण उरकले आणि तरुण इतिहास अभ्यासक श्रीदत्त
राउत यांच्याकडून गड समजून घेऊ लागलो. गडावर मोठे पाणी असलेले टाके, राम सीतेच्या पावलांचे
ठसे आहेत अशी आख्यायीका. आतवर गेले भुयार, मारुतीचे मंदिर आणि टाक्यांचे अवशेष, ठीक
ठाक तटबंदी, बुरुज आहेत. अंधार पडला होता. इथून पुढे आमचा अनपेक्षितरित्या night trek
झाला. ट्रेकच्या पूर्व तयारीच्या वेळेस गावातील मुलांनी सांगितले होते कि, भूपतगडाहून
आमच्या मुक्कामाच्या भगतपाड्यात पोहचण्यास १ तास लागेल. पण हि वेळ त्यांच्या गतीने
होती. आमच्या बरोबर वयस्कर आणि लहान मुले होती. त्यामुळेच वेळेचं गणित कोलमडले. संपूर्ण
ट्रेक छान चांदण्यांच्या रात्रीत होत होता. हवेत छान गारवा होता. ट्रेक मध्ये अचानक
उद्भवलेले असे अविस्मरणीय प्रसंग असतात. सायं ६.३० ते रात्री १० चालत असे साडे तीन
तासाने आम्ही भगत पाड्यात पोहचलो. आमची बस थोडी लांब नदी पलीकडे उभी होती. त्यातून
आमचे सामान आणून ११ वा. एका शाळेत येउन स्थिरावलो. त्या पुढे जेवण. प्रत्येक घराच्या
बाहेर शेकोटी पेटली होती. आम्ही तो अनुभव घेत गप्पा मारत बसलो.
दुसऱ्यादिवशी लवकर उठून आटपायला घेतले. काल रात्री कुठून कुठे चालत जात आहोत, काही
कळत नव्हते. आता मात्र दिवसा उजेडी भूपतगड लांबवर दिसत होता. भगतपाड्यातील घरे दिसत
होती. उन्हामुले रापलेले चेहरे दिसत होते. गावचा विकास म्हणून म्हणावा तर फक्त शाळा
आणि वीज एवढेच. मुंबई जवळ असूनही दुर्गम भाग सहज जावू याचा विचारही कुणी करू नये असा
हा भूपत गड. ईथे खरतर मला गडाची माहिती देण्यापेक्षा ईतर माहिती द्यावीशी वाटते "माझ्या
कडे फाटके बूट होते वापरायला आणिते फाटके बूट घालायला धड पाय हि नाहीत अशी अवस्था असलेला
हा भूपत गडचा जव्हार मधील दुर्गम भाग. आपल्याकडे फाटके असले तरी कपडे आहेत घायला पण
मुंबई जवळच्या त्या साऱ्या आदिवसी पाड्यातील लोकांकडे ते कपडेही नाहीत. आपल्या कडे
दात आणि चणे हि आहेत. त्यांच्या कडे दातही नाही आणि चणेही नाहीत. आम्हा शहरी लोकांना
बघायला आता गाव गोळा झाला होता. शाळेतील सरांनी शाळेबद्दल आणि गावा बद्दल माहिती दिली.
आम्ही येणार म्हणून आख्या गावाने गावचा मातीचा रस्ता साफ स्वछ आणि सपाट करून ठेवला
हे सरांनी सांगताच आम्ही थक्क झालो. या शाळेला आम्ही गोष्टीची पुस्तके भेट म्हणून दिली.
आमच्यातील एक श्रीपाद कुलकर्णी याने त्या वर्षी शाळेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याला
एक मनगटी घड्याळ बक्षीस दिले. त्या गावचा निरोप घेऊन आम्ही निघालो. नदी ओलांडून आम्ही
बस मध्ये येउन बसलो. त्या रस्त्याशी जुळवून घेत बस जव्हारच्या दिशेने निघाली. वाटेत
पुन्हा एक नदीचे पात्र लागले. बस चालकाने ते पात्र महतप्रयासाने पार केले. जव्हार मध्ये
येउन दाभोसा धबधबा बघितला. आग्रा सुटके नंतर शिवाजी महाराज जिथे थांबले होते त्या शिरपा
माळ ठिकाणी भेट दिली. मुकबधीर शाळेला भेट दिली. मुकबधीर शाळेच्या प्रमिला कोकड ज्यांचा
या कार्याचा गौरव देशाच्या राष्ट्रपतीं प्रतिभा ताई पाटील यांच्या हातून झाला आहे,
तिथल्या मुकबधीर शाळेत तेव्हा असे वाटले आपणच खरे मुकबधीर आहोत आपल्या जवळच्या जिल्ह्यात
ह्या मुलभूत गरजा नाहीत आणि आपण मूक राहतो आणि त्यांच्या जाणीवां विषयी बधीर हि आहोत.
त्यांचे कलाकुसूर करणारे हात पहिले कि आपल्याला आपल्याच हातांची लाज वाटते. आपल्या
हात किमान त्यांच्या साठी देवाकडे प्राथना करण्यासाठी साठी जरी जोडले तरी जन्माच सार्थक
होईल असे वाटते. ईतिहासाच हे छुप पान उघडलं गेल दुर्लक्षित भाग सहभागी सदस्यांच्या
समोर आणला अशा ह्या भूपतगडाची मोहीम शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे राबवली गेली.
दिनांक : १८-१९ फेब्रुवारी २०१२
तालुका : पाली सुधागड, जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : निरंजन सरडे, मुंबई
सहभागी सदस्य : ३०
मुंबईहून रात्री १२ वाजता निघालो आणि पहाटे पहाटे सुधागडच्या ठाकूरवाडीत पोहचलो. सकाळ
असल्याने वातावरण पण स्वच्छ आणि प्रसन्न होते. गावातूनच किल्ल्यावर जायचा मार्ग आहे
तसे पाहता पाच्छापूरहून(पातशहापूर)सुद्धा मार्ग आहे, आम्ही निवडला ठाकूरवाडी. पहाटे
५च्या अंधारात किल्ला चढण्यास घेतला. साधारण दोन / अडीच तासाने गडावर पोहोचलो. पंत
सचिवांचा वाड्यात आम्ही तळ ठोकला. सामान ठेवून आम्ही बाहेर पडलो. सुधागड किल्ल्याला
ऐतिहासिक वारसा आहे. ह्या किल्ल्याला रायगडाची प्रतिकृती असे देखील म्हणतात. सुधागड
हा फार प्राचीन किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत असत. पुढे हिंदवी स्वराज्याचे
संस्थापक श्री शिवछत्रपतींचा पदस्पर्श या गडाला झाला आणि याचे नाव सुधागड ठेवले गेले.
या गडाचा घेरा मोठा आहे. गडावर पाण्याचे अनेक तलाव आढळतात. गडावर भोराई देवीचे मंदिर
आहे. गडावरील पंत सचिवांच्या वाडाच्या बाजूला भोरेश्र्वराचे मंदिर आहे. तिथूनच पुढे
गेल्यावर एक चोरदरवाजाची विहीर आहे. सचिवांच्या वाडापासून पुढे पाय-यांची वाट जाते
आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात. जर ही वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याची
टाके आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. पाच्छापूर दरवाज्यातून गडावर
शिरल्यास थोडे चढल्यावर आपण एका पठारावर पोहोचतो. पठाराच्या डावीकडे सिध्देश्र्वराचे
मंदिर, तसेच धान्यकोठारं, भाडांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची
नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. हत्तीपागां मधून जाते. या वाटेने आपण सरळ एका टोकावर
पोहचतो. दिंडी दरवाजा - सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट आपणांस दिंडी दरवाज्यात आणून
सोडते. हा दरवाजा म्हणजे रायगडावरील 'महादरवाज्याची ' हुबेहूब प्रतिकृती. हे या किल्ल्याचे
महाद्वार आहे. या द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. दोन भीमकाय बुरुजामध्ये लपल्यामुळे
या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या
आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम आहे. किल्ला तसा चढायला सोप्पा आहे. आम्ही जवळजवळ २\२.५
तासात किल्ला सर् केला. अर्धा डोंगर सर् केला कि किल्ल्यावर जायला एक लोखंडी शिडी लागते,
चढायला खुपच सोप्पी शिडी आहे. आणि गड फिरायला निघालो दुपारी साधारण २\३ वाजता जेवण
संध्याकाळी टकमक आणि सूर्यास्त आणि रात्री मुक्काम करून सकाळी गड उतरलो मग पाली गणेश
दर्शन आणि उंबरखिंड पाहून संध्याकाळी घरी परतलो.
दिनांक : २१-२२ एप्रिल २०१२
तालुका : अलिबाग, जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : सुशील साईकर, अलिबाग, रायगड
सहभागी सदस्य : ३२
उन्हाळ्यातील ट्रेक म्हटले की, त्याच्याशी संबांधित काही गोष्टी असतात. ट्रेकमध्ये
त्या गोष्टींचा सामना करावाच लागतो. असह्य उन आणि त्याचा होणारा त्रास, सतत लागणारी
तहान पण गड किल्ल्यांवर आणि आसपास कमी झालेले विंत्र्वा संपुष्टात आलेले पाणी. मग अशा
परिस्थितीत एप्रिल-मे मध्ये ट्रेक करायचाच नाही काढ़ तर ट्रेक करायचा पण वुत्र्ठे, आणि
वुत्र्ठल्या प्रकाराचा हे महत्वाचं आहे. एप्रिल-मे महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा
पारा समान नसला तरी सर्वच ठिकाणी तापमान तापदायक असते. त्यामुळे शरीराचे हाल होणार
नाही असे ट्रेक करावे. उदा. जंगल ट्रेक विंत्र्वा भुईकोट /सागरी किल्ल्यांचे ट्रेक
करावेत, जेणे करत्र्न उन्हान दमछाक होणार नाही. शरीर तहानलेलं राहणार नाही आणि वर्षभर
कस काढणारे ट्रेक करायला मोकळे. म्हणूनच शिवशौर्यने एप्रिल-मे महिन्यात फक्त सागरी
किल्लयांची सफर करायची हे नक्की वेत्र्ले. त्यामुळे लहानमुलांची सुट्टी काहीतरी चांगले
बघण्यात सार्थकी लागते आणि दमछाक होत नसल्यामुळे सर्व वयाच्या लोकांना ट्रेकचा आनंद
मिळतो.
या उन्हाळी खास ट्रेकचा शुभारंभ अलिबाग परिसरातील किल्ल्यांनी करायचे हे ठरले. अलिबागस्थित
आमचा मित्र श्री. सुशील साईकर याने कार्यव्रत्र्माची आखणी आणि पूर्ण तयारी वेत्र्ली.
शुव्रत्र्वारी रात्री आम्ही एस टी ने अलिबागला पोहचलो. एका लग्नाच्या हॉलमध्ये शुचिर्भुत
होऊन सकाळी 7 वा. वुत्र्लाबा किल्ल्यांत चालत गेलो. हा किल्ला अलिबागच्या समुद्र किनारीच
आहे. पण 1 किलोमीटर आत समुद्रात आहे. त्यामुळे चालत जायचे असल्यास ओहोटीच्या वेळा पाळाव्या
लागतात. वुत्र्लाबा किल्ला आतून व्यवस्थित फिरलो. आणि वेळेतच किनार्याटवर आलो. नाष्ता
करत्र्न सहा आसनी रिक्शाने आम्ही पद्मदुर्ग येथे गेलो. येथे मात्र किल्ल्यांत जाण्यासाठी
खाजगी बोटीशिवाय पर्याय नाही. सुरुवातीला तिथला स्थानिक बोटवाला यायला तयार नव्हाता.
पण बर्याटच मिन्नतवार्या. करुन आम्हाला नेण्यास तयार झाला. अर्ध्यातासात आम्ही दंडा
राजपूरीहून पद्मदुर्ग किल्ल्यांत आलो. तटबंदीवर इतकी वर्ष लाटांचा मारा होत असल्यामुळे
कणाकणाने गडाांची झिज होतेय पण चिर्यांलमध्ये भरलेली चुनखडी आहे तशीच म्हणूनच काळ्या
तटबंदीला पांढरी नक्षी वेत्र्ल्या सारखी भासते. जंजिर्यामच्या सिद्धिच्या उरावर दुसरा
किल्ला बांधण्याचे धाडस शिवाजी महाराजांनी वेत्र्ले. तटबंदिवरत्र्न गडप्रक्षिणा घातली.
किल्ल्यांचा इतिहास वाचून दाखवला. बोटवाल्याची वेळ ठरली असल्यामुळे आम्ही परत फिरलो.
दुपारी मुरुडगावात घरगुती जेवण करत्र्न आम्ही जंजिर्यासला गेलो. फेरी बोटी चालूच असतात.
त्यांचीही वेळ ठरलेली असते. 1 तास किल्ला फिरत्र्न आम्ही परत किनार्याफला आलो. संध्याकाळ
झाली होती. आमचा मुक्काम कणवेत्र्श्वर देवळामध्येच असणार होता. अंधारात पायर्यास चढून
8.30 वा. वरती पोहचलो. मस्त आंघोळ आणि गरमागरम जेवण. गप्पा मारता मारता वेत्र्व्हा
झोप लागली ते कळले नाही. उजाडल्यावर सर्व उठले. कणवेत्र्श्वराचे र्शन घेऊन चहा नाष्ता
उरवुत्र्न आम्ही डोंगर उतरुन आमच्या रिक्शात जाउत्र्न बसलो. रिक्शा आली थळ गावात. इथूनच
मोटर बोटीने आम्ही खोंरी किल्ल्यांत गेलो. हाही किल्ला शिवाजी महाराजांनी बांधला. मुंबईच्या
ब्रिटीशांच्या उरावर. या किल्ल्यांत कोस्ट गार्डचे कार्यालय आहे. लाईट हाऊसही आहे.
तिथल्या ऑफिसरने लाईट हाऊसचे काम कसे चालते याची संपूर्ण माहीती दिली. किल्ला फिरुन
बोटीने आम्ही किनार्यांवर आलो. येताना मात्र ''वादळात सापडली नाव रे, दूर किनारा आहे
गाव रे, तु दर्शन आम्हाला दाव रे'' असा प्रसंग होता. थळ गावात जेवलो. अलिबागचे प्रसिद्ध
आईस्क्रीम सोडा प्यायलो. रिक्शातून रेवस बंरात आलो. आणि तिथून बोटीने भाऊच्या धक्क्याला
लागलो. शिवशौर्यचा पहिला कोस्टल ट्रेक सफल संपूर्ण झाला.....
तालुका : पन्हाळा / शाहुवाडी, जिल्हा : कोल्हापूर
मोहिमप्रमुख : सुनील भूमकर, मुंबई
सहभागी सदस्य : ७७
पन्हाळगड ते पावनखिंड - विशाळगड २०१२ या ट्रेकची जबाबदारी सुनील भूमकर याने उचलली.
मे महिन्यात तयारी सुरु झाली. जून महिन्यात जाऊन पन्हाळगडावर, वाटेतील शाळांमध्ये मुक्काम
आधी जाऊन नक्की करुन झाले अमित, शार्दुल, गणेश आणि सौरभ १ दिवस आधीच पन्हाळगडावर मुकामास
गेले. उर्वरित सदस्य मुंबई, नाशिक, पुणे, रत्नागिरीहून सकाळी पन्हाळगडाच्या सुरुवातीला
असलेल्या नेबापूर गावात आम्ही आमचा डेरे दाखल झाले. आन्हिक उरवुत्र्न चहा नाष्ता घेऊन
हनीफ नगारजी या आमच्या स्थानिक गाईडने सर्वांना दुपार पर्यंत संपूर्ण पन्हाळगड आणि
त्याच्या शेजारी असलेला पावनगड दाखवला. आज आमचा मुक्काम इथेच होता त्यामुळे गड दर्शन
सावकाश आणि व्यवस्थित झाले. दुपारचे जेवण करून थोडा आराम केला. मोहीम प्रमुखांनी दुसर्या
दिवशी सुरु होणार्या मोहिमेची माहिती दिली. सर्वांची ओळख करून घेण्यात आली. अध्यक्षानी
सदर मार्गावर घडलेला इतिहास थोडक्यात सांगितला. दुसर्या दिवशी आमची मोहिम सुरु वेत्र्ली.
प्रथम नेबापुरातल्या शिवा काशीद यांच्या समाधीला वंदन करून. नरवीर बाजीप्रभुंच्या महा
पुतळ्याला पुष्पहार घालून आणि त्यांच्या पायाशी मोहिमेचे श्रीफळ वाढवून आमची मोहिम
सुरवात झाली. राजंदिंडी मार्गे सर्व मावळ्यांनी गड उतरायला घेतला. पुन्हा थोड्यावेळासाठी
डांबरी रस्ता लागला. तुरत्र्कवाडी आली. डांबरी रस्ता सोडून शेताच्या बांधावरत्र्न चालत
जाऊन डोंगर चढण्यास घेतला. म्हाळुंगे गाव लागले. त्यानंतर मसाई पठार. या वर्षी मसाई
पठारावर दोन भले मोठे tower उभारलेले पाहण्यास मिळाले. या tower मुले गडबडलो पण योग्य
वाटेवरून चालत राहिलो. दुपारी खोतवाडी या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. सायंकाळचे ४ वाजले
होते. खोतवाडी शाळेच्या वर्गात आम्ही मुक्काम ठोकला. ५ वा. चहा झाला. ५ वर्गात सर्वजण
विखुरले गेले होते. नविन मित्रांचा घोळका गप्पात रंगला होता. ७ वा. 'शाळेच्या एका वर्गात
छोटासा समारंभ झाला. शाळेने प्रदर्शित केलेल्या इच्छेनुसार शिवशौर्यने शाळेला एक सूरपेटी
दिली. शाळेला शैक्षणिक साहित्य भेट दिले गेले. पाटील सरांनी पेटी वाजवली तर संघमित्राने
मराठी गाणे म्हणून दाखवले. चिंतामणी बिवलकरांच्या हिंदी कविता झाल्या. शाळेतील मुल्लांनी
एक प्रार्थना म्हणून दाखवली. ९वा. जेवण होऊन सर्व झोपी गेले. दुसर्याघ दिवशी ऊठून म्हाळसवडेच्या
दिशेने निघालो. कालच्यापेक्षा आजचा टप्पा थोडा मोठा होता. पण दाट जंगलातून, शेताच्या
बांधावरत्र्न, ओढ्यातून, चिखलातून असा मजेचा ट्रेक होता. पाटेवाडीचा ओढ्यार मोठा कल्ला
झाला. वाहत्या ओढ्यात बसून कल्ला करायचा आनंद काही वेगळाच. भाततळी शाळेत आमचा मुक्काम
झाला. दुसरा दिवसही संपला. आज आषाढ वद्यप्रतिपदा, पावनखिंडीतील युद्धाला ३५२ वर्ष पूर्ण
झाली. आमची पाऊले त्या युद्धभूमीकडे पडत होती. डांबरी रस्त्यावरुन चालत होतो. पावनखिंडीत
पोहचलो. वीर रसात्मक गाणी म्हणून आम्ही त्या महान युद्धाला आणि त्या विरांना अभिवादन
करुन विशाळगडाकडे निघालो. वाटेत कासारीचा ओढा लागतो. दोराच्या सहाय्याने एकमेकांना
आधार देत ओढा पार वेत्र्ला. पुन्हा डांबरी रस्त्यावर आलो. आता याच रस्त्याने चालत थेट
विशाळगडाच्या पायथ्याशी आलो. विशाळगडावरील भगवंतेश्वराचे दर्शन घेऊन मोहिमेची सांगता
वेत्र्ली. गड उतरून खाली आलो आणि बसने पुन्हा भाततळीच्या शाळेत आलो. रात्रीचे जेवण
तिथेच जेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.
दिनांक : १२ सप्टेंबर २०१२
तालुका : उस्मानाबा, जिल्हा : सोलापूर
मोहिमप्रमुख : अमित मेंगळे, मुंबई
सहभागी सदस्य : २१
मुंबईहून खाजगी बसने निघून आम्ही २१ जणं तुळजापूर येथे पाहोचलो. एका धर्मशाळेचे दोन
छोटे हॉल घेऊन सर्व उरकले. भवानीमातेचे दर्शन झाल्यानंतर जेवलो आणि नळदुर्गाकडे जाण्यास
निघालो. नळदुर्गाची भव्यता लांबूनच डोळ्यात भरते. ११४ बुरुज आणि भक्कम तटबंदी असलेला
हा किल्ला आणि त्यातील जलमहाल हे या किल्ल्याचं वैशिष्ट. किल्याचा घेर प्रचंड मोठा
आहे. गवताळ भाग आणि छोट्या खुरट्या रोपट्यांनी संपूर्ण किल्ला भरला आहे. स्थानिक गाईडने
आम्हाला किल्ल्याची पूर्ण माहीती दिली. जल महालाच्या आत जाऊन पाण्याची चक्री दाखवून
तिचे कार्य कसे चालते ते गाईडने सांगितले. साधारण २ तासाने आम्ही किल्ल्यातून बाहेर
पडलो. त्यानंतर सोलापूर शहरात आलो. सोलापूरचा किल्ला बघितला. नगरपालिवेत्र्ने किल्ल्यात
सुंदर गार्डन बनविले आहे. तटबंदीवरुन गडाला चक्कर मारली आणि सिद्धेश्वर मंदिरात गेलो.
तिथून मुक्कामावर. अशा रितीने आजचा दिवस संपला.
रविवारी परांडा किल्ल्यात गेलो. असंख्य मोठे छोटे तोफ गोळे किल्ल्यात अस्ताव्यस्त पडले
आहेत. या किल्ल्यात झाडी झुडपे खुप आहेत. नक्षीदार तोफा आहेत. विहीर, भुयार इथे बघायला
मिळाले. तटबंदीवरुन चक्कर मारुन आम्ही औसा किल्ल्याच्या दिशेने रवाना झालो. औसा किल्ला
ऐन भरवस्तीत आहे. हा किल्ल्याचे वर्णन वाचण्यात नाही तर प्रत्यक्ष भेट देऊन त्याचे
सौंदर्य पाहण्यातच आहे. या सर्व किल्ल्यात पुन्हा पुन्हा यायचं हा निश्चय मनाशी करुन
आणि हटके किल्ले बघितल्याचा आनंद मानून घराकडे निघालो.
दिनांक : १७-१८ नोव्हेंबर २०१३
तालुका : बागलाण, जिल्हा : नाशिक
मोहिमप्रमुख : स्वप्नील चव्हाण, नाशिक
सहभागी सदस्य : ५६
शुक्रवारी रात्री आम्ही बागलाण, नाशिककडे प्रस्थान केले. १० वा. गड चढण्यास सुरु केला.
सुरुवातीला सालोटा किल्ल्यावर गेलो. खोदीव पायर्या चढून जावे लागते. दरवाज्याची कमान
उत्कृष्ट आहे. मुख्य दरवाजा चांगल्या अवस्थेत आहे. वरती गडावर पाण्याची टाकं आहेत.
सालोटा उतरून आम्ही साल्हेर चढण्यास घेतला. गडावर गंगासागर तलाव आहे. पृथ्वी दानासाठी
श्रीपरशुरामाने केलेल्या यज्ञभूमीचे गंगासागराजवळ असलेल्या यज्ञकुंड आणि यज्ञस्तंभ
यामुळे घडते. हे सर्व पहात दुपारी २ वा. परशुराम मंदिरात म्हणजेच गडाच्या सर्वोच्च
ठिकाणी पोहोचलो. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला म्हणून ओळखला जातो. साल्हेरवर
पोहचण्यास ५ वाजले होते. तिथे मोबाईलची रेंज येत असल्याने शिवसेना प्रमुख गेल्याची
बातमी त्यावेळी समजली. अनेकांचा ट्रेकचा उत्साह मावळला. ज्या शिवरायांची तत्व, विचारधारा
खणखणीतपणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकांपर्यंत पोहचवली. मराठीबाणा जागृत ठेवण्यासाठी
दुनियेचा रोष ओढवून घेतला. त्यांचे जाण्याचे दुखः होणे स्वाभाविक आहे. आम्ही मुक्कामावर
पोहचलो. २-३ जण मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे बाळासाहेबांच्या अंतिम दर्शनासाठी निघून
गेले. रात्रीचा मुक्काम आदिवासी आश्रम शाळेत केला. इथला पट्टा प्रामुख्याने आदिवासी
बहुल आहे. शिक्षणा पासून आदिवासी मुले वंचित राहू नयेत यासाठी सरकारी खर्चाने त्यांच्या
मोफत निवासाची, तसेच राहण्याची सोय झाली आहे.
सकाळी चहा नाश्ता घेऊन आम्ही आश्रम शाळेचा निरोप घेतला. मुल्हेर गावात आलो. एका हॉटेलात
दुपारच्या जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही मुल्हेरच्या पायथ्याशी गेलो. ट्रेक सुरु झाला.
मुल्हेर किल्ल्याचे मुल्हेर माची आणि बालेकिल्ला असे दोन भाग पडतात. पायथा ते माची
दाट झाडातून पाउल वाट जाते. संपूर्ण माची गर्द झाडीने आच्छादलेली आहे. दरवाज्यातून
प्रवेश कर्ते झाल्यावर समोर नजरेस पडतो आणि नजरेत भरतो तो म्हणजे मोती तलाव. तलावा
शेजारी गणपतीचे मंदिर तर अगदी फोटोग्राफिक. तिथून बालेकिल्ल्याच्या दिशेने गेल्यावर
चंदनबाव विहीर, श्रीराम व सोमेश्वर मंदिरे पाहण्यास मिळाली. निसर्ग रम्य परिसर आहे
हा सर्व. मुल्हेरचा निरोप घेऊन आम्ही मुल्हेर गावात आलो. सुरवाती पासून या ट्रेकमध्ये
जान नव्हतीच. त्यात निधनाच्या बातमीमुळे ट्रेक कसा बसा पूर्ण केला.
दिनांक : २६-२७ जानेवारी २०१३
तालुका : महाड, जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : शार्दूल खरपुडे, मुंबई
सहभागी सदस्य : १२९
शालेय जीवनात सरकारने सनावळ्या मध्ये अडकवून रुक्ष केलेल्या इतिहासाचे खरे महत्व सर्वसामान्यांना
कळावे..त्यांना इतिहासाची गोडी लागावी ..त्यांना तो कळावा आणि तो अनुभवावा, त्यातून
राष्ट्रप्रेम वाढावे हे कायम ध्येय डोळ्यासमोर ठेवून "शिवशौर्य ट्रेकर्स " हि संस्था
कायम प्रयत्नशील असते...ह्या ध्येयाच्या वाटचालीतील गरूडझेप ठरले ते "शिवतीर्थ रायगड
भ्रमंती ". ...... "गडांचा राजा आणि राजांचा गड म्हणजे रायगड "अशी भक्तीभावना मनात
ठेवून सर्व वयोगटाचे १२९ धारकरी २५ तारखेच्या रात्रीपासून "शिवशौर्य ट्रेकर्स " आयोजित
शिवतीर्थ रायगड भ्रमंती करण्यास निघाले .....होय धारकरीच ते ....शिवबाचे धारकरी ......कारण
हि स्वताच्या मौजमजेसाठी केलेली पिकनिक नव्हती कि ट्रेक नव्हता ...ती होती शिवभक्तांची
धारातीर्थ यात्रा .....जिथे आमच्या पूर्वजांनी "देव , देश आणि धर्मासाठी " रक्त सांडले.
ती स्थाने आमच्या साठी तीर्थक्षेत्रे बनली ....२५ तारखेच्या रात्री दोन खाजगी बसमधून
आम्ही धारकरी निघालो ....या वेळची रायगड भ्रमंती खूप विशेष होती आमच्यासाठी.... कारण
आमच्या बरोबर होते ज्येष्ठ इतिहास तज्ञ श्री अप्पा परब ...ज्यांनी आयुष्यभर केवळ शिवाजी
आणि सह्याद्री ह्यांचाच ध्यास घेउन सार्या जगाला शिवप्रभूंची महती कळावी म्हणन यासाठी
प्रयत्न केला . अशा या शिवयोग्याचा सहवास आम्हाला लाभणार या आनंदात बस मधील प्रवास
कसा संपून गेला हे हि आम्हास कळले नाही ..सकाळी ६ च्या सुमारास आम्ही गडाच्या पायथ्याशी
पोचलो....सुरुवातीलाच मोहीमप्रमुख शार्दुल खरपुडे यांनी मोहिमेचे स्वरूप समजावून देउन
आवश्यक त्या सूचना आम्हास केल्या . तिथे चहा घेउन टोर्च च्या साह्याने आम्ही अंधारात
गड चढण्यास सुरुवात केली ...सुरवातीला थंडीने कुडकुडनार्या आम्हाला नंतर मात्र गड चढताना
घामाने भिजून गेलो होतो ... २६ जानेवारी , भारताचा प्रजासत्ताक दिन ......त्या निमित्ताने
गडावर ९ वाजता ध्व्जरोह्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता . त्यामुळे जिल्हा परिषदेच्या
रूमवर आपले समान ठेवून आपल्या सैक घेउन आम्ही ध्वजारोहणाच्या ठिकाणी गेलो .....तिथे
ध्वजाला मानवंदना दिली गेली .....ते बघताना सहज मनात विचार आला कि आपला देश खरोखर प्रजासत्ताक
आहे का आता ??? शिवाजी महाराजांच्या काळातच खरे प्रजासत्ताक होते... ध्वजारोहणानंतर
आम्ही शिरकाई देविचे दर्शन घेतले . तिथे ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र आम्ही मोहीम
प्रमुख शार्दुल खरपुडे यांसोबत म्हटला ..अप्पांच्या तोंडून महाराष्ट्र भवानी चे स्त्रोत्र
ऐकताना फार चं वाटत होते. ..पुढे अप्पांनी आम्हाला रायगड च्या आजूबाजूची ठिकाणी दाखवली
...रायगड चे भौगोलिक महत्व सांगितले .....रायगड वरून दिसणारे तोरणा, राजगड , लिंगाणा
हे किल्ले, पाचाड चा जिजामातेचा कोट, कोकण दिवा , काळकाई चा पहारा आणि रायगडाचे चरणस्पर्श
करणारी काळकाई नदी , रायगड वाडी हि सारी ठिकाणे रायगडावरून बघताना फारच विलक्षण वाटले
.... होळीच्या माळावरून एक वाट खाली कुशावर्त तलावाजवळ जात होती ..अप्पांनी त्या वाटेने
आम्हाला नेउन आम्हाला वाटेत लागणारे रायगडाच्या प्रमुख खजिनदारांचा वाडा दाखवला ..त्याचा
आणि श्रीगोंदे गावचा असलेला संबंध अप्पांनी समजावून सांगितला ...ह्या खजीनदाराच्या
पूर्वजांनी मालोजीराजांकडून एक वचन घेतले होते.... त्या वचनाची पिढ्यानपिढ्या होणारी
पूर्तता आम्ही त्या वाड्याच्या रूपाने बघत होतो ..खरेच अप्पा खरोखर इतिहास जगत होते
आणि इतिहासाला आमच्यासमोर जिवंत करत होते...नंतर आम्ही केवळ स्त्रियांना व्रताचार करता
यावेत म्हणून बांधलेला कुशावर्त तलाव पाहिला .....आजच्या काळात स्त्री-पुरुष समानतेचि
बोंबाबोंब करून हिंदू धर्मावर टीका करणार्यांनी हा कुशावर्त तलाव पहावा .....केवळ स्त्रियांसाठी
पर्व काळात स्नान करण्यासाठी त्या काळात शिवाजी महाराजांनी "बाथटब" सदृश्श रचना बघितली
....कुशावर्त च्या काठी अप्पांनी केवळ तीरांदाजीने कुशावर्त मधील १०१ कमळाची फुले काढणार्या
तीरंदाजाची गोष्ट सांगितली ..वाड्यांचा सानिध्यात असलेला ईश्वर म्हणजे व्याडेश्वर .....ते
शिवालय बघितले ..त्याच्या आजूबाजूचा हंबीर राव मोहित्यांचा वाडा आणि इतर मंत्र्यांचे
वाडे बघितले ....... पुढे जाताना वाटेत तीन समाधी लागल्या . त्या समाधी होत्या नेताजी
पालकर ,येसाजी कंक आणि मोरोपंत पिंगळे यांच्या ....त्या समाधी पाहताना मन खरोखरच विषन्न
झाले ...आम्ही केवळ "जय शिवाजी " असे म्हणतो .....पण शिवरायांसाठी लढलेल्या वीरांचे
स्मृतीस्थळ आम्ही जपत नाही....खरोखरच त्यांच्या समाधीवर "नाही चिरा , नाही पणती "......
अफझलखानाच्या कबरीवरील अवैध बांधकाम सुप्रीम कोर्टाने तीनदा आदेश देउन हि ते न पाडता
ते तसेच रहावे अशी याचिका घेउन सुप्रीम कोर्टाकडे जाणारे मुस्लिम मतांसाठीचे लाचार
सरकार आणि आणि "जय शिवाजी " अशी पोकळ घोषणा देणारे आम्ही अभिमानशुन्य मराठे हेच या
वीरांच्या स्मृतीस्थळांच्या वाईट अवस्थेस कारणीभूत आहोत हे मनोमन पटले ......इतिहासाचा
अभ्यास करताना संस्कृती , दंतकथा , रूढी ,परंपरा यांची सांगड कशी घालावी हे अप्पांनी
शिकवले ... अप्पांच्याच शब्दात सांगायचे झाले तर " जेव्हा इतिहास गप्प होतो तेव्हा
भूगोल बोलायला लागतो आणि जेव्हा भूगोल गप्प होतो तेव्हा विज्ञान आणि संस्कृती बोलायला
लागतात ".........डोक्यावर सूर्य आला होता ... त्याची काहिली जाणवत होती .....पण त्याहीपेक्षा
एतेहासिक वास्तूची दुरावस्था आणि उदासीन असेलेले आम्ही यामुळे पेटलेली मनाच्यां आगीचे
चटके खूप जाणवत होते ...त्याच अवस्थेत पुढे बहुजन समाजातील महत्तरांचे वाडे बघून आम्ही
हनुमान टाके हि जलाशये बघितली आणि त्या संबंधीचा इतिहास अप्पांकडून ऐकला आणि भोजनासाठी
प्रस्थान केले ...दुपारच्या भोजनांतर थोडीसी वामकुक्षी घेउन ३ वाजता पुन्हा गडभ्रमंती
साठी निघालो ..... पुढे आम्ही सर्व अप्पान्सोबत हुजुर बाजार उर्फ बाजारपेठ च्या दिशेने
निघालो ....शिवरायांचा एक न कळलेला एक व्यक्तिमत्वाचा पैलू त्यामुळे कळला . शिवराय
खूप द्रष्टे राजे होते.. त्यांची इच्छा रायगड हे आर्थिक दृष्ट्या संपन्न असावी ती मोठी
व्यापारपेठ बनावी... यासाठी त्यांनी सर्व बंदरे ताब्यात घेतली...सुरत वर वारंवार हल्ले
करून तिचे अवमूल्यन करून टाकले ...आग्रा भेटीत त्यांनी व्यापारामुळे शहरे भरभराटीस
येतात हे जाणले होते...महाराजांचे निधन लवकर झाले नसते तर कदाचित आज जे महत्व मुंबईला
आहे तसे महत्व कदाचित रायगड ला असते........असो...काळापुढे कधी कोणाचे चालले आहे.....महाराष्ट्राचेच
दुर्दैव ..अजून काय म्हणायचे यास ??....बाजार् पेठेबाब्तीत मनात असलेल्या गैरसमजुती
आणि अज्ञान अप्पांनी दिलेल्या माहितीमुळे निघून गेले. पुढे टकमक टोकाला भेट देताना
त्याची भीषणता समोर आली ...तसेच टकमक टोकावर कडेलोट कसे करायचे तेही समजले व टकमक टोकावर
घडलेली एक कथा अप्पांनी सांगितली . जिच्यामुळे रायगडा खालील एका गावास "छत्रीनिजामपूर
" हे नाव प्राप्त झाले. पुढे दारूगोळ्याच्या कोठारांना भेट देउन त्यांचे वर्णन ऐकताना
अप्पांनी प्रथम शिवकालात गेलो आणि नंतर कर्नल प्रोथर ने पोट्ल्याच्या डोंगरावरून तोफा
डागून जी रायगड च्या वाताहतीस सुरुवात केली ..त्या घटनेचे साक्षीदार बनलो ...पुढे जगदीश्वराच्या
मंदिरात कवी भूषण आणि शिवप्रभूंच्या भेटीचे वर्णन ऐकताना साक्षात शिवप्रभू आणि कवी
भूषण डोळ्यासमोर दिसत होते ...पुढे शिवसमाधी समोर आम्ही शिवस्तुती गायली आणि त्या शिवसूर्यासमोर
नतमस्तक झालो.... पुढे कोळीम तलाव पाहून आम्ही गडावरील रहिवासी निलेश अवकीरकर यांच्या
घरी चहापानाची सोय केली होती .....आधीच हिवाळा त्यामुळे रात्र फार लगेच सुरु झाली ...अंधार
पडला म्हणून सर्वांनी आपल्या टोर्च काढल्या तरी पौर्णिमा असल्यामुळे शीतल चंद्रप्रकाश
अगदी लख्ख पडला असल्यामुळे अजिबात त्यांची गरज पडली नाही...चंद्रप्रकाशात चालण्याचा
अनुभव खूप विलक्षण होता .....पुढे काही विश्रान्तिस्थळावर अप्पांसोबत प्रश्नोत्तराचा
कार्यक्रम होता...त्याच्यात बर्याच शंकाचे निरसन झाले ...शिवरायांचे दोन राजाभिषेक
झाले होते हे माहित होते पण प्रत्यक्षात त्यांचे तीन राजाभिषेक झाले होते ..पहिला राजाभिषेक
हा १६५६ साली प्रतापगडावर झाला होता हे नव्याने आम्हाला अप्पांमुळे कळले ...इतरही बरीच
नवीन आणि दुर्मिळ माहिती मिळाली .. प्रश्न विचारण्यात लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत
सर्वांचा समावेश होता.. फारच सुंदर झाला तो कार्यक्रम. आम्ही सर्व तहानभूक हरपून तो
कार्यक्रमात सहभागी झालो होतो. "शिवशौर्य ट्रेकर्स "तर्फे शिवबावनी पाठांतराच्या नवीन
स्पर्धेची घोषणा यात करण्यात आली...त्याप्रमाणे इच्छुक स्पर्धकांनी "शिवबावनी " हे
अप्पांचे पुस्तक घ्यावे हे सांगण्यात आले....प्रश्नोत्तराचा कार्यक्रम संपल्यानंतर
मात्र आम्हास भुकेची जाणीव झाली ..वरती होळीच्या माळावर चंद्रप्रकाशात घरगुती सुग्रास
भोजनाचा आस्वाद घेताना फार आल्हाददायक वाटत होते .....पुढे मुक्कामावर निद्रादेविचा
आश्रय घेतल्यानंतर सकाळी आम्ही सकाळी नगारखाना, शिवरायांचा राजवाडा , राणीवसा , वस्त्रागार,
कोषागार, सचिवालय , बाळाजी आवजी चिटणीस यांचा वाडा पहिला . बाळाजी आवजी चिटणीस यांच्या
वाड्यात बसून अप्पांच्या तोंडातून बाळाजी आवजी चिटणीस यांच्या तल्लख बुद्धीमतेची साक्ष
देणारी कथा ऐकली . पुढे राजांची टांकसाळ पहिली ...तिथे नाणी कसे तयार करायचे हे आम्हाला
अप्पांनी समजावून सांगितले ...पुढे रत्नागार किंवा खलबतखाना आम्ही टोर्च च्या सहाय्याने
पाहिला ...आत अंधारात वटवाघळे होती . ते पाहून असे वाटले कि जो पर्यंत लोकांच्या मनात
"शिवाजी" जिवंत होते तोपर्यंत या महाराष्ट्राला वैभव होते...ते खरे स्वराज्य होते ..जेव्हा
मराठ्यांच्या मनातून शिवाजी लोप पावले आणि स्वार्थाच्या वटवाघुळांचा प्रवेश झाला तेव्हा
जिथे रत्ने होती तिथे वटवाघुळे नांदायला लागली . जिथे माणसे नररत्ने होती ...तिथे मनातून
"शिवाजी" लोप पावल्यामुळे तिथे स्वार्थी वृत्तीची माणुसरुपी वटवाघुळे निर्माण झाली
..आणि देशाची अवस्थां या रत्नागारापेक्षा काही वेगळी आहे असे मला नाही वाटत ......पुढे
आम्ही दासींची निवासस्थाने , पालखी दरवाजापाशी असलेले धान्याचे कोठार , गडावरील स्वयंपाकगृह,
गडावरील बुद्धिवादी कैद्यांसाठीचे कैदखाने पाहिले . सरदारांची निवासस्थाने पहिली ....चार
राण्यांची निवासस्थाने पहिली . ....रायगडावरील शौचकुपे पाहताना अप्पांनी सांगितले कि
या शौचकुपांचा वापर सोनखत तयार करण्यासाठी व्हायचा ..जे बाग फुलवण्यासाठी वापरले जायचे
. महाराज गडावरील कुठचीही गोष्ट वाया जाऊ द्यायचे नाही मग तो पावसाचे थेंब असो किंवा
मलमूत्र असो ....पुढे स्तंभ आणि गंगासागर तलाव बघितला आणि गंगासागर तलावाबाबतच्या दंतकथा
ऐकल्या ......रायगडावर आम्ही अप्पान्सोबत जे जे काही पाहिले ..त्याचा क्षण नि क्षण
मनाच्या शिंपल्यात कायमस्वरूपी साठवला गेला.... आणि आयुष्यात याच आठवणी आम्हाला मोत्याप्रमाणे
सोबत करतील ...आणि ज्यावेळी आम्ही निराश होऊ ,,,खचून जाऊ ...त्यावेळी याच आठवणी मनाला
उभारी देतील..... बरेच लोक गड फिरतात......पण आम्हाला रायगड समजला आणि तो अनुभवला ...
पुढे गडावरून उतरताना एका डोळ्यात आसू आणि एका डोळ्यात हसू घेउन परतीकडे निघालो ...अप्पांनी
सांगितल्याप्रमाणे " मनापासून या दगडी वास्तूंशी आणि चीरयांशी इमान राखा , त्या वास्तू
बोलू लागतील..... त्यांच्या आवारात घडलेल्या त्यांच्या कथा आणि त्यांच्या व्यथा सांगतील
"........गरज आहे ती फक्त त्यांच्याशी इमान राखण्याची ...........हे जर केले तरच हे
वैभव टिकेल आणि मराठ्यांच्या मनात पुन्हा शिवसूर्य उदयास येईल ...आज च्या युगात त्याचीच
नितांत गरज वाटत आहे .....नाही का ??? १२९ लोकांनी रायगड या आधी पाहीला होता पण यावेळेला
आप्पांनी त्यांच्या समोर गड जिवंत वेत्र्ला होता.
दिनांक : २-५ मे २०१३
तालुका : रत्नागिरी, जिल्हा : रत्नागिरी
मोहिमप्रमुख : मृदुला तांबे, मुंबई
सहभागी सदस्य : ४०
शिवशोर्य ट्रेकर्स आयोजित ''रत्नागिरी सागरी किल्ले मोहिम २०१३'' शिवशोर्य ट्रेकर्सची
रत्नागिरी सागरी किल्ल्यांची मोहीम जाहीर झाली आणि अपेक्षित प्रतिसाद मिळत गेला. त्याच
अनुषंगाने ४९ आसनी बस ठरवली गेली. १ मे ला ट्रेकची तयारी सुरु झाली. खाद्य पदार्थांची
खरेदी, सहभागी सदस्यांना आवश्यक त्या सूचना, सामानाची बांधा बांध अशी कामे आटपली गेली.
२ मे ला मुंबईतून निघणारे ८ वाजेपर्यंत एल्फिनस्टन पुलाखाली जमा झाले.बसचे आगमन झाले
नव्हते. घडाळ्याचा काटा पुढे सरकत होता. आता सर्व जण चिंतातूर झाले होते. वाटेत चढणा-यांचे
फोन सतत येत होते. शेवटी १ १ वाजता बसचे आगमन झाले. सुनील भूमकर यांनी श्रीफळ वाढवून
मोहिमेचा शुभारंभ केला.आणि आमची बस मार्गस्थ झाली. चेंबूर, वाशी, नेरूळ, पनवेल, पुणे
आणि सातारा येथील सहभागी सदस्यांना घेऊन बस आंबा घाटा मार्गे कोकणात डेरे दाखल झाली.
३ मे ला आम्ही लांज्यात ७ वा. पोहचणे अपेक्षित होतं ते आम्ही बसच्या कर्माने ११ वाजता
पोहोचलो. मोहिमेतील सदस्य श्री. राजन हर्डीकर लांज्यातील एक प्राचीन देवस्थान श्री
काळभैरव योगेश्वरी मंदिराचे विश्वस्थ आहेत. त्याच मंदिराच्या भक्त निवासात आम्ही शुचिर्भूत
झालो. चहा नाश्ता उरकून आम्ही रत्नागिरीच्या दिशेने निघालो. तेथील किल्ला रत्नदुर्ग
उर्फ भगवती च्या पायथ्याच्या गावात आम्ही दुपारचे जेवण घेतले.भरल्या पोटाने आम्ही किल्ला
चढायला घेतला. किल्ल्याची चढण सोपी आणि थोडीशीच होति. कारण हा सागरी दुर्ग आहे. रात्नागिरी
शहराच्या पश्चिम अंगाला असलेल्या सागरामध्ये एक भूशीर शिरलेले आहे. या भुशीरावर तीन
टेकड्या आहेत. पश्चिमेकडील टेकडीवर बालेकिल्ला वसलेला आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेश द्वार
सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत उघडे असते. दर्शनी भाग छान रंगरंगोटी करून सजवला आहे.
पर्यटन स्थळी जे जे असतं ते ते सर्व उपलब्ध आहे. हाडाच्या ट्रेकर्सना किल्ल्यावर हा
बाजार नकोस वाटतो. आत प्रवेश केल्यावर भगवती मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. शिवकालीन
असलेल्या मंदिराचा आता पर्यंत ३ वेळा जीर्णोद्धार झाला आहे. मंदिराच्या दारात सरखेल
कान्होजी आंग्रेचा पुतळा बसवला आहे. बहामनी राजवटीत बांधण्यात आलेला हा किल्ला पुढे
आदिलशहाच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणून त्याची डागडुजी
केली. आम्ही सर्व तटबंदी वरून एक फेरी पूर्ण करून आलो. रत्नागिरी शहर एक नजरेत पाहता
येते या किल्ल्यावरून. किल्ल्यात २ मंदिरे, विहीर, भुयार आणि मजबूत तटबंदी पहावयास
मिळते. आमच्यातील सचिन माळकरने किल्ल्याची माहिती वाचून दाखवली. आणि आम्ही किल्ला उतरायला
घेतला. आता आम्ही निघालो पुर्णगडाच्या दिशेने. भाट्यची खाडी ओलांडून आम्ही पावसच्या
दिशेने सरकत होतो. भाटे गावात महाराजांचा आरमार सेनापती मायनाक भंडारी यांचे स्मारक
आहे. त्यांचे वंशज आजही या गावात वास्तव्याला आहेत. पूर्णगड गावातील टुमदार घरांच्या
वाटांमधून चालत आम्ही पूर्णगडावर पोहोचलो. किल्ल्याच्या दाराजवळ मारुती मंदिर आहे.
शिवकालीन बांधणी नुसार हा दरवाजा लपवलेला आहे. तटबंदी वरून चालत १५ मिनिटात हा किल्ला
आम्ही अंधारातच न्याहाळला बसच्या त्या ४ तासांमुळे आमचे आजच्या दिवसातील ३ किल्ल्यांमधील
२ किल्लेच कसेबसे झाले. आजचा मुक्काम आमचा नाटे गावातील पडवणे येथे होता. राजन हर्डीकरांचे
येथे घर आहे. घर मस्त चिरेबंदी. सभोवार हापूस आंब्याची शेकडो कलमं, गाई म्हशींचे गोठे
आणि शेणाने सारवलेलं अंगण. एवढे सर्व पाहून दिवसभराचा शीण कधी निघून गेला ते कळालेच
नाही. आंघोळ करून fresh होऊन गरमागरम खिचडी सोबत पापड, लोणच्या वर ताव मारून कोणी घरात
तर कोणी अंगणात पथारी पसरली. ४ मे - आज दुसरा दिवस पक्ष्याच्या संगीताने सुरु झाला.
निसर्ग विधी आटपून, तयार होऊन छान झणझणीत मिसळ आणि कडक चहा तर घेतलाच पण हर्डीकरानी
आम्हाला अजून एक पेय स्वतः बनवून दिले. कोकम आगळ त्यात आले मिरची वाटून त्यात हिंगाची
फोडणी. हे कोकणी पेय जबरदस्त असेच होते. त्या नंतर आमची प्रार्थना झाली. प्रेरणा मंत्र
झाला. राजन हर्डीकरानी त्यांनी कातळावर केलेल्या कृषी प्रयोगाची माहिती देऊन आम्हा
सर्वाना अचंबित करून सोडले. आम्ही जी सभोवार आमराई बघत होतो ती कातळावर वसवली आहे,
या वर विश्वासच बसत नव्हता. पाण्याची नासाडी होऊ नये म्हणून त्यांनी योग्य यंत्रणा
उभारली आहे. त्यामागे राजन यांचे अपार कष्ट, अभ्यास, आणि सातत्य होते.त्या कृषी प्रयोगाला
सलाम करून आम्ही ती कातळाची टेकडी उतरून खाली आलो. बसने आम्ही अम्बोळ गडावर गेलो. गढी
पण वाटणार नाही इतकि त्याची अवस्था वाईट आहे. तटबंदीचा झालेला ढिगारा. किल्ल्याच्याच
आवारात गाव वसलेलं आहे. तख्ताची विहीर जेथे आहे तिथे गर्द झाडी, पाला पाचोळा असं किल्ल्याचेवर्णन
करता येईल. तरीही शार्दुलने उपलब्ध असलेली माहिती उपस्थीताना सांगितली, ती अशी, हा
किल्ला मुसाकाझी बंदर आणि समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला. कोणी बांधला याची
माहिती उपलब्ध नाही तरीही पूर्वी पोर्तुगालांची सत्ता पूर्ण सागरी किना-यावर होती त्यामुळे
कदाचित तो त्यांनी बांधला असावा किंवा अस्तीत्वात असलेल्या बहामनी किंवा आदिलशाही किल्ल्याची
डागडुजी केली असावी. हि माहिती ऐकून आम्ही परत फिरलो. बाहेरच असलेल्या समुद्रात पाय
भिजवण्याचा आणि नांगरून ठेवलेल्या बोटीत बसून फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरला नाही.
आता आम्ही यशवंत गडाच्या दिशेने निघालो. हा किल्ला रस्त्या लगतच आहे. इथेही दाट झाडी
पण उत्तम तटबंदी आढळली. काळ्या तोंडाच्या आणि मोठ्या आकाराच्या वानरांचा इथे सुकाळ
आहे. अश्याच एका किल्लेदार वानराने संघमित्राला गनीम समजून किल्ल्यात प्रवेश बंदी लागू
केली.शहरातील मावळे तिच्या मदतीला धावल्यामुळे ती किल्ल्यात प्रवेश करती झाली. इथेही
खोल आयताकृती विहीर होती. तटबंदी वरून चालत जेवढा शक्य आहे तेवढा किल्ला पाहिला. पुन्हा
बस प्रवास चालू. रत्नागिरी शहराच्या बाहेर आम्ही सावली बघून जेवून घेतले. आणि जयगड
किल्ल्याकडे कूच केले. पूर्वी जेव्हा मुंबई गोवा मार्ग नव्हता तेव्हा मुंबईस्थित कोकण
वासीय बोटीने प्रवास करून जयगड बंदरात उतरायचे, तोच हा जयगड किल्ला. जयगड किल्ला पठारावर
आहे. हे पठार समुद्रात थोडेसे आत घुसलेले आहे. त्यामुळेच गडाच्या तिन्ही बाजूनी समुद्र
आहे. येथेच शाल्मीही नदी येऊन मिळते. शत्रूला गडाला भिडता येऊ नये म्हणून इथे खंदक
बालेकिल्ल्याभोवती खणला आहे. तटबंदीवर जागोजाग गोलाकार बुरुज आहेत. किल्ला प्रशस्त
आहे. किल्ला पाहून बस मध्ये बसून आम्ही मुक्कामाच्या दिशेने प्रयाण केले. कोकणाती लहान
रस्ते आणि आमची volvo बस यामुळे आमच्या वेळेच समीकरण पार बिघडून गेले. प्रत्येक वळणावर
बस मागे पुढे करून मार्गस्थ करावी लागत होति. त्यात वाटेत दोन जेट्ट्या लागल्या आणि
तिथे तर बोटीत बस चढवताना आणि उतरवताना आमच्या बस ने driver सकट सर्वांनाच घाम आणला.
अशी बस मजल दर मजल करत रात्री १ व. कोलथरे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. केळीच्या पानावर
जेवण तयारच होते आणि तेही उत्कृष्ट त्यामुळे एवढ्या रात्रीही जेवण भरपेट झाले. ५ मे
- आज तिसरा दिवस. काल रात्री मुक्कामाला आलो तेव्हा typical कोकणातल्या जुन्या बांधणीच्या
वाडयात राहतोय एवढेच जाणवले होते पण त्या वाड्याचे आणि त्याच्या भोवतालचे सोंदर्य किती
अप्रतिम आहे ते सकाळीच दिसले. छान कौलारू दुमजली वाडा ज्याचे रुपांतर शालेय विद्यार्थ्यांच्या
वसतिगृहात झाले आहे. आंघोळ आणि निसर्गविधीची जागा परसबागेत. नारळी पोफळी, सुपारी, केळीच्या
आणि इतर झाडांची लांबवर रांग, लाल मातीचा गालीचा, मोठी विहीर, जांभ्या दगडाचे कम्पाउंड
आणि त्या कम्पाउंडच्या पलीकडे समुद्र … सर्व वेड लावणारे होते. इथे किमान १ संपूर्ण
दिवस तरी राहण्यासाठी हवा. पण निघावे लागणारच होतं. ज्यांच्या मुळे आमची इथे सोय झाली
ते स्थानिक रहिवाशी आणि संस्कृत भाषा तज्ञ श्री. बडे यांचे जाहीर आभार मोहीम प्रमुख
मृदुला हिने मानले. आमची प्रार्थना झाली आणि आम्ही ते सुंदर गाव सोडलं. पुन्हा त्या
छोटा छोट्या रस्त्यांनी आमची great बस १.५ तासाने हर्णे बंदरात दाखल झाली. हर्णै येथील
स्थानिक कोळी श्री. गणेश चौलकर यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्यात जाण्यासाठी बोटीची व्यवस्था
करून आम्हाला मोलाची मदत केली. त्यांच्या स्पीड बोटींनी आम्ही किल्ल्यापाशी पोहोचलो.
सागरी लाटा, वारा, उन, पाऊस अंगावर झेलत सुवर्णदुर्ग इतिहासाचा साक्षीदार म्हणून आजही
न ढासलता उभा आहे. गोमुखी दरवाज्यात असलेल्या मारूतीची आम्ही आरती केली आणी तटबंदी
वरून किल्ला पाहण्यास घेतला. दरवाजात उम्बर्यावर कासव कोरलेले आहे. किल्ल्यात पाण्याची
अनेक मोठी टाक आहेत. काही इमारतींचे अवशेष आहेत काही अभ्यासकांच्या मते हा किल्ला शिलाहारांनी
उभारल्यामुळे या किल्ल्याचा ताबा विजापूरकरान कडून १६६० मध्ये शिवरायांकडे आला. किल्ल्यात
वट वाघळाची वसाहत वाटावी एवढ्या संखेने पाहायला मिळतात. आम्ही परत बोटीने बंदरात आलो.
समुद्रात डुंबण्याचाही अनेकांनी आनंद घेतला. आता भूक जोरदार उसळली होती. त्या जेवणाचाही
आनंद वेगळाच होता. हर्णै मधील मेहेंदळे यांनी आम्हाला आमरस पुरीचे जेवण घालून आमच्या
मोहिमेचा शेवटचा घास गोड केला. मोहिमेचे वेळापत्रक शेवटच्या दिवशी तरी योग्य रित्या
पार पडलं. जड पावलांनी (म्हणजे निघवत नवते हे एक कारण आणि आमरस पुरी वर मारलेला ताव
हे हि कारण) आम्ही घरच्या रस्त्याला लागलो .ट्रेक हा गैरसोयीनी युक्त असतो तो आम्ही
जमेल तसा सुकर बनवण्याचा प्रयत्न करत असतो. पण असमानी आणि सुलतानी संकटापुढे आम्ही
हतबल असतो. यावेळी देव दयेने आस्मानी संकट उद्भवले नाही पण बसने सुलतानाची जागा घेतली
होती. तीन दिवसातील सुरुवातीच्या दोन दिवसाचा प्रवास त्रासदायक ठरला. तरीही सहभागी
सदस्यांनी अत्यंत समंजसपणे सहकार्य केले. जेवायला उशीर झाला म्हणून लहान मुले रडली
नाहीत कि वयस्कर माणसांनी त्रागा केला नाही. सर्वानी केलेल्या सहकार्या बद्दल संस्था
सर्वांची ऋणी रहिल. राजन हर्डीकर यांनी केलेला पाहुणचार विसरत येणार नाही. आमचा मित्र
सलिल मांद्रेकर ने उर दुखेस्तोवर बसच्या वाहकाची भूमिका पूर्ण प्रवास भर पार पाडली,
सलिल मुळेच बस सुरक्षित चालत होती, रात्रीच्या प्रवासात अंधारात प्रचित आणि त्याच्या
मित्रांनी जाग राहून ड्रायवर ला torch दाखवून दिशा दाखवण्याच काम केल. पुण्याहून पाहिल्यांदाच
आमच्या बरोबर आलेले मित्र यांची पण खूप मदत झाली. नचिकेत याने तर navigator ची भूमिका
उत्तम रित्या पार पाडली. हे सर्व मित्र आम्हाला पुढील ट्रेक मध्ये सोबतीला हवे आहेत.
दिनांक : जुलै २०१३
तालुका : पन्हाळा, शाहुवाडी, जिल्हा : कोल्हापूर
मोहिमप्रमुख : रोहित दिक्षित, नाशिक
सहभागी सदस्य : ११४
समुद्रातील रत्ने हवी असतील तर समुद्रात उतरावे लागते, किनाऱ्यावर राहून चालत नाही.
त्याचप्रमाणे शिवछत्रपतींना समजून घ्यायचे असेल, त्यांच्या आणि त्यांच्या मावळ्यांचा
त्याग, शौर्य, स्वराज्यावरील प्रेम समजून घ्यायचे असेल तर केवळ इतिहास वाचून चालत नाही.
प्रत्यक्ष गडकिल्ले अभ्यासावे लागतात. ऐतिहासिक घटनांच्या ठिकाणी, रणभूमीवर जावे लागते.
ज्या स्थानावर आपल्या पूर्वजांनी देव, देश अन धर्मासाठी रक्त सांडले, ती क्षेत्रे आमच्यासाठी
तीर्थक्षेत्रे बनली आहेत. नेमकी हीच भावना मनात ठेवून 'शिवशौर्य ट्रेकर्स' हि संस्था
दरवर्षी 'पन्हाळगड ते विशाळगड' या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेचे आयोजन करते. मोहीम प्रमुख
रोहित दिक्षित सोबत मी २० जूनला पन्हाळगड विशालगड ट्रेकची व्यवस्था करून आलो. त्यावेळेपासून
ते ट्रेक होई पर्यंत उसंत नव्हती. ट्रेकची तयारी दरवर्षी असतेच पण यावेळी संस्थे तर्फे
म्हाळसवडे शाळेला कॉम्प्युटर भेट देणार असल्यामुळे पैशांची जुळवाजुळव असा दुहेरी ताण
होता. १० जुलै नाव नोंदणीची शेवटची तारीख असल्यामुळे १ जुलै नंतर नोंदणी जोरात सुरु
झाली. १० तारीख उलटल्या नंतरही काही जणांनी जास्तीचे पैसे भरून नाव नोंदणी केली. मुंबई
सह नागपूर, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जळगाव, सातारा, रत्नागिरी इथवरून लोकांनी सहभाग
निश्चित केला. सहभागी सदस्यांच्या प्रश्नाना उत्तरे, शंकाचे निरसन फोन द्वारे रोजच
सुरु होते. दिवस जसा जवळ येत होता तसं तहान भूक झोप कमी होत गेली. आणि अखेर निघायचा
दिवस उजाडला. packing झाली होती. रात्री ८.४५ वाजता बसने मुंबईतून निघालो. वाटेत चेंबूर,
वाशी, नेरूळ, पनवेल, आणि पुणे येथील सदस्यांना सामावून घेतले. पन्हाळगडाखाली असलेल्या
नेबापूर या आमच्या मुकामाच्या गावात २० जुलै शनिवारी सकाळी ७ वाजता डेरेदाखल झालो.
रत्नागिरीचे सहभागी सदस्य शिरीष साळुंखे आदल्या रात्रीच त्या मुक्कामावर येउन राहिले
होते. सर्वांनी सकाळची आन्हिकं उरकायला घेतली. आमचा खानसामा कासम याने चहा नाश्ता तयार
करायला घेतला. तो पर्यंत नागपूर, जळगाव, सातारा, नाशिक, मनमाड, पुणे, औरंगाबाद आणि
कोल्हापूर येथील सदस्यही हजर झाले. चहा नाश्ता करून सर्वजण गाईड हनीफ नगारजी बरोबर
पावनगड, पन्हाळगड पाहण्यासाठी बाहेर पडले. पावनगडावर पूर्वी युद्धात जखमी झालेल्या
सैनिकांसाठी तुपाची विहीर आहे, हेमाडपंथी शिवमंदिरही आहे, याच गडावर गान सरस्वती लतादीदी
आणि चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची घरे आहेत. पन्हाळगडाला ज्यांच्यामुळे नाव प्राप्त
झाले ती पराशर ऋषींची गुहा सर्वांनी पाहिली. तीन दरवाजा, पुसाटी बुरुज, अंधारबाव, धान्याची
तीन कोठारे आजही दिमाखात उभी आहेत. सोमेश्वर तलाव आणि तबक उद्यान पन्हाळगडाच्या सौंदर्यात
भर घालतात. सदस्य जेव्हा पन्हाळा दर्शन करत होते त्यावेळी आम्ही आयोजक टीमने आपापली
कामे करायला घेतली. मी, गुरुनाथ, प्रथमेश भाजी पाला, किरणा सामान घ्यायला बाहेर पडलो,
संघमित्रा स्वयंपाकावर लक्ष ठेऊन होती. तर शार्दुल प्रमाणपत्र, माहितीपत्रक याचे काम
करत होता. दुपारी २ वाजता जेवायला सर्वजण हजर होते. जेवुन थोडी विश्रांती झाली आणि
सर्प तज्ञांचा साप विषयीचा माहितीपर कार्यक्रम झाला. विषारी, बिन विषारी सापांची माहिती
जिवंत साप दाखवूनच दिली. सर्पमित्र अनंत वाले आणि प्रशांत भवर यांनी अनेक गैर समजुती
निकालात काढल्या. उपस्थितांना हे एक surprise gift होते. ट्रेक एके ट्रेक हे शिवशौर्यचे
धोरण कधीच नव्हते आणि म्हणूनच आजचा हा सर्प कार्यक्रम. यानंतर इतिहास अभ्यासक श्रीदत्त
राउत यांनी इतिहासाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणामुळे उद्या मार्गक्रमण करणाऱ्या
वाटे बद्दल कमालीची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर दिसू लागली. या उत्सुकतेतच सर्वजण
निद्रादेवीच्या अधीन झाले…. उद्याच्या शिवाजी महाराजांच्या वाटेवरून चालण्याचे स्वप्न
बघत.
२१ जुलै रविवार सकाळी ६ वाजता आमचा दिवस सुरु झाला. सर्व कार्यक्रम उरकून ८ वा. आम्ही
मुक्काम सोडला. सर्व प्रथम आम्ही वीर शिव काशीद यांच्या समाधीपाशी गेलो. शार्दुलने
प्रेरणा मंत्र म्हटला. समाधीवर फुले वाहून नतमस्तक झालो. मोहिमप्रमुखांनी सर्वांच्या
मस्तकी भगवे गंध लावले. आता आम्ही पन्हाळगडावरील संभाजी महाराजांच्या मंदिरात आलो.
इथेच आमच्या नाश्ता आणि pack-lunch ची सोय झाली होती. सैन्य पोटावरही चालते त्यामुळे
दिवसभराच्या शिदोरीची बेगमी करून आम्ही बाजी प्रभूंच्या पुतळ्यापाशी आलो. बाजींचा १५
फुटी पुतळा पाहूनच अंगात चैतन्य संचारते. बाजींच्या चरणी श्रीफळ वाढवून, फुले वाहून
पुढे राज दिंडीत दाखल झालो. हा भाग गडाच्या मलकापूरच्या दिशेला येतो. इथूनच पौर्णिमेच्या
रात्री महाराज गड उतरून विशाळ गडाकडे रवाना झाले होते. या राज दिंडीतून दोन पालख्या
होत्या. एक शिवाजी महाराजांची आणि दुसरी प्रतिरूप शिवाजी म्हणजे शिवा काशीदांची. महाराजांची
पालखी राजदिंडी उतरल्या नंतर म्हसाई पठार चढली तर शिवा काशीदांची पालखी मलकापूरच्या
दिशेने गेली. शत्रूला हुकावणी देण्यासाठी खेळलेला तो डाव होता. हा झाला दिशेचा फरक
तसा अजून एक फरक या दोन पालख्यांमध्ये होता. तो फरक भावनिक होता. एक पालखी शिवाजी महाराजांचा
जीव वाचवण्यासाठी चालली होती तर दुसरी पालखी शिवाजी महाराजांसाठी स्वताचा जीव द्यायला
चालली होती. पालखी नेणाऱ्या त्या वीरांना मनोमन वंदन करून आम्ही राज दिंडी उतरायला
घेतली. तत्कालीन भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती सर्वांच्या लक्षात आली होती. तुरुकवाडीचा
डांबरी रस्ता सोडून आम्ही म्हाळुंगे गावाचा चढ चढायला सुरु केला. चढ खडा असल्याने शहरी
मावळ्यांची छाती फुलून आली होती. चढ संपल्यानंतर सर्वाना मेंथोलची गोळी दिली गेली,
मग थंड मेंथोलमुळे उर्जा मिळाली पुढे चालायला. म्हाळुंगे गावानंतर सुरु झाले म्हसाई
पठार. सपाट कातळ, गवताळ रस्ता, तुफानी वाऱ्यामुळे आडवा बरसणारा पाऊस आणि क्षणात समोरिल
दृश्य गायब करणारे दाट धुक्याचे पडदे हे या म्हसाई पठाराच वैशिष्ट. १ तास चालल्या नंतर
म्हसाईदेवीचे देऊळ आले. तिथे आरती झाली. मध्यान भोजन सुद्धा तिथेच घेतले आणि पुढी मार्गक्रमण
सुरु केले. पाउण तासाच्या चाली नंतर म्हसाई पठारावरून exit घेतली, आम्ही पठार उतरलो.
काही वेळानंतर कुंभारवाडी आली. या नंतर सरळ बैलगाडीचा रस्ता होता, जो थेट १ तासानंतर
खोतवाडीत आमच्या मुक्कामाच्या शाळेत घेऊन आला. एव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते. खोतवाडीतील
एक रहिवाशी भीमराव खोत आम्हा ४-५ जणांना त्यांच्या घरी घेऊन गेले. आज बेंदूर सण असल्याने
प्रत्येक घरात पुरण पोळीचा बेत होता, त्यामुळे आम्हालाही पुरणपोळी खायला मिळाली. आता
प्रत्येकजण सुके कपडे घालून चहा बिस्किटांचा आनंद घेत नवीन मित्रांशी गप्पा मारत बसले
होते. ट्रेकची गम्मत वेगळीच असते. ज्या मित्रा बरोबर आपण आलेलो असतो तो आपल्यायला मुक्कामावरच
भेटतो आणि जो चालताना आपल्या बरोबर असतो तोच खास मित्र होऊन जातो. अश्याच नवीन मित्रांच्या
गप्पा रंगात आल्या होत्या. ८ वाजता आम्ही जेवण सुरु केले. जेवण झाल्यावरही गप्पा काही
संपल्या नव्हत्या. श्रीदत्तनाहि अनेक इतिहास बद्दलचे प्रश्न विचारले जात होते. आणि
त्याची समाधानकारक उत्तरही त्यांना मिळत होती. महिला मंडळाच्या खोलीतही गप्पांचा फड
रंगला होता. अश्या तर्हेने ट्रेकिंगचा पहिला दिवस संपला.
२२ जुलै सोमवार, आज आम्ही कालच्यापेक्षा लवकर उठलो. ५.३० वाजता दिवस सुरु झाला. पहाटेच्या
अंधारात सर्वांनी प्रातर्विधी आटोपला. खानसामा कासमनेही चहा नाश्त्याची तयारी सुरु
केली. ७.३० वाजता भीमराव खोत त्यांची रायफल घेऊन आले. मी हवेत बंदुकीच्या दोन फैरी
झाडून आजच्या मोहिमेला सरुवात केली. पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाला आणि
मावळ्यांनी दुसऱ्या मुकाम्माकडे कूच केले. आजचा दिवस हा जास्तीत जास्त जंगलातून होता.
मार्ग शेताच्या बांधावरून होता, खळाळत्या ओढ्यांतून होता. निसर्गाच्या कुशीतून २८ किलोमीटर
सहज पार झाले. वाटेत मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, माळवाडी, रिंगेवाडी, पाटेवाडी
अशी गावं लागली. मुक्कामाच्या आधी १५ मिनिटे एक मोठा ओढा लागला, तिथे सर्वांनी यथेछ
धमाल केली. अनेक आयुर्वेदिक झाडा पानातून वाहत आलेल्या पाण्यात दिवसभराचा शीणवटा धुतला
गेला. त्या ओढ्यातून सर्वाना बाहेर काढावं लागलं. म्हाळसवडे गावाची शाळा वाटच पाहत
होती. मोहिमेच्या advance team वर अनेक जबाबदाऱ्या असतात पण म्हाळसवड्यात अजून एक जबाबदारी
असते ती म्हणजे डांबरी रस्त्या पासून सामान शाळेपर्यंत चढवायचे. पण आमच्या टेम्पो वाल्याने
जिगर दाखवली आणि सामान शाळेपर्यंत पोह्चवले. संस्थेने दरवर्षी प्रमाणे वाटेवरच्या अनेक
शाळांत शैक्षणिक साहित्याचे याही वर्षी भरपूर वाटप केले पण आज ह्या शाळेला आम्ही अद्यायावत
संगणक भेट दिला. आज शिवशौर्यच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला. अध्यक्ष
या नात्याने मी संगणकासमोर श्रीफळ वाढवले, शाळेतील विद्यार्थिनीने फीत कापून संगणकाचे
उदघाटन केले. मुख्याध्यापकांनी संस्थेचे आभार मानले. सहभागी सदस्य आनंद गोडबोलेने संगणकाच्या
software साठी तिथेच रुपये ५००/-ची मदत शाळेच्या सराना दिली. या संगणकासाठी अनेकांनी
मदतीचा हात दिला त्यांचीही नावे लिहिणे उचित ठरेल. गायिका बकुल पंडित, माजी नगरसेवक
विजय कुडतरकर, गुरुनाथ मयेकर, बन्सी मेंगळे, डॉ. रवींद्र शिवदे, डॉ. मिलिंद शहा, दिलीप
राव, डी डी पाटील, नंदू देसाई, माधव कुलकर्णी, विणा म्हात्रे, वर्षा देशमुख, मंदार
पालकर, जयदीप देशमुख, वसंत जोशी आणि गीता शिंदे. यातील अनेक जण ट्रेकला वैयक्तिक अडचणींमुळे
आली नव्हती पण 'शिवशौर्य ट्रेकर्स' वर विश्वास ठेऊन त्यांनी हि आर्थिक मदत केली. या
सर्वांची संस्था ऋणी आहे. रात्री मिसळ पावाचे जेवण जेवून सर्व झोपी गेले.
२३ जुलै मंगळवार : सकाळी ५.३० उठून ७ पर्यंत तयार झालो. चहा पोहे स्वाहा करून पावनखिंडीकडे
कूच केले. दोन दिवसानंतर डांबरी रस्त्याने चालायला मिळत होते. दीड तास पायपीट केल्यानंतर
आम्ही पावनखिंडीत पोहोचलो. आधीच ठरल्याप्रमाणे बाजी प्रभूंची आताची म्हणजेच १२वी व
१३वी पिढी शिवशौर्यच्या मोहीमेला शुभेछ्या देण्यासाठी पावनखिंडीत हजर होती. हे शिवशौर्यच
भाग्यच मानावे लागेल. श्री. वैजनाथ देशपांडे यांनी आमच स्वागत केलं. मी आमच्या ११४
मावळयांना संपूर्ण देशपांडे कुटुंबाची ओळख करून दिली. त्यानंतर देश भक्तीपर गीतांचा
उत्स्फूर्त कार्यक्रम झाला. सोबतीला धुवाधार पाउस होताच. डी डी पाटील यांनी म्हटलेल्या
गोंधळावर ७३ वर्षीय रुईकर काकांनी भगवा ध्वज नाचवला. धुवाधार पाउस पडत असून सुद्धा
शिवशौर्यच्या सर्व ११४ मावळ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. जय भवानी जय शिवाजी
या घोषणांनी पावनखिंड दणाणून गेली होती. या उत्साहातच आम्ही वैजनाथ देशपांडेंच्या हस्ते
समाधीस्थळाची धूप कापुराने आरती केली. स्वा. सावरकर लिखित शिवाजी महाराजांची आरतीही
झाली. मंत्र पुष्पांजली सह निश्चयाचा महामेरू या शिवस्तुतीने आरती संपली. गंध आणि खिंडीतील
पवित्र माती याचं मिश्रण करून ते पावन गंध सर्व मावळ्यांच्या मस्तकी लावले गेले. दोन
दिवसाचा खडतर प्रवास आज सार्थकी लागल्याचे भाव सर्वांच्या चेहऱ्यावर होते. शालेय पुस्तकात
वाचलेली पावनखिंड याची देही याची डोळा पाहत होते. स्वामी निष्ठा किती पराकोटीची असू
शकते याची हि घोडखिंड साक्षीदार आहे. सर्वांनी स्वतःच्या आणि कॅमेराच्या memory card
मध्ये पावनखिंड साठवली. देशपांडे कुटुंबीयांनी प्रेमाने देऊ केलेला बर्फी आणि चिवड्याचा
फराळ करून सर्वांनी पुढील मार्ग अवलंबला. शिवशौर्यचा जत्था पावनखिंडीतून भाततळी गावात
आला. काही स्थानिक गावकऱ्यांच्या माहितीनुसार कासारी नदीला पूर आला आहे हे समजलं. सलग
५-६ दिवस ज्या प्रकारे पाउस कोसळत होता त्यावरून आम्ही अंदाज बांधलाच होता. तरीही मी
आणि पाटील सर नदी पाहायला गेलो. जिथे आम्ही कासारीचे पात्र ओलांडतो तिथून नदीचा मोठा
जलाशय ७००-८०० मीटर वर असतो तो आज अवघा ५० मीटर पर्यंत आला होता. हि परिस्थिती मोहीम
प्रमुख रोहितला कळवली आणि त्याने मोहीम भाततळी गावात समाप्त करण्याचा योग्य निर्णय
घेतला. सहभागी सदस्यांना प्राप्त परिस्थितीची कल्पना देऊन मोहिमेची सांगता करतोय हे
सांगितले. त्यातील काही जणांनी पुढे जाऊन बघूया का नदी ओलांडता येते का अशी विचारणा
केली. त्यावर एक सहभागी सदस्य अविनाश खुळे याने ट्रेकिंग मध्ये तीन S महत्वाचे आहेत
हे सांगितले, १. SAFETY २. SATISFACTION ३. SACRIFICE याचे महत्व पटवून दिले. अत्यंत
विचारी आणि समंजस लोकं आपले सदस्य आहेत याचा आम्हाला ४ दिवसात अनेक वेळा प्रत्यय आला
होता. या सर्व सदस्यांना मोहीम पूर्ण केल्याचे प्रशस्तीपत्र देउन गौरवण्यात आले. श्रीदत्त
राउत यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सरतेशेवटी अध्यक्षीय भाषणात सदर मोहिमेला उदंड
प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानले. आणि व्यवस्था राखण्यात आमच्या काही चूका
झाल्या असतील त्याबद्दल सर्व सहभागी सदस्यांची माफी मगितली. सर्व सदस्यांनी उत्तम व्यवस्था
होती, माफी मागू नये असे एकमुखाने उत्तर दिले. शिवशौर्यच्या स्वयंसेवकांनी जी मेहनत
घेतली त्याचे या उत्तराने चीज झाले. चार दिवसाच्या प्रवासाचे वर्णन सर्वांनी लिहून
संस्थेकडे पाठवून द्यावे असे आवाहन मी केले. तसेच या चार दिवसात जुळलेले ऋणानुबंध कायम
राहू द्या हि सदिच्छा व्यक्त करून सह्याद्रीतील अतीखडतर मोहिमेची सांगता केली.
दिनांक : १५ ऑगस्ट २०१३
तालुका : वसई जिल्हा : ठाणे
मोहिमप्रमुख : श्रीदत्त राउत, वसई
सहभागी सदस्य : ६०
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी निर्माण केलेल्या हिंदुस्थानच्या पहिल्या ध्वजाला वंदन आणि
ट्रेक असा दुहेरी योग शिवशौर्यने १५ ऑगस्ट २०१३ या दिवशी जुळवून आणला. श्रीदत्त या
शिवशौर्यच्या सन्माननीय सदस्याच्या मदतीने आम्ही १५ ऑगस्ट २०१३ ला ट्रेकचे आयोजन केले.
सकाळी ९ वा. नरवीर चिमाजी आप्पा यांच्या पुतळ्यापाशी जमून सावरकरांनी निर्माण केलेल्या
हिंदुस्थानच्या पहिल्या ध्वजाला वंदन करून राष्ट्रगीत म्हटले. श्रीदत्त किल्ल्याचा
इतिहास उलगडून सांगत होता. आणि सर्व ६० जण ते मन लावून ऐकत किल्ला फिरत होती. हे इतिहास
मार्गदर्शन सायंकाळ पर्यंत सुरु होते. १५ ऑगस्ट असा सत्कारणी लागला.
दिनांक : २० ऑक्टोबर २०१३
तालुका : बदलापूर जिल्हा : ठाणे
मोहिमप्रमुख : शार्दुल खरपुडे, मुंबई
सहभागी सदस्य : २४
रविवार दि. २० ऑक्टोबर २०१३ रोजी शिवशौर्य ट्रेकर्सचा एक दिवसीय ट्रेक यशस्वी संपन्न
झाला. यशस्वी संपन्न झाला हे विशेष नाही तर मोहिमेचे सेनापतीच मोहिमेत नसताना शिवशौर्य
ट्रेकर्सची दुसरी फळी अत्यंत संयमाने आणि हुशारीने, आत्मविश्वासाने सर्वाना किल्ल्यावर
नेउन सुखरूप परत आणते, हे विशेष आहे. त्याबद्दल सौरभ केळसकर, गणेश पवार, आणि राहुल
कुलकर्णीचे यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. ट्रेकच्याच दिवशी मोहीम प्रमुख शार्दुल
खरपुडे याच्या मुलीला हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागल्यामुळे शार्दुल येउन परत गेला.
त्यानंतर मोहीम प्रमुख अध्यक्षांवर जबाबदारी पडली. बदलापूर स्टेशन पासून जीपने आम्ही
सर्व २४ जण चिंचोली गावात आलो. तिथून गावातून वाटाड्या घेऊन आम्ही सकाळी ९.३० वाजता
ट्रेक सुरु केला. लांब लचक पठार, त्यावर हिरवेगार गवत, त्यावर उगवलेली छोटी छोटी गवती
फुलं फोटो काढायला उदयुक्त करत होती. पठार संपून दाट जंगल सुरु झाले. चंदेरी किल्ल्यावर
जाणार्यांना उन्हाची झळ लागणार नाही अशीच निसर्गाने जंगलाची निर्मिती केली असावी. झाडांचा
पट्टा पार करून आम्ही कोरड्या ओढ्याच्या पात्रातून चढण चढू लागलो. तासभर चढून झाल्यावर
पात्रातील बोल्डर अधिक मोठ्या उंचीचे लागु लागले. सर्वात लहान असलेली राज्ञी ते मोठे
मोठे बोल्डर चढू शकत नव्हती त्यामुळे तिला प्रत्येक पावलावर चढवण्यासाठी दोन जणांना
कसरत करावी लागत होती. ट्रेकचा स्पीड राज्ञी मुळे कमी होत होता. त्यावेळी अमितने निर्णय
घेतला, राज्ञीला घेऊन परत फिरुया, बाकीच्यांना ट्रेक वेळेत पूर्ण करता येइल. आणि ते
दोघे पाठी फिरले. सर्वजण ३ वाजता किल्ल्याच्या गुहेत पोहोचले. गुहे मधेच शंकराचे मंदिर
आहे. मंदिराचा पुजारी गुहेतच वास्तव्याला असतो. गुहे जवळ दोन पाण्याची टाकं आहेत. त्यातील
पाणी पिण्या योग्य आहे. किल्ल्याच्या बालेकिल्यावर सहज जाता येत नाही. त्यासाठी क्लायबिंग
करूनच जावे लागते. काही स्थानिक शिवप्रेमींनी बालेकिल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा
बसवला आहे. थोडासा दम खाऊन घरून आणलेली शिदोरी सर्वांनी मोकळी केली. प्रत्येकालाच भूक
लागली होती. जेवून १५ मिनिटांची विश्रांती घेऊन सर्व परतीच्या उतरणीला लागले. तत्पूर्वी
गणेशने सहभागी सदस्यांच्या आग्रहानुसार संस्थेच्या आगामी मोहिमांची माहिती दिली. परतीचा
वाटेवर सूर्यास्त झाला होतो. वाट पटकन सापडत नव्हती. त्यातच दोन ग्रुप पडले. पण सर्वानीच
प्रसंगावधान आणि संयम राखून ट्रेक यशस्वी केला. ९.३० सुरु झालेला ट्रेक सायंकाळी ७
वा. यशस्वी पूर्ण झाला. ५ वर्षाच्या राज्ञी ने ट्रेक पूर्ण केला नसला तरी ८ वर्षाचा
आदर्श आणि १० वर्षाचा अथर्व या बंधूनी उत्कृष्टरित्या ट्रेक पूर्ण केलाच पण सर्वात
पुढे तेच असायचे. रविवारी tom and jerry बघण्या ऐवजी किल्ल्यावर नेणाऱ्या त्यांच्या
आई वडिलांचे म्हणजे औदुंबर आणि सुजाता बोबडे या दाम्पत्याचे विशेष कौतुक आहे. वाटाड्याच्या
घरी चहा पिऊन आम्ही आल्या वाहनाने बदलापूर स्टेशनला आलो. दिवसभराची निरव शांतता, शुद्ध
हवेला टाटा करून लोकलच्या गर्दीत शिरलो.
दिनांक : ८-९-१० नोव्हेंबर २०१३
तालुका : वसई जिल्हा : ठाणे
मोहिमप्रमुख : सागर खरपुडे, मुंबई
सहभागी सदस्य : ५८
ट्रेक वसई -पालघर परिसरातील १६ सागरी किल्ल्यांचा --मागोवा अज्ञात इतिहासाचा
सागर - पृथ्वीवरच्या प्रथम जिवाचे उत्पत्तिस्थान ....या सागरातच प्राथमिक सजीव सृष्टीचे
संवर्धन झाले. हा सागर जरी वरून शांत दिसत असला तरी असंख्य वर्षापासून अनेक घडामोडी
यात चालतात. धरणीकम्पामुळे एखादे नवीन बेट उदयास येते किंवा एखादे जुने बेट नाहीसे
होते किंवा मग एखादे पूर्वी बुडालेले बेट पुन्हा एकदा जगाच्या दृष्टीक्षेपात येते.
इतिहास संशोधक व एतेहासिक वास्तूंच्या बाबतीत देखील असेच घडते . फरक इतकाच आहे कि हे
धरणीकंप आपल्या ऐतेहासिक वास्तूंच्या अनास्थेमुळे घडले तर आपला ऐतिहासिक वारसा नष्ट
होतो. आणि जर हा धरणीकंप आपल्या इतिहासाच्या प्रेमामुळे झाला तर एखादे नवीन संशोधन
पुढे येउन दडवला गेलेला इतिहास लोकांसमोर येतो. म्हणूनच असे धरणीकंप इतिहास संशोधनासाठी
घडवायचे कि इतिहास नष्ट करण्यासाठी हे आपणच ठरवायचे. श्रीदत्त राउत यांच्यासारखे इतिहासप्रेमी
संशोधक जेव्हा आपल्या संशोधनाद्वारे असे धरणीकंप घडवतात . तेव्हा नवीन इतिहास समोर
येतो. हिंदू संस्कृतीची जाणीवपूर्वक लपवली गेलेली चिन्हे पुन्हा समोर येतात. असाच काहीसा
अनुभव वसई किल्ले मोहिमेबाबतीत आला. दिनांक ८ नोव्हेंबर २०१३ ला रात्री आम्ही वसई -पालघर
परिसरातील १६ किल्ल्यांच्या ऐतिहासिक सफरीसाठी बस ने निघालो. रात्री ११ वाजता आम्ही
वसई किल्ल्यात मुक्कामासाठी पोहोचलो. ९ तारखेला सकाळी ७.१५ ला आम्ही आमच्या ऐतेहासिक
ट्रेक साठी सज्ज झालो. " शिवशौर्य ट्रेकर्स " हि दुर्गप्रेमी संस्था व मार्गदर्शनासाठी
इतिहास संशोधक "श्रीदत्त राउत " यांच्या संयुक्त विद्यमाने नरवीर चिमाजी अप्पांच्या
किल्ले वसई मोहिमेप्रमाणे हा ट्रेक ठरविण्यात आला.
पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे तब्बल २०५ वर्षे उत्तर कोकणातील हिंदू जनतेवर मोठ्या प्रमाणात
धार्मिक , आर्थिक , सांस्कृतिक मूल्यांच्या पतनाचे संकट उभे राहिले. धार्मिक बाटवाबाट्वी.,
देवळांची नासधूस, हिंदू जनतेवर जाचक अटी, धर्मांतरासाठी छळ........ कोण रोखणार हे वादळ
?? हि जबाबदारी पहिल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पांवर येउन पडली.
वसई -पालघर परिसरातील किल्ले जिंकत जिंकत शेवटी वसई किल्ल्याला वेढा देऊन शेवटी २२
मार्च, १७३९ साली चिमाजी अप्पांनी वसई मोहीम फत्ते केली व पोर्तुगीजांच्या परकीय सत्तेला
मुळापासून उखडून टाकण्यात यश मिळवले. श्रीदत्त राउत यांच्या सोबत आम्ही प्रथम नागेश
तीर्थ शंकर मंदिरात गेलो. श्रीदत्त राउत यांनी आम्हास माहिती सांगण्यास सुरुवात केली.
कोणे एके काळी वसई चा किल्ला हे स्थान हिंदूंचे मोठे तीर्थस्थान म्हणून "नागेश तीर्थ"
या नावाने प्रसिद्ध होते. हिंदू असलेल्या भोंगळे राजाच्या ताब्यात हा किल्ला होता.
नंतर बहादुरशाहने तो बळकावला. पुढे १ वर्षानंतर तो पोर्तुगीजांच्या ताब्यात गेला. या
परिसरात शंकराची २१९ सुंदर मंदिरे होती. पोर्तुगीजांनी ती सर्व उध्वस्त केली. चिमाजी
अप्पांनी वसई मोहिमेनंतर नागेश तीर्थ शंकर मंदिराची उभारणी केली. पोर्तुगीजांनी वसई
किल्ला बांधला नसून मूळ वास्तूतच फेरबदल केले . म्हणूनच हिंदूंची सर्व चिन्हे आजही
वसई किल्ल्यात जागोजागी दिसतात. वसई च्या हिंदुत्वाचा प्रत्येक पुरावा जाणूनबुजून नष्ट
करण्याचा प्रयत्न केला तरीही हि हिंदुत्वाची चिन्हे वसई किल्ल्याचा खरा इतिहास दाखवतात
..गरज आहे ती डोळे उघडून बघण्याची ...
पुढे आम्ही टाऊन हॉल, साखर कारखाना, सैनिकांचे चर्च, होस्पितळ, हे सारे बघितले. वसई
चा किल्ला हा मुळात एक किल्ला नसून एखाद्या युरोपीय शहराप्रमाणे त्याची उभारणी केली
आहे . पुढे आम्ही बसने वज्रगडाकडे कूच केले. आपल्या अनास्थेचा प्रतिक असणारा हा किल्ला
आज "ठाकूर" आडनावाच्या स्थानीक व्यक्तीची खाजगी मालमत्ता होऊन बसला आहे . वसई मोहिमेत
मराठा सैनिकांच्या देखभालीची व्यवस्था ह्या किल्ल्यावर करण्यात आली होती. गडाला बुरुज
असून गडावर तळघर आहे. पुढे आम्ही कालिका मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. पुढे अर्नाळा
गावी पोचलो. वैतरणा खाडीच्या मुखाशी अर्नाळा हे गाव आहे. ह्या गावी बहुसंख्य ख्रिस्ती
कोळ्यांची वस्ती आहे. मुळचे हिंदू असलेले हे लोक पुढे छळाने किंवा आमिष दाखवून ख्रिस्ती
झाले असतील. अजूनही पाद्री लोकांची धर्मांतरे चालूच आहेत. आपल्या हिंदू लोकांना कधी
जाग येणार ?? देवालाच ठाऊक .. वाटेत आम्हाला "प्रथम ख्रिस्त संस्कार "अर्थात "बाप्तिस्मा
" घेतलेल्या लहान मुलामुलींचे फोटो असेलेले फलक दिसले. पुढे आम्ही होडीद्वारे भर समुद्रातील
अर्नाळा किल्ल्यात पोहोचलो .
वैतरणा हि पुराणात उल्लेखलेली स्वर्ग व नरक यांच्यातील सीमारेषा आहे. अर्नाळा --- अर
म्हणजे अलीकडील बाजू व पलीकडील बाजू यामधील नाळ म्हणजे पाण्याचा प्रवाह व त्या प्रवाहातील
मार्ग . धर्मांध नरक प्रदेशाच्या मुखाशी अर्नाळा बेट होते . पोर्तुगीजांच्या धर्मांध
सत्तेला नष्ट करण्यासाठी अर्नाळा बेट ताब्यात घेणे गरजेचे होते. अर्नाळा किल्ला पहात
असताना त्यात आपल्याला शनिवार वाड्याची छाप दिसून येते. अर्नाळा बेट जिंकल्यानंतर त्यावर
किल्ला बांधला गेला. प्रवेशद्वाराच्या दोन्ही अंगास गजव्याल व शरभ यांची शिल्पे , देवनागरी
भाषेतील शिलालेख आणि फुलांच्या वेल्बुत्तीचे नक्षीकाम मराठ्यांच्या वैभवशाली इतिहासाची
जाणीव करून देते. प्रवेशद्वारात आम्ही वीरमरण स्वीकारलेल्या महादजी फडके या विराला
दोन मिनिटे शांत उभे राहून मानवंदना दिली. पुढे जय - विजय बुरुज, भवानी मार्तंड बुरुज
पाहिले. बुरुजातील भुयारी जिन्याने उतरताना खूप छान वाटत होते. पुढे भवानी गडाकडे वाटचाल
करत असताना जंगलामध्ये रस्त्यालगत असलेल्या एखाद्या गढीप्रमाणे दिसणाऱ्या दहिसरच्या
किल्ल्याचे दर्शन घेतले. एद्वनचा कोट, पारगावचा किल्ला ह्यांसारखे छोटे किल्ले हे मुळात
टेहेळणीचे व वसई किल्ल्याचे संरक्षक किल्ले होते. पुढे वसई मोहिमेसाठी मराठ्यांनी बांधलेल्या
भवानी गडावर गेलो. या गडाची उभारणी चुना न वापरता एकावर एक दगड रचून केली होती. कोणे
एके काळी ऋषींच्या तपासाठी असलेली हि जागा आज एक दुर्लक्षित किल्ला म्हणून अस्तित्वात
आहे. सरकार दप्तरी "भवानी गड" नावाचा किल्ला देखील अस्तित्वात नाही हि आपल्यासाठी शरमेची
गोष्ट आहे. सरकारी दप्तरी नोंद असलेल्या किल्ल्यांचे जतन सरकारला करता येत नाही मग
नोंद नसलेल्या किल्ल्यांचे जतन सरकार काय करणार ??? अशावेळी आपली जबाबदारी बनते कि
अशा किल्ल्यांचे संवर्धन करण्याची ..अन्यथा आपल्या अनास्थेमुळे हा किल्ला हि खाजगी
मालमत्ता होईल किंवा काळाच्या तोंडी पडून नष्ट होईल.
आता जवळ जवळ दुपारचे ३.१५ वाजले होते . भवानी गड उतरताना सर्वांना सपाटून भुका लागल्या
होत्या. १५ मिनिटानंतर आम्ही केळवा येथे जेवण करावयास गेलो. भोजन झाल्यानंतर दांडा
किल्ल्याची वास्तू बघितली. हि वास्तू अजून वेदिस्थान / प्रार्थनास्थळाची खोबणी, कार्यालयाचे
अवशेष , भोवतालच्या कोटाची एकमेव उंच भिंत, चौकोनी विहीर इत्यादी अवशेष जपून आहे ..
आज ह्या वास्तुचा वापर शौचालय म्हणून होतो. पुढे दांडा किल्ल्याची मुस्लिम आळीतील वास्तू
अर्थात कित्तल कोट हि वास्तू बघितली . वाटेत आम्हाला असंख्य कचरा आणि मानवी विष्टा
चुकवत चुकवत जावे लागले. पोर्तुगीजांचे कायदे ज्या वास्तूत तयार होत त्याची अवस्था
आज शौचालय व कचर्याचा डब्बा या प्रमाणे झाली आहे . हा पोर्तुगीजांच्या गव्हर्नराचा
वाडा होता. त्यामुळे त्या कोटातील काही जागा आम्ही पाहू शकलो नाही. नीतीमुळे पुरातत्वखाते
हि यावर कारवाई करत नाही. " तोंड दाबून बुक्यांचा मार " हि वस्तू आज सहन करत आहे. पुढे
पोर्तुगीज वखार असलेली "केळवे कस्टम भाग- २" हि वास्तू पाहिली . हि वास्तू चर्च प्रमाणे
दिसत असल्यामुळे ख्रिश्चन चर्च संस्थांनी ते चर्च आहे असे घोषित करून शेजारी अजून एक
चर्च देखील बांधून टाकले आणि पुरातत्व खाते ..... ते नेहमीप्रमाणे निष्क्रियच राहिले
...पण ह्या गोष्टी आपण कोणाला सांगायचे नाहीत कारण ढोंगी सेक्युलरांच्या मते आपण त्यामुळे
आपण सेकुलर अर्थात धर्मनिरपेक्ष राहत नाही.
आता संध्याकाळ झाली होती. तेव्हा जिथे प्रत्यक्ष मराठी सैन्य व पोर्तुगीज सैनिक यांच्यात
मुष्टियुद्ध सुरु झाले त्या केळवा समुद्र किनार्यावरच श्रीदत्त राउत यांच्या सोबत शंका
निरसनाचा कार्यक्रम सुरु झाला . गडद अंधारात सर्व जन भान हरपून आपले शंका निरसन करीत
होते. कोणालाही तेथून उठण्याची इच्छा मात्र होत नव्हती. पुढे ध्येयमंत्र व राष्ट्रगीत
घेऊन आम्ही तो कार्यक्रम संपवला. रविवार १० नोव्हेंबर, २०१३ ...शेवटचा दिवस उजाडला.
सकाळी आम्ही बिंब राजाच्या महिकावती नगरीच्या चौकीच्या ठिकाणी अर्थात केळवे भुईकोटाकडे
गेलो. श्रीदत्त राउत यांनी हा किल्ला चारी बाजूंनी अक्षरशः खणून काढला . त्यामुळे निदान
आम्हाला उभ्या उभ्या तरी प्रवेशद्वारातून प्रवेश करता आला. नाहीतर आधी सरपटत प्रवेश
करावा लागायचा. आता समुद्राला ओहोटी लागली होती. तडक केळवे जलकोट गाठायचा होता. अथांग
सागराच्या मऊशार वाळूवरून चाललेली शिवशौर्य ट्रेकर्सच्या मावळ्यांची रांग पाहून चिमाजी
अप्पांच्या मावळेच जणू केळवे जलकोट घ्यायला चालले आहेत असे वाटत होते. जलदुर्गाची वास्तू
चढणे सर्वांनाच चढणे सोपे नव्हते. तेव्हा स्वतः श्रीदत्त राउत व शिवशौर्य ट्रेकर्स
चे सलिल मांदरेकर व रोहित दीक्षित सर्वांना आधार देऊन चढवत होते. किल्ल्यातील गार वारा
शरीराला आणि मनाला सुखावत होता . श्रीदत्त राउत यांनी वसई विजय दिनानिमित्त सुरु केलेल्या
देवीच्या पालखीची सुरुवात वसई किल्ल्यापासून होते व समाप्ती केळवे जलदुर्गात होते.
ब्रिटिशांनी बंद केलेली हि पालखी श्रीदत्त राउत यांनी पुन्हा सुरु केली. ह्यावर्षी
ह्या पालखीला १९००० लोक होती. आणि प्रत्येकवर्षी हि संख्या वाढतच जाणार. हा जलकोट आम्ही
दोरीच्या साह्याने उतरलो. पुढे चालत केळवा समुद्रकिनारी जाऊन लगेच बस गाठली .
पुढे माहीम येथील चतुःशृंगी मंदिर व भवानी मंदिराचे दर्शन घेतले. चतुःशृंगी मंदिरात
देवीचे संक्रांति , किंक्रांती, असे वेगवेगळ्या तिथीनुसार तसेच राक्षसाचे मुखवटे ठेवले
होते. गोव्यातील कार्निवल मध्ये अशा प्रकारचेच मुखवटे वापरले जातात. ह्या कार्निवलचे
मूळ हे ह्या प्रदेशातील संस्कृतीत आहे हे आपणास यावरून कळून चुकते. पुढे माहीम गव्हर्नर
कोटाकडे निघालो. पण पोटा-पाण्याची सोय प्रथम करायची असल्यामुळे शार्दुल दादा व अमित
मेंगळे असे जेवण आणण्यासाठी निघालो. वाटेत ज्येष्ठ कवी, लेखक व साहित्यिक 'रघुनाथ माधव
पाटील' यांची केळवे गावात भेट घेतली. त्यांनी आंदोलन करून स्थानीक शेतकऱ्यांच्या मालाला
योग्य बाजारभाव मिळवून दिला होता. अशा थोर व्यक्तींचे आशीर्वाद आम्हास लाभल्यामुळे
खूप धन्य वाटत होते. आम्ही जेवण आणेपर्यंत बाकीच्यांचे माहीम येथील गवर्नर कोट व इतर
मंदिरे पाहून झाली होती. श्रीदत्त राउत यांच्या दुर्गसंवर्धनापुर्वी ह्या किल्ल्याचा
वापर केळवे सरकारी रुग्नालयामार्फत पोस्तमार्प्तन नंतर उरलेले मानवी अवयव टाकण्यात
व्हायचा. श्रीदत्त राउत यांनी स्वच्छता मोहिमेसाठी गावकऱ्यांची मदत मागितली. ती त्यांना
नाकारण्यात आली. मग श्रीदत्त राउत यांनी स्वतः एकट्याने हातमोजे घालून ते अवयव उचलण्यात
सुरवात केली. याचा परीणाम असा झाला कि दुसर्याच दिवशी सरपंचाच्या पुढाकाराने किल्ला
स्वच्छ केला गेला व किल्ल्याच्या आवारात सुंदर बाग तयार केली गेली. आज माहीम चा किल्ला
जो काही सुंदर दिसतो याचे सारे श्रेय श्रीदत्त राउत यांना जाते. पुढे रामायण कालीन
महिकावती देवीचे मंदिर पहिले. अहि -बिंब व मही- बिंब ह्या दोन राक्षसांनी राम -लक्ष्मणाचे
अपहरण केले होते . त्यावेळी महिकावती देवी व हनुमान यांच्यात युद्ध झाले . हनुमानाने
देवीला जमिनीत गाडले. आजही ती देवी त्याच स्वरुपात आहे. जमिनिबाहेर येऊ पहाणार्या अवस्थेत
देवीचे मुख आहे. हि कथा श्रीदत्त राउत यांनी ऐकवली. बळी देण्यासाठी जी शिळा होती. ती
अजूनही दुर्लक्षित अवस्थेत तिथेच आहे. पुढे शिरगाव किल्ल्यात आम्ही सारे शिरलो. शिरगाव
किल्ल्यात ४ बुरुज व एक तोफ आहे. किल्ल्यावर बऱ्याच प्रमाणात साफसफाई व नुतनीकरण झाल्याने
वास्तू अवशेष चांगल्या प्रमाणात पाहता येतात. गडावरील चोर वाटेने जाताना खूप रोमांचक
वाटते. तटबंदीवर माहुली किल्ल्यावरील उध्वस्त मंदिराचे शिल्पे दिसतात. पूर्ण किल्ला
पाहण्यास एकतास पुरेसा आहे. ठाणे, पुणे, नाशिक, डोंबिवली, मुंबई असे सर्व ठिकाणचे मिळून
आम्ही ५८ जन सर्व वयोगटातील ट्रेक पाहण्यासाठी आलो होतो. सर्वांनी एकमेकांना खूप सहकार्य
केले. ५ वाजता आम्ही प्रेरणामंत्र व राष्ट्रगीत म्हणून कार्यक्रमाचा समारोप केला. त्या
वेळी काही जणांनी आप आपले मनोगत त्यावेळी व्यक्त केले. वसई - पालघर ट्रेक ने आम्हाला
बऱ्याचशा नवीन गोष्टी कळल्या. उदाहरणार्थ: अर्नाळा किल्ला हा मराठ्यांचा ब्रीतीशांकडून
घेतला गेलेला शेवटचा किल्ला होता. आम्हाला मराठ्यांचे सांकेतिक कोड कळले . धर्माच्या
नावावरती चालणारी राजकारणे, अज्ञानीपने जर नुतनीकरण केले तर वस्तू जतन न होता कशी नष्ट
होते ते कळले. केवळ परधर्मीय आहेत म्हणून त्यांनी चालवलेली ऐतेहासिक वास्तूंची नासधूस
व सरकारची वोट बँकेकडे पाहून आलेली निष्क्रियता कळली. मराठ्यांचा पराक्रम कळला तसाच
ऐतिहासिक वारसा जपावा म्हणून श्रीदत्त राउत यांनी चालवलेला एकाकी लढा देखील कळला. स्वराज्याच्या
उभारणीच्या काळात अनेक माणसांनी आपल्या सुखाचा त्याग स्वराज्यासाठी केला. तो काळ संपला.
ती माणसे गेली. आताच्या युगात आपल्याला असे वाटेल खरेच अशी निष्ठा, असा त्याग असणारी
माणसे संपली आहेत का ??? पण तसे नाही. हिंदू या नात्याने माझा पुनर्जन्मावर विश्वास
आहे. देह नष्ट झाला तरी आत्मा आपल्या इच्छा - आकांक्षा नव्या देहाद्वारे पूर्ण करतो.
त्यामुळेच स्वताचा सुखाचा त्याग करून स्वतचा ऐतेहासिक वारसा जपण्यासाठी श्रीदत्त राउत
सारखी माणसे जन्माला येतात. 'राज्याचे सार म्हणजे दुर्ग' असे मानणार्या महाराजांचे
कार्य म्हणजे आपला ऐतेहासिक वारसा जपून आपली अस्मिता जागृत ठेवणे हाच आहे. हे कार्य
प्रत्येकाने आप आपल्या क्षेत्रात राहून स्वताच्या क्षमतेनुसार करावयाचे आहे .हे जाणून
घेणे हाच या ट्रेक चा उद्देश होता. या ट्रेक ने जसा सर्वांना आनंद दिला तसेच अंतर्मुख
हि केले. हि अंतर्मुखता कायम राहून ह्यातून काहीतरी चांगले घडेल हीच मोरया चरणी प्रार्थना.
दिनांक : ३० नोव्हेंबर-१ डिसेंबर २०१३
तालुका : पोलादपूर, वाई जिल्हा : रायगड, सातारा
मोहिमप्रमुख : सौरभ केळसकर , मुंबई
सहभागी सदस्य : ३५
29 नोव्हेंबरला रात्री खाजगी बसने शिवशौर्य ट्रेकर्स पोलादपूरच्या दिशेने रवाना झाले.
बस मधेच ऋतुराज पटवर्धन आणि राजू जाधव यांचा वाढदिवस झोकात साजरा केला. रुतुराज आणि
राजू या दोघानाही surprise होत. पोलादपूर नंतर आमची बस तानाजी मालुसरेंच्या उमरठ गावाच्या
दिशेने वळली. पाहते ४ वाजता अंधारात तानाजी मालुसरेंच्या समाधीचे दर्शन बस मधूनच घेतले
आणि बस पुढे ढवळ्या गावाच्या दिशेने निघाली. थोड्याच वेळात ढवळे गावात देरे दाखल झालो.
अपेक्षित थंडी नव्हती. गावातील रवींद्र या माणसाच्या घरी आम्ही चहा बिस्किटे घेऊन,
ट्रेक साठी तयार झालो. अमितने सर्वाना चोक्लेट्स, संत्री देऊ केले. सर्वजण ट्रेक साठी
तयार झाले. सर्वाना ट्रेक संबंधी सूचना दिल्या गेल्या आणि ६ वाजताच्या अंधारात, बोचर्या
थंडीत २९ ट्रेकर्स चंद्रगडाकडे सरकले. दीड दोन तासाच्या उभ्या चढणी नंतर आम्ही चंद्रगडावर
पोहोचलो. जावळीच्या चंद्रराव मोरेंच्या ताब्यात होता म्हणून हा चंद्रगड. तसेच हा ढवळ्या
गड म्हणून पण ओळखला जातो. गडावर शंकराची पिंडी, त्यासमोर नंदी आहे. महाशिवरात्रीला
पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी गडावर जमते. ढवळे गावात पालखी निघते, महाप्रसाद असतो.
गडाची तटबंदी काही प्रमाणात पण चांगल्या अवस्थेत आहे. दोन पाण्याच्या टाक्या आहेत.
गडाच्या सभोवताली कांगोरी गड, मकरंद गड, प्रतापगड आहेत. शिवाय वरंधा घाट, पारघाट आणि
महाबळेश्वर, चकदेव, पर्बत हि शिवालये आहेत. १६५६ मध्ये शिवाजी महाराजांनी जावळी जिंकली
आणि चंद्रगड स्वराज्यात दाखल झाला.
चंद्रगडावर प्रत्येकाने घरून आणलेला नाश्ता करून आम्ही जावळीच्या खोर्यात घुसलो. चंद्रगडाचा
उतार इतका तीव्र आहे आहे कि प्रत्येक पावलाला हाताचा वापर करून वाटेतील प्रत्येक झाडाचा
आधार घेऊनच उतरलो. त्यानंतर मोठ्या खडकांचा उतार लागला. हे सर्व उत्तरायण दीड दोन तास
चालु होते. त्यानंतर सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. त्यानंतर दुसर्या डोंगराची चढण
सुरु झाली. दुपारी ३.३० वाजता आम्ही भैरीच्या घुमटी या ठिकाणी पोहचलो. इथे भैरी देवाचे
छोटेसे मंदिर आहे. इथे पाण्याचे टाके आहे. चंद्रगड ते आर्थर सीट या संपूर्ण मार्गात
जानेवारी फेब्रुवारी नंतर पाणी मिळत नाही पण या टाक्यांचे पाणी १२ महिने असते. भैरी
देवाचा महिमा. आम्ही इथेच पिठलं - भाकरी - ठेच्याचे पोटभर जेवण केले. आणि पुन्हा चढण
चढायला सज्ज झालो. आता ४.३० वाजले होते. अंधार व्हायच्या आत आर्थर सीट गाठण आवश्यक
होत. थोड्याच वेळात आम्हाला लांबवर समोर आर्थर सीट दिसली आणि उजव्या बाजूला प्रतापगड
दिसला. आर्थर सीटच्या पायाशी आलो आणी सूर्यदेवाने आमचा निरोप घेतला. शेवटी १२ फुटाचा
कातळकडा दोरीच्या सहाय्याने चढून ७ वाजता आर्थर सीट वर पोहोचलो. सर्वच सुखरूपणे, यशस्वीपणे
इच्छित स्थळी पोहोचले याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर होता. शिवरायांनी चंद्रराव मोरेंचे
शब्द कधीही खरे होऊ दिले नव्हते... पण, त्या शब्दांची प्रचीती घेणं आजंही आपल्याला
ते सहज शक्य आहे.. पूर्वतयारीशिवाय, अनुभवाशिवाय अन् नियोजनाशिवाय जावळीत चंद्रगडावर-ढवळेघाटात
घुसून तर बघा.. कसे फसताय ते अनुभवालंच, अन् अचानक ऐकू येईल चंद्रराव मोरेंची आकाशवाणी,
‘येता जावली, जाता गोवली.
दिनांक : १-२ फेब्रुवारी २०१४
तालुका : मावळ, पाली सुधागड जिल्हा : पुणे, रायगड
मोहिमप्रमुख : गणेश पवार, सातारा
सहभागी सदस्य : ४३
शिवशौर्यचा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला उंबरखिंडीचा ट्रेक जाहीर झाला आणि इच्छुकांची
नाव नोंदणी सुरु झाली. आमचीही तयारी सुरु झाली. अमित आणि संघमित्रा राहण्याची, जेवणाची
व्यवस्था लोहगड येथे करून आलो. नंतर अमित आणि गणेश उंबरखिंडीच्या मार्गावर marking
करून आले. शुक्रवार ३१ जानेवारीच्या रात्री मुंबईहून लोहगडाकडे प्रयाण केले. मुंबई,
नवी मुंबई, नाशिक, मनमाड, पुणे येथून विविध वयोगटातील लहान मुले, स्त्री, पुरुष ट्रेकर्स
सहभागी झाले होते. पहाटे ४ वाजता आम्ही लोहगडवाडी येथे खानावळ वजा घरात डेरा टाकला.
सर्वजण मिळेल तिथे आडवे झाले. सर्वाना ६ वाजता उठवले गेले. आमचा दिनक्रम सुरु झाला.
चहा बिस्कीट पोटात ढकलून शिवाजी महाराज्यांच्या मूर्ती समोर प्रेरणा मंत्र म्हणून किल्ले
विसापूरच्या दिशेने सरकलो. २० मिनिटे चालून गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथून दाट झाडीतून
चढण सुरु झाली. ३० मिनिटे चढून आम्ही गडावर पोहोचलो. सर्वात लहान आदर्श वय वर्ष ७ आणि
सर्वात ज्येष्ठ वय वर्ष ७० असलेले श्री. उत्तम खेडकर यांनी कुठेही जास्तीचा वेळ न लावता
सर्वाबरोबरच गड सर केला. गडावर जाऊन आम्ही आपापल्या घरून आणलेली शिदोरी उघडली. सर्वांची
ओळख झाली, नाश्त्याचे आदान प्रदान करत पोटपूजा आटोपली गेली. तटबंदी वरून गड प्रदक्षिणा
सुरु केली. किल्ल्याची तटबंदी उत्तम स्वरूपात आहे. पाण्याची असंख्य टाकी जागोजागी आढळतात.
पूर्वी गडावर भरपूर लोकांचा राबता असावा असा अंदाज पाण्याच्या साठ्यावरून येतो. तटबंदीला
असलेला बुरुज, जंग्या चांगल्या अवस्थेत आहेत. हनुमानाच्या तीन मुर्त्या, ३ जाते, १
तोफ, २ वाड्याचे अवशेष असे गडाचे वैभव आहे. शिवकालीन बांधकामानुसार गडावर शौचकुपेही
आढळतात. विसापूर किल्ल्यावरून लोहगड, तुंग, तिकोना, नागफणी, एकविरा, मुंबई-पुणे द्रुतगती
महामार्ग / लोहमार्ग स्पष्ट दिसतात. १.३० तासाने गड प्रदक्षीणा पूर्ण करून आम्ही गड
उतरायला घेतला. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण घेऊन १५ मिनिटाच्या विश्रांती नंतर आम्ही
लोहगडाकडे रवाना झालो. २० मिनिटात गडावर पोहोचलो. उत्तम स्तिथीत असलेला देखणा दरवाजा
हे लोह्गडाचे वैशिट्य आहे. तसेच गडाला विंचवाची नांगी भासणारी सोंड नैसर्गिकरित्या
प्राप्त झाली आहे. त्याला विंचू काटा असे म्हणतात. गडावर तोफा पाहायला मिळाल्या, स्वछ
अशी लोमेश ऋषींची गुहा आहे. लक्ष्मि कोठी आहे. एक भली मोठी बांधीव विहीर आहे. हे सर्व
मनात आणि क्यामेरात साठवून सूर्यास्ताच्या आतच गड उतरलो. fresh होण्यासाठी गावात विहीर
होतीच. थंड पाण्याने काहींच्या आंघोळीही झाल्या. त्यानंतर चहा घेत गप्पांचा फड रंगला.
मी सर्वाना आपापली मन मोकळी करायला सांगितली. त्यांना हे हि सांगितले कि ट्रेक मध्ये
असा वेळ क्वचितच मिळतो. त्यामुळे तुम्ही हा शिवशौर्य कट्टा समजून कुठल्याही विषयावर
बोला. माझ्या आवाहनाप्रमाणे सर्व सदस्यांनी मोकळे पणाने गप्पा मारल्या. सुरवातीला Mumbai
RTO मध्ये अधिकारी असलेले श्री. कांबळे यांनी सरकारी कामाचा पण चांगला पैलू आमच्या
निदर्शनास आणून दिला. तसेच BEST मध्ये असलेले श्री. बीडू यांनीदेखील त्यांच्या कार्यालयीन
कामाची माहिती दिली. शिवाजी महाराजांच्या विविध विषयांवरील भूमिकेवर चर्चा झाली. शिवकालीन
परिस्थिती, स्वातंत्र्यपूर्वकालीन परिस्थिती आणि आजची सामाजिक परिस्थिती याविषयावर
सर्वच उत्स्फुर्तपणे बोलत होते. विशेष म्हणजे ७-११-१२-१३ वयाच्या लहान मुलांनीपण आपली
मत नोंदवली. शिवशौर्यच्या आता पर्यंतच्या ट्रेक मध्ये एवढा निवांत वेळ मिळाला नव्हता
आणि एवढी बौद्धिक चर्चा सुद्धा झाली नव्हती. जेवणाची वेळ झाली तरी गप्पा सम्पल्या नाहीतच
पण जेवल्या नंतरही काही जण शेकोटी करून गप्पात बुडाले होते. रात्री ११ वाजता शेकोटीची
उब घेत, चहा घेऊन आम्ही झोपायला गेलो.
रविवार २ फेब्रुवारी आजच्या दिवशी ३५३ वर्षापूर्वी उंबरखिंडीची लढाई झाली होती. आम्ही
बसने कुर्वंड्या गावाकडे गेलो. आता या मोहिएत अजून काही जण सामील झाले होते. त्यात
५ वर्षाची राज्ञी सुद्धा होती. किरण शेलार या आमच्या मित्राने उंबरखिंडीचा भूगोल आणि
इतिहास सर्वाना समजावून सांगितला. ४ तासाच्या आम्बेनलि घाटाने उतरून आम्ही आंबा नदी
ओलांडून छावणी गाव मार्गे उंबरखिंडीत पोहोचलो. स्थानिक शिवप्रेमींनी मोठ्या कार्यक्रमाचं
आयोजन उंबरखिंडीत केले होते. आम्ही शिवस्मारकापाशी नतमस्तक झालो. कारतलाब खानाच्या
१० हजार सैन्यानिशी महाराजांनी १ हजार सैन्यानिशी लढा दिला. रक्ताचा एकही थेंब न सांडता.
शत्रूला चारी मुंड्या चित करून स्वराज्याच्या सम्पतित २० दशलक्ष होनांची भर घातली गेली.
हा विजय शिवाजी महाराज्यांच्या बुद्धीचातुर्याचा होता. आपल्याला गरज आहे ती पक्त अश्या
समरभूमीवर जाऊन आपल्यात महाराजांच्या अंश रुजवण्याची. प्रेरणामंत्र म्हणून आम्ही पवित्र
ट्रेकची सांगता केली. शिवशौर्यची २२वी मोहीम यशस्वी झाली.
दिनांक : १८-१९-२० एप्रिल २०१४
तालुका : मालवण, देवगड, वेंगुर्ला,जिल्हा : सिंधुदुर्ग
मोहिमप्रमुख : गुरुनाथ मयेकर, मुंबई
सहभागी सदस्य : ६६
रेल्वे बुकिंगचे महा सोपस्कार दोन महिन्यांपूर्वी आटपून आम्ही शिवशौर्य ट्रेकर्स गुरुवारी
१७ एप्रिलला मंगलोर एक्स्प्रेसने मुंबईहून निघालो. सकाळी कणकवली स्थानकात उतरून आधीच
ठरवलेल्या ३ बसेस आणि एक Wagon R चा ताफा विजयदुर्ग किल्ल्याकडे रवाना झाला. नाश्ता
करून आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. स्थानिक गाईड महेंद्र याने संपूर्ण किल्ला दाखवला.
किल्ल्याची खडान खडा माहिती मिळाली. महेंद्र फक्त पोट भरण्यासाठी हे सर्व करत नव्हता
हे त्याच्या बोलण्यातून जाणवत होते. घेरिया नावाचा किल्ला विजय संवत्सर महाराज यांच्या
कारकिर्दीत इ स १५७५ मध्ये बांधला गेला. शिवाजी महाराजांची कोकण प्रांतातील "विजयी"
मोहिम चालू होती. त्याच मालिकेतील हा शेवटचा विजय घेरियाचा. म्हणून महाराजांनी त्याचे
नामकरण विजयदुर्ग केले.
विजयदुर्ग नंतर आम्ही देवगडच्या दिशेने निघालो. वाटेत विमलेश्वर मंदिरात गेलो. त्या
मंदिराच्या भोवताली असलेल्या निसर्गरम्य परिसराबद्दल लिहिण्यासाठी शब्द नाहित. ते प्रत्यक्ष
जाऊन पाहणेच उचित ठरेल. देवगड गावात आम्ही जेवून घेतले आणि किल्ल्याच्या दिशेने निघालो.
किल्ल्याच्या तटबंदीवरून प्रदक्षिणा मारली. किल्ल्याचा फारसा इतिहास उपलब्ध नाही. देवबागच्या
वाटेवर दाभोळे गावातील पोखरबाव मंदिराला भेट दिली. मंदिराच्या खाली गुहा, त्यात पाणी,
गोमुख आणि शिवलिंग जबर्दस्त… आता आम्ही देवबाग येथील मुक्कामाची वाट धरली. श्री. पेडणेकर
यांच्या घरी आम्ही पोहोचलो. घर नव्हे जुना रुब्बाब असलेला दुमजली वाडा होता. हा वाडा
कर्ली नदीच्या किनाऱ्यावर होता. वाळूचे अंगण, ताडाची माडाची झाडे होती. विहिरीच्या
पाण्याने आंघोळ करून fresh होऊन बैठक जमली. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पेण, अलिबाग,
नागपूर येथून आलेल्या ट्रेकर्सची ओळख झाली. मैत्री व्हायला कितीसा वेळ लागतोय. गाण्याची
अशी काही मैफिल जमली कि जेवणासाठी ती थांबवावी लागली. त्यातही अविनाश यांची गाणी धमाल
होती. बच्चे कंपनी वाळूत किल्ला बनवण्यात रमली होती. शेवटी १२ वाजता कोणी घरात, कोणी
वाळूत अंथरूण पसरून झोपी गेले. सुखाची झोप त्या टुमदार घरात. शनिवारी सकाळी जाग आली
ती पक्ष्यांच्या किलबिलाटाने आणि कर्ली नदीतून जाणाऱ्या मच्चीमारी बोटींच्या आवाजाने.
आन्हिक उरकून आम्ही मालवण गावात असलेल्या मोहीम प्रमुख गुरुनाथ याच्या घरी गेलो. इडली
चटणीवर यथेच्छ ताव मारून आम्ही बोटीने सिंधुदुर्ग किल्ल्यात पोहोचलो. किल्ला फिरता
फिरता आम्ही शिवाजी महाराजांच्या मंदिरात गेलो. ऊच्च स्वरात शिवरायांची आरती म्हटली.
ध्येय मंत्र, प्रेरणा मंत्र म्हटला. निश्चयाचा महामेरू म्हटले गेले. त्या नंतर बहुतेकांनी
स्कुबा आणि स्नोर्केलिंग केले. समुद्राच्या तळाशी जाऊन खालील जग न्याहाळणे हा एक विलक्षण
अनुभव होता. वायरी गावात घरगुती जेवण जेवून आम्ही किल्ले निवतीला गेलो. संध्याकाळ झाली
होती. किल्ल्यावर पोहोचलो आणि सर्यास्त झाला. किल्ला आकाराने खूपच छोटा आहे. शिवाजी
महाराजांनी वेंगुर्ला बंदरावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधला. वरून निवती गाव बघितले
तर असे वाटते कि आपण कुठल्यातरी foreign location वर आहोत. आमचा आजचा मुक्काम मेढा
निवती या गावात होता. मुक्कामाचे हॉटेल कालच्या मुक्काम प्रमाणे वाळूतच होते. त्यामुळे
चालू वय विसरून लंगडी, डॉच बॉल, रस्सीखेच खेळ बराच वेळ सुरु होते. ज्याला निवांत वेळ
हवा होता तो वाळूत पाय पसरून समुद्राची गांज ऐकत बसून होता. काहीजण गप्पा मारत होते.
जेवून झाल्यावर एक टोळकं भुताच्या कथा कथन करत होते. शिवशौर्यची २४वी मोहिम यशस्वी
तर झालीच पण लहानपणी सुट्टीत गावाला केलेली धमाल पुन्हा सर्वांना अनुभवायला मिळाली….
आताचं वय विसरून … बालपण दे गा देवा (शिवशौर्य) या ओळीचा प्रत्यय आला. आजही वाळूच्या
गादीवर झोपलो. सकाळी उठल्यावर, आज परतीचा दिवस आहे हि जाणीव अस्वस्थ करीत होती. बसने
आम्ही रेडी येथील यशवंत गडावर गेलो. इ स ६१० ते ६११ मध्ये चालुक्य राजा स्वामीराजाचे
रेडी हे प्रमुख व्यापारी केंद्र होते. त्या काळी हा किल्ला बांधण्यात आला असावा. थोड्याच
अंतरावर असलेल्या वेतोबाचेही दर्शन आम्ही घेतले. त्या देवाला कोल्हापुरी चप्पल वाहिली
जाते. आणि दुसर्या दिवशी झिजलेली चप्पल पहावयास मिळते. मंदिरात झिजलेल्या चपला पाहायला
मिळाल्या. समोरच सातेरी देविचेही मंदिर आहे. वेंगुर्ला मार्केट मध्ये येउन दुपारचे
जेवण घेतले. आता प्रवास होता आपापल्या घरट्याकडे. तीन दिवसाच्या आठवणी सोबत घेऊन!
तालुका : बोरीवली,जिल्हा : मुंबई
मोहिमप्रमुख : अमित मेंगळे, मुंबई
सहभागी सदस्य : ५६
शिवशौर्य ट्रेकर्सनी आतापर्यंत मुंबईच्या बाहेर २१ मोहिमा आयोजित करून त्या यशस्वी
केल्या. २०१० पासून आजच्या २०१४ पर्यंत सागरीदुर्ग, भुईकोट, डोंगरी किल्य्यांची ओळख
लोकांना करून देत असताना सतत जाणीव होत होती कि ज्यांना मुळातच गिर्यारोहणाची आवड आहे
तेच treking करतात. ज्यांची शहरी वातावरणातून बाहेर पडून trek काय आणि कसा असतो माहित
नाही त्यांच्या साठी काहीतरी केले पाहिजे, त्यांना treking हि आवड निर्माण कशी होईल
ते पाहिले पाहिजे. आणि म्हणूनच शहरातच पण निसर्गाच्या सानिध्यात एक दिवस घालवण्यासाठी
शिवशौर्य ट्रेकर्सने गिर्यारोहण शिबीर बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानात आयोजित केले.
नेहमी प्रमाणेच याही मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळाला. वय वर्ष ३ पासून ते वय वर्ष ५८
पर्यंतचे असे ६० जण यात सहभागी झाले. प्रत्येक सदस्याची ओळख झाल्या नंतर गिर्यारोहणात
उपयोगी असलेल्या आयुधांची माहिती दिली गेली. गिर्यारोहणात सतत कार्यशील असलेले मेहबूब
सरांनी ती दिली. दोन तासांचा Nature Trail चा अनुभव फार छान होता. जगदीश वाकळे यांनी
प्रत्येक झाडाची, पक्ष्याची माहिती तर दिलीच शिवाय जंगलातील वन्य जीवांचे त्यांचे अनुभव
कथन केले. जेवणाचा break घेऊन शालेय विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा झाली. १ली ते
५वी गटात कु. हिंदवी भोपी आणि ६वी ते १०वी गटात कु. मीत कासकर या दोघांनी पारितोषिके
पटकावली. त्या नंतर wildlife वरच्या दोन film पहिल्या आणि या पहिल्या वहिल्या ट्रेकिंग
कॅम्पची आणि शिवशौर्यच्या २२व्या मोहिमेची यशस्वी सांगता झाली. घडाळ्याच्या काट्यावर
धावणाऱ्या शहरात आम्ही ट्रेकची आवड रुजवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. त्या प्रयत्नांना
यश मिळेल याची खात्री आहे.
दिनांक : १०- १३ जुलै २०१४
तालुका : पन्हाळा, शाहुवाडी,जिल्हा : कोल्हापूर
मोहिमप्रमुख : योगेश शिरसाट, नाशिक
सहभागी सदस्य : १००
ज्या स्थानावर आपल्या पूर्वजांनी देव, देश अन धर्मासाठी रक्त सांडले, ती क्षेत्रे आमच्यासाठी
तीर्थक्षेत्रे बनली आहेत. नेमकी हीच भावना मनात ठेवून 'शिवशौर्य ट्रेकर्स' ने दरवर्षी
'प्रमाणे पन्हाळगड ते विशाळगड' या ऐतिहासिक पदभ्रमण मोहिमेचे आयोजन केले. मोहीम प्रमुख
योगेश शिरसाट यांनी २०१४च्या मोहिमेचे नेतृत्व स्वीकारले. मुंबई सह नागपूर, पुणे, नाशिक,
परळी, सातारा, कणकवली, रत्नागिरी, गोवा इथवरून लोकांनी सहभाग निश्चित केला. अखेर निघायचा
दिवस उजाडला. पन्हाळगडाखाली असलेल्या नेबापूर या आमच्या मुकामाच्या गावात १० जुलै गुरुवारी
सकाळी ७ वाजता डेरेदाखल झालो. सर्वांनी सकाळची आन्हिकं उरकायला घेतली. आमचा खानसामा
कासम याने चहा नाश्ता तयार करायला घेतला. चहा नाश्ता करून सर्वजण गाईड हनीफ नगारजी
बरोबर पावनगड, पन्हाळगड पाहण्यासाठी बाहेर पडले. पावनगडावर पूर्वी युद्धात जखमी झालेल्या
सैनिकांसाठी तुपाची विहीर आहे, हेमाडपंथी शिवमंदिरही आहे, याच गडावर गान सरस्वती लतादीदी
आणि चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांची घरे आहेत. पन्हाळगडाला ज्यांच्यामुळे नाव प्राप्त
झाले ती पराशर ऋषींची गुहा सर्वांनी पाहिली. तीन दरवाजा, पुसाटी बुरुज, अंधारबाव, धान्याची
तीन कोठारे आजही दिमाखात उभी आहेत. सोमेश्वर तलाव आणि तबक उद्यान पन्हाळगडाच्या सौंदर्यात
भर घालतात. दुपारी २ वाजता जेवायला सर्वजण हजर होते. जेवुन थोडी विश्रांती झाली. सायं.
५ वा. सर्वांची एकमेकांशी ओळख झाली. यानंतर इतिहास अभ्यासक श्रीदत्त राउत यांनी इतिहासाचे
मार्गदर्शन केले. तब्बल दोन तास त्यांनी इतिहासाचे दाखले सर्वांसमोर मांडले. त्यांच्या
भाषणामुळे उद्या मार्गक्रमण करणाऱ्या वाटे बद्दल कमालीची उत्सुकता सर्वांच्या चेहऱ्यावर
दिसू लागली. या उत्सुकतेतच सर्वजण निद्रादेवीच्या अधीन झाले…. उद्याच्या शिवाजी महाराजांच्या
वाटेवरून चालण्याचे स्वप्न बघत. ११ जुलै शुक्रवार सकाळी ६ वाजता आमचा दिवस सुरु झाला.
सर्व कार्यक्रम उरकून ८ वा. आम्ही मुक्काम सोडला. सर्व प्रथम आम्ही वीर शिव काशीद यांच्या
समाधीपाशी गेलो. शार्दुलने प्रेरणा मंत्र म्हटला. अनिल नलावडे यांनी शिव काशिदांवर
स्वतः रचलेले गीत गायले. समाधीवर फुले वाहून नतमस्तक झालो. मोहिमप्रमुखांनी सर्वांच्या
मस्तकी भगवे गंध लावले. आता आम्ही पन्हाळगडावरील संभाजी महाराजांच्या मंदिरात आलो.
इथेच आमच्या नाश्ता आणि packlunch ची सोय झाली होती. सैन्य पोटावरही चालते त्यामुळे
दिवसभराच्या शिदोरीची बेगमी करून आम्ही बाजी प्रभूंच्या पुतळ्यापाशी आलो. बाजींचा १५
फुटी पुतळा पाहूनच अंगात चैतन्य संचारते. बाजींच्या चरणी श्रीफळ वाढवून, फुले वाहून
पुढे राज दिंडीत दाखल झालो. हा भाग गडाच्या मलकापूरच्या दिशेला येतो. इथूनच पौर्णिमेच्या
रात्री महाराज गड उतरून विशाळ गडाकडे रवाना झाले होते. या राज दिंडीतून दोन पालख्या
होत्या. एक शिवाजी महाराजांची आणि दुसरी प्रतिरूप शिवाजी म्हणजे शिवा काशीदांची. महाराजांची
पालखी राजदिंडी उतरल्या नंतर म्हसाई पठार चढली तर शिवा काशीदांची पालखी मलकापूरच्या
दिशेने गेली. शत्रूला हुकावणी देण्यासाठी खेळलेला तो डाव होता. हा झाला दिशेचा फरक
तसा अजून एक फरक या दोन पालख्यांमध्ये होता. तो फरक भावनिक होता. एक पालखी शिवाजी महाराजांचा
जीव वाचवण्यासाठी चालली होती तर दुसरी पालखी शिवाजी महाराजांसाठी स्वताचा जीव द्यायला
चालली होती. पालखी नेणाऱ्या त्या वीरांना मनोमन वंदन करून आम्ही राज दिंडी उतरायला
घेतली. तत्कालीन भौगोलिक आणि ऐतिहासिक परिस्थिती सर्वांच्या लक्षात आली होती. तुरुकवाडीचा
डांबरी रस्ता सोडून आम्ही म्हाळुंगे गावाचा चढ चढायला सुरु केला. चढ खडा असल्याने शहरी
मावळ्यांची छाती फुलून आली होती. चढ संपल्यानंतर सर्वाना दिलेल्या चोकलेट मुळे उर्जा
मिळाली पुढे चालायला. म्हाळुंगे गावानंतर सुरु झाले म्हसाई पठार. सपाट कातळ, गवताळ
रस्ता, तुफानी वाऱ्यामुळे आडवा बरसणारा पाऊस आणि क्षणात समोरिल दृश्य गायब करणारे दाट
धुक्याचे पडदे हे या म्हसाई पठाराच वैशिष्ट. १ तास चालल्या नंतर म्हसाईदेवीचे देऊळ
आले. तिथे आरती झाली. मध्यान भोजन सुद्धा तिथेच घेतले आणि पुढी मार्गक्रमण सुरु केले.
पुढील पाउण तास तुफानी वाऱ्याशी झुंज देत चालत होतो. माझ्या १९ वर्षातील पाहिलेला हा
विक्रमी वारा होता. म्हसाई पठारावरून exit घेतली,आणि सर्वानीच हुश्श केले. काही वेळानंतर
कुंभारवाडी आली. या नंतर सरळ बैलगाडीचा रस्ता होता, जो थेट १ तासानंतर खोतवाडीत आमच्या
मुक्कामाच्या शाळेत घेऊन आला. एव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते. खोतवाडीतील एक रहिवाशी
भीमराव खोत आम्हा १० जणांना त्यांच्या घरी घेऊन गेले. आज बेंदूर सण असल्याने प्रत्येक
घरात पुरण पोळीचा बेत होता, त्यामुळे आम्हालाही पुरणपोळी खायला मिळाली. आता प्रत्येकजण
सुके कपडे घालून चहा बिस्किटांचा आनंद घेत नवीन मित्रांशी गप्पा मारत बसले होते. ट्रेकची
गम्मत वेगळीच असते. अश्याच नवीन मित्रांच्या गप्पा रंगात आल्या होत्या. ८ वाजता आम्ही
जेवण सुरु केले. जेवण झाल्यावरही गप्पा काही संपल्या नव्हत्या. श्रीदत्तनाहि अनेक इतिहास
बद्दलचे प्रश्न विचारले जात होते. आणि त्याची समाधानकारक उत्तरही त्यांना मिळत होती.
महिला मंडळाच्या खोलीतही गप्पांचा फड रंगला होता. अश्या तर्हेने ट्रेकिंगचा पहिला दिवस
संपला. १२ जुलै शनिवार, आज आम्ही कालच्यापेक्षा लवकर उठलो. ५.३० वाजता दिवस सुरु झाला.
पहाटेच्या अंधारात सर्वांनी प्रातर्विधी आटोपला. खानसामा कासमनेही चहा नाश्त्याची तयारी
सुरु केली. ८.०० वाजता आजच्या मोहिमेला सरुवात केली. पुन्हा एकदा जय भवानी जय शिवाजीचा
जयघोष झाला आणि मावळ्यांनी दुसऱ्या मुकाम्माकडे कूच केले. आजचा दिवस हा जास्तीत जास्त
जंगलातून होता. मार्ग शेताच्या बांधावरून होता, खळाळत्या ओढ्यांतून होता. निसर्गाच्या
कुशीतून २८ किलोमीटर सहज पार झाले. वाटेत मांडलाईवाडी, करपेवाडी, आंबेवाडी, माळवाडी,
रिंगेवाडी, पाटेवाडी, म्हाळसवडे अशी गावं लागली. आमचा मुक्काम मालाईवाड्यात होता. रात्री
मिसळ पावाचे जेवण जेवून सर्व झोपी गेले. १३ जुलै रविवार : सकाळी ६.३० उठून ८ पर्यंत
तयार झालो. चहा पोहे स्वाहा करून पावनखिंडीकडे कूच केले. दोन किमी. नंतर आम्ही पावनखिंडीत
पोहोचलो. आधीच ठरल्याप्रमाणे बाजी प्रभूंची आताची म्हणजेच ११वी व १२वी पिढी शिवशौर्यच्या
मोहीमेला शुभेछ्या देण्यासाठी पावनखिंडीत हजर होती. हे शिवशौर्यच भाग्यच मानावे लागेल.
श्री. वैजनाथ देशपांडे यांनी आमच स्वागत केलं. मी आमच्या १०० मावळयांना संपूर्ण देशपांडे
जय भवानी जय शिवाजी या घोषणांनी पावनखिंड दणाणून गेली होती. या उत्साहातच आम्ही वैजनाथ
देशपांडेंच्या हस्ते समाधीस्थळाची धूप कापुराने आरती केली. अनिल नलावडे यांनी स्वतः
रचलेला पोवाडा म्हटला. त्याच बरोबर सौरभ जोशी याने स्वतः रचलेले गीत गाताना त्याचा
कंठ दाटून आला. स्वा. सावरकरांनी लिहिलेला पोवाडा निरंजन पटवर्धन याने उत्स्फुर्तपणे
सदर केला. निश्चयाचा महामेरू या शिवस्तुतीने आरती संपली. खिंडीतील पवित्र माती सर्व
मावळ्यांच्या मस्तकी लावले गेली. दोन दिवसाचा खडतर प्रवास आज सार्थकी लागल्याचे भाव
सर्वांच्या चेहऱ्यावर होते. शालेय पुस्तकात वाचलेली पावनखिंड याची देही याची डोळा पाहत
होते. स्वामी निष्ठा किती पराकोटीची असू शकते याची हि घोडखिंड साक्षीदार आहे. सर्वांनी
स्वतःच्या आणि कॅमेराच्या memory card मध्ये पावनखिंड साठवली. शिवशौर्यचा जत्था पावनखिंडीतून
विशाळगडाच्या दिशेने रवाना झाला. वाटेतील कासारी नदीचे पात्र ओलांडतन नदी पात्रात सर्वांनी
धमाल केली. गजापूर गावात आम्ही दुपारचे जेवण घेतले. तासाभरात विशालगडावर गेलो. किल्ल्याचा
बकालपणा पाहता गडावरील मंदिरातून सर्वजण लगेच खाली आले. शिवशौर्यच्या हाकेला प्रतिसाद
देऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेले १०० मावळे आपापल्या घराच्या दिशेने रवाना
झाले.
तालुका : अकोले जिल्हा : नगर
मोहिमप्रमुख : योगेश शिरसाट, नाशिक
सहभागी सदस्य : ३१
हरिश्चंद्रगडाचा इतिहास साडे तीन हजार वर्षाहूनही प्राचीन आहे. याचा उल्लेख मत्स्यपुराणात
आणि अग्रीपुराणात आढळतो. गडावर हेमाडपंथी शंकराचे मंदिर आहे. चांगदेव इथल्या गुहेत
ध्यानस्थ बसायचे. ६ फुट उंचीचे शिवलिंग आहे आणि तेही छाती एवढ्या पाण्यात. अश्या गडाला
भेट द्यायची अनेकांची इच्छा होती नवे तसा त्यांनी आमच्याकडे आग्रहच धरला होता. अश्या
जुन्या सदस्यांच्या इच्छेला मान देऊन शिवशौर्य ट्रेकर्सने हरिश्चंद्रगडाची मोहीम ठरवली.
रोहित दिक्षित याने मोहिमेची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. त्या प्रमाणे त्याने
ट्रेकची व्यवस्था योगेश शिरसाट सोबत जाऊन महिनाभर आधी करून आला. शुक्रवार दि. २६ सप्टेंबरला
२०१४ रोजी आम्ही मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक येथून निघालो. कार्यालयीन आणिबाणी मुळे
रोहित येऊ शकला नाही पण शिवशौर्य ट्रेकर्सचे खंदे कार्यकर्ते सेनापती शिवाय मोहीम यशस्वी
करतात हा अनेक वेळेचा अनुभव आहे. तेव्हा मोहिमेच नेतृत्व योगेशकडे आलं. घोटी येथे योगेश
सह ३ जण बस मध्ये दाखल झाली आणि आम्ही घोटी-राजूर मार्गे पाचनई गावात सकाळी ४.५० वाजता
दाखल झालो. गावच्या शाळेत आणि ओळखीच्या गावकरी याच्या घरात आम्ही पथारी पसरली. थोड्याच
वेळाने नैसर्गिक कुक्कुट गजर सुरु झाले आणी थंडगार वातावरणात पांघरुणातून अनिच्छेने
बाहेर पडावे लागले. सकाळची कर्तव्ये पार पाडून चहा बिस्किटे घेऊन आम्ही हरिश्चंद्रगडाच्या
चढणीला लागलो. गडावर ४ वाटा आहेत त्यातील हि पाचनईची वाटेने आम्ही जात होतो. तासाभराने
वाटेतील डोहात मस्त डुंबलो. ४ वर्षाची मुद्रा असो किंवा ७१ वर्षांचे खेडकर काका वय
विसरून त्या डोहात स्वत:चा शीणवटा दूर करत होते. ११ वाजता आम्ही समुद्र सपाटी पासून
३९९४ फुट इतक्या उंचीवर आलो. गडावरील गुहेत डेरा टाकला. तासभर आराम करून जेवून आम्ही
जेवून तारामती शिखराकडे गेलो. सरलेल्या पावसामुळे संपूर्ण गड हिरवाई आणि त्यावरील छोट्या
छोट्या पिवळ्या फुलांनी नटला होता. वाटेवरील हे सौंदर्य सर्वांच्या कॅमेरात बंद होत
होते. तारामतीहून कोकण कड्याकडे गेलो. निसर्गाचे विलोभनीय दृश्य पाहून इथे छाती धडधडते.
१७०० फुटांचा सरळसोट उभा कातळकडा अर्धा किलोमीटर वक्राकार फिरलेला आहे. पश्चिमेकडून
येणारा वर कोकण कड्यावर आपटून खाली दरीत जाऊन परत वेगाने वर येतो. याच कारणाने कोणीही
कड्यावर उभे राहून दरीत बघण्याची हिम्मत करत नाही. इथे लोटांगण घालूनच दरी न्याहाळता
येते. सर्वच निसर्गाचा आनंद घेत होते. सर्वांशी ओळख इथेच करून देण्यात आली. संस्थे
बाबत माहिती देण्यात आली. गप्पा चालू असतानाच चहा नाश्ता होत होता. सूर्यास्त झाला
आणि मुक्कामाकडे जाण्यास निघालो. रात्री जेवणा नंतर सुरिली मैफिल जमली. त्याला जोड
होती बॉर्नविटाची. रात्री १२ वाजता आम्ही आडवे झालो. सकाळी सर्व आवरून आम्ही हरिश्चंद्रश्वराच्या
मंदिरात गेलो. तळापासून या मंदिराची उंची साधारण १६ मीटर आहे. चांगदेवांची गुहा मंदिराच्या
पाठीमागेच आहे. याच गुहेत चांगदेवांनी १४ वर्ष तप केला. इथेच त्यांनी 'तत्वसार' नावाचा
ग्रंथ लिहिला. या गुहेच्या पुढेच एक गुहा आहे. या गुहेत ६ फुट उंचीचे आणि १२ फुट व्यासाचे
शिवलिंग आहे आणि तेही छाती एवढ्या पाण्यात. आम्ही पाण्यात उतरलो बर्फाच्या लादीवर पाय
ठेवल्यासारखे झाले. छाती एवढ्या पाण्यातच आम्ही शंकराची आरती केली. प्रेरणा मंत्र म्हटला.
निश्चयाचा महामेरू म्हटले. ट्रेक सफल झाल्याचे सर्वांची भावना झाली. जगदाळे काका जे
निवृत्त आहेत, त्यांची ३०-३५ वर्षापासूनची हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा होती. इच्छा
पुर्तीबद्दल त्यांनी मनापासून संस्थेचे आभार मानले. हर हर महादेव म्हणत आनंदात गड उतरायला
घेतला.
तालुका : वेल्हे जिल्हा : पुणे
मोहिमप्रमुख : शार्दुल खरपुडे, मुंबई
सहभागी सदस्य : ६४
दि. ३१ ऑक्टोबरला मुंबईहून ५० शिवशौर्य ट्रेकर्स बसने निघाले आणि पुणे जिल्हा - वेल्हे
तालुक्यातील गुंजवणे गावात ४.३० वा. पोहचले. पुण्याहूनहि काही जण सहभागी झाले. राजगड
समुद्र सपाटी पासून १३९५ मीटर उंच आहे. नीरा, वेळवंडी, कानद आणि गुंजवणी नद्यांनी किल्ल्याला
वेढा घातला आहे. राजगडावर जाण्यास अनेक वाटा आहेत. पाली दरवाजा, अळू दरवाजा,गुंजवणे
दरवाजा, मार्गासनी मार्गे, तोरणा मार्गे. त्यातील आम्ही गुंजवणे मार्गाने गेलो. बऱ्याच
वर्षापूर्वी गुंजवणे गावात येणारा रस्ता प्रचंड खाच खळग्यांचा होता पण अंबरनाथचे माजी
शिवसेना आमदार कै. साबीरभाई शेख यांनी पुढाकार घेऊन पक्का रस्ता बांधून दिला. म्हणूच
आजचा आपला प्रवास सुकर झाला आहे. आन्हिक उरकून चहा बिस्कीट घेवून ६.३० वा गड चढायला
घेतला. कोवळ्या सूर्यकिरणांनी राजगडाच्या सर्व कडांना सोनेरी वर्ख आला होता. बाकी गड
हिरवा शालू पांघरून होता. वाहणारा गार वारा आम्हाला थकू न देता अधिक जोमाने गड चढायला
मदत करत होता. निसर्गाच्या छटा कॅमेरात बंदिस्त होत होत्या. गडावर पोहचून पद्मावती
मंदिरात पाठी वरचा बोजा उतरवून नाश्ता करून गड फिरायला बाहेर पडलो. मा. आप्पांच्या
मुखातून राजगडाने बोलायला सुरवात केली होती. आप्पा तर शिवकाळात गेलेच होते पण आम्ही
६० जण शिवकाळात विहरत होतो. महाराजांच्या स्थापत्य शास्त्रातील दूरदृष्टी राजगड किल्ल्यात
ठाई ठाई दिसते. दुपारच्या जेवणापर्यंत आम्ही सुवेळा माची पर्यंत फिरून आलो. जेवून आराम
करून ३ वा. संजीवनी माचीवर गेलो. पद्मावती मातेचे मन्दिर असलेली माची पद्मावती माची.
दुसरी सुवेळा माची आणि तिसरी संजीवनी माची. अशा तीन माच्या आणि बालेकिल्ला, किल्ले
राजगडावर आहेत. त्यांना हीच नावे का पडली याच्याही कथा आप्पांनी सविस्तर सांगितल्या.
संजीवनीच्या दुहेरी तटबंदी मधून आप्पांनी आम्हाला चालायला लावले. संजीवनी वरून जवळच
तोरणा किल्ला दिसला तर दूरवर रायगडचे टकमक टोक दिसले. सूर्यास्त व्हायला आला होता.
आम्ही पद्मावती मंदिराच्या दिशेने माघारी फिरलो. मंदिरात आल्यावर चहा झाला. एकमेकांशी
ओळख झाली. याच पद्मावती मंदिरात महाराज आग्राहून संन्याश्याच्या वेषात आले. त्यांची
आणि जिजाउंची ऐतिहासिक भेट झाली होती. इतिहासमय दिवस संपला. रात्रीचे जेवण झाल्यावर
शेकोटी भोवती गप्पा झाल्या. पंचक्रोशी गारेगार होऊन गपगार झाली होती सकाळी ५ उठून आमचा
दिवस सुरु झाला. आज बालेकिल्ल्यावर चढाई केली. चढाई थोडी अवघड आहे तिथे थोडा वेळ जातो.
महादर्वाजाच्या बुरुजात बत्तीस दातांच्या बोकडाचे मुंडके पुरले आहे. ब्रम्हर्षी मंदिर
बघून पुढे सरकलो. जिजामातांच्या दालनात आलो. तिथे एक ऐतिहासिक घोषणा झाली होती. 'आधी
लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे'. स्वामी आणि स्वराज्य निष्ठेची अनेक उदाहरणं ऐकताना
आणि तेही त्याच ठीकाणी. आपल्या अंगावर काटा उभा राहतो. समोरच सिंहगड दिसत होता. या
आणि अश्या अनेक ऐतिहासिक घटनांचा मागोवा आम्ही घेतला. महाराजांनी १६४८ ते १६७२ म्हणजे
२५ वर्ष याच गडावरून हिंदवी स्वराज्याचा राज्यशकट हाकला होता. महाराजांच्या जीवनातील
अनेक महत्वाच्या घटनांचा राजगड साक्षीदार आहे. अश्या या 'दुर्गराज राजगडाला' मानाचा
मुजरा.
तालुका : अकोले, जिल्हा : नगर
मोहिमप्रमुख : संदीप पाटील, टिटवाळा
सहभागी सदस्य : ७०
शिवशौर्यचा ट्रेक जाहीर झाला आणि ७०जण सहभागी होऊन शुक्रवारी रात्री कसारा लोकल ट्रेनने
ट्रेकला निघाली. बहुतेक सगळेच ट्रेक खाजगी बसने होतात. पण या वेळी लोकल ट्रेनची मजा
घेत गेलो. कल्याण नंतर सर्वांच्या स्याक मधून कानटोप्या, स्वेटर निघाले. थंडीचा attack
चांगलाच होता. कसारयाला उतरून आमचा पुढील १ तासाचा प्रवास करून आम्ही साम्रद गावात
पोहोचलो. मुली आणि लहान मुले घरात आणि बाकीचे अंगणात, शाळेच्या वरांड्यात पांघरुणात
pack झाली. पहाट होताच सगळे उठले, कुडकुडतच आन्हिक उरकली. चहा बिस्किटे झाल्यावर रतनगडाच्या
दिशेने कूच केले. गाव सोडल्यावर किल्ल्याच्या चढणीची वाट दाट झाडांमधून आहे. झाडी संपल्या
नंतर रतनचा खुट्टा आणि रतन याच्यातील घळ चढून जावी लागते. तिथे काही ठिकाणी शिड्या
लावल्या आहेत. घळ संपल्यानंतर गडाच्या सोंडेवरून चालत चालत गडाच्या पोटात शिरलो. खोदून
कोरून काढलेल्या पायरया उभ्या चढणीच्या आहेत. त्या थेट कोकण उर्फ त्रिंबक दरवाज्यापर्यंत
आहेत. सर्व मंडळी द्वारातून गडावर प्रवेशकर्ती झाली. नेढ्यात बसून मोहीमप्रमुख संदीप
पाटील याने सर्वाना गडाचा इतिहास वाचून दाखवला. तिथून पुढे गवताळ पठारावरून गड दर्शन
सुरूच होते. पाण्याची उघडी टाकी आहेत. कोणाला कळणारहि नाही असे एका गुहेतील थंडगार
पाणी पिउन गडाला वळसा घातला. राणीचा हुडा नावाने एक गोलाकार बुरुज आहे. आजोबा डोंगर,
हरिश्चंद्रगड, कात्राबाईची खिंड, बाण सुळका, अलंग, मलंग, कुलंग हे किल्ले तसेच कळसुबाई
हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर्वांनी क्यामेरात टिपून घेतले. गड फेरी पूर्ण झाली
होती. आता रतनवाडीच्या दिशेने आम्ही उतरायला घेतले. आता ज्या दरवाज्यातून आम्ही उतरलो
त्यावर सूर्य, मगर, वेताळ, गणपती, जलदेवता, ऋद्धि सिद्धि या रेखीव मुर्त्या आणि व्बरेच
कोरीव काम आहे. त्याच्याचपुढे रात्नुबाईदेवीची गुहा आहे. रतनच्या खुट्याला वळसा घालून
जंगलातून आम्ही उतरत साम्रद गावात परत आलो. रात्री लवकर जेवून काही मंडळी आडवी झाली
तर काही शेकोटी करून गाणी म्हणत होती. कॅम्प फायर ची सांगता बोर्नविटा पिउन झाली. रविवारी
सकाळी ५ वाजता आमचा दिवस सुरु झाला. चहा नाश्ता घेउन आम्ही सांधण व्ह्यालिकडे निघालो.
लहान मुले आणि काही मोजकी मंडळी सांधण उतरणार नव्हती, ते फक्त सांधणला भेट देउन परत
फिरले. बाकी उर्वरित जणांचा सांधण प्रवास सुरु झाला. निसर्गचा एक अनोखा अविष्कार म्हणजे
सांधण व्हली. शब्दात वर्णन करता येत नाही. सुरवाती पासूनच मोठे दगड धोंडे पार करतच
ट्रेक करावा लागतो. पोटापर्यंत पाण्यातून चालावे लागते. कपारीत शिरून मोठ्या दगडाखालून
वाट काढावी लागते. एका ठिकाणी दोरीच्याच आणि दोन ठिकाणी झाडाच्या सुकलेल्या ओंडक्याच्याच
आधाराने उतरावे लागते. असा हा Full Adventure असलेला ट्रेक आम्ही बर्याच तासांनी पूर्ण
केला. सहभागी सदस्यांची संख्या जास्त असल्यामुळेच ट्रेकची वेळ वाढली. डेहणे गावात आम्ही
संध्याकाळी आलो. पोटभर जॆवुन आसनगाव स्टेशनच्या दिशेने मार्गस्थ झालो.
तालुका : चंद्रपूर, जिल्हा : नागपूर
मोहिमप्रमुख : संघमित्रा मेंगळे-मुंबई , मोहन बेडेकर-नागपूर
सहभागी सदस्य : ४०
ट्रेक मध्ये अनुभवायला येणारी जैव विविधता खास करून अनुभवायची ठरली आणि शिवशौर्य तर्फे
ताडोबा जंगल सफरीचे आयोजन केले गेले. आमचे नागपूरस्थित सदस्य मोहन बेडेकर यांनी ताडोबाच्या
तिथल्या व्यवस्थेची जबाबदारी उचलली आणि इथून करायच्या सर्व बुकिंग संघमित्राने उचलली.
३ महिन्यापासून तयारी सुरु होती. आणि अखेर २४ जानेवारीला आम्ही मुंबई राजधानीतून नागपूर
राजधानीत दाखल झालो. खाजगी बस वाट बघत होतीच, त्यातून आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा
या राखीव वनक्षेत्रात मोहर्ली गावात गेलो. २ दिवसात आम्ही ४ साफार्या केल्या. अनेक
विविध प्राणी पाहण्यास मिळाले. एक शांत जंगल अनुभवता आलं. नागपुरातील टेकडी गणेशाचे
दर्शन घेऊन आम्ही हल्दीरामची संत्रा बर्फी घेऊन मुंबईकडे रवाना झालो.
दिनांक : २५-२६ जानेवारी २०१५
तालुका : पाली सुधागड, जिल्हा : पुणे, रायगड
मोहिमप्रमुख : सचिन माळकर, मुंबई
सहभागी सदस्य : १३
नेतृत्व करणार्याला कधी अडवू नये. सबसंघटनेच्या दृष्टीने हि अत्यंत महत्वाची बाब असते.
शिवशौर्य ट्रेकर्सचा [पूर्वनियोजित ताडोबा सफर ठरली होती. पण जी मंडळी ताडोबाला जाणार
नव्हती त्यांना कुठलातरी ट्रेक करायची इच्छा होती. सचिन माळकर याने लोहगड - विसापूर
- उंबरखिंडीचा ट्रेक आयोजित करण्याची इच्छा दाखवली आणि संस्थेने त्वरित संमती दर्शवली.
एक छोटी टेम्पो ट्रावलर करून १३ जणांनी शनिवार २४ जानेवारीच्या रात्री मुंबईहून लोहगडाकडे
प्रयाण केले. पहाटे ४ वाजता लोहगडवाडी येथे खानावळ वजा घरात डेरा टाकला. सर्वजण मिळेल
तिथे आडवे झाले. सर्वाना ६ वाजता उठवले गेले. चहा बिस्कीट पोटात ढकलून किल्ले विसापूरच्या
दिशेने सरकलो. २० मिनिटे चालून गडाच्या पायथ्याला पोहोचलो. तिथून दाट झाडीतून चढण सुरु
झाली. ३० मिनिटे चढून गडावर पोहोचलो. गडावर जाऊन आम्ही आपापल्या घरून आणलेली शिदोरी
उघडली. सर्वांची ओळख झाली, नाश्त्याचे आदान प्रदान करत पोटपूजा आटोपली गेली. तटबंदी
वरून गड प्रदक्षिणा सुरु केली. किल्ल्याची तटबंदी उत्तम स्वरूपात आहे. पाण्याची असंख्य
टाकी जागोजागी आढळतात. पूर्वी गडावर भरपूर लोकांचा राबता असावा असा अंदाज पाण्याच्या
साठ्यावरून येतो. तटबंदीला असलेला बुरुज, जंग्या चांगल्या अवस्थेत आहेत. हनुमानाच्या
तीन मुर्त्या, ३ जाते, १ तोफ, २ वाड्याचे अवशेष असे गडाचे वैभव आहे. शिवकालीन बांधकामानुसार
गडावर शौचकुपेही आढळतात. विसापूर किल्ल्यावरून लोहगड, तुंग, तिकोना, नागफणी, एकविरा,
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग / लोहमार्ग स्पष्ट दिसतात. १.३० तासाने गड प्रदक्षीणा
पूर्ण करून आम्ही गड उतरायला घेतला. मुक्कामाच्या ठिकाणी जेवण घेऊन १५ मिनिटाच्या विश्रांती
नंतर आम्ही लोहगडाकडे रवाना झालो. २० मिनिटात गडावर पोहोचलो. उत्तम स्तिथीत असलेला
देखणा दरवाजा हे लोह्गडाचे वैशिट्य आहे. तसेच गडाला विंचवाची नांगी भासणारी सोंड नैसर्गिकरित्या
प्राप्त झाली आहे. त्याला विंचू काटा असे म्हणतात. गडावर तोफा पाहायला मिळाल्या, स्वछ
अशी लोमेश ऋषींची गुहा आहे. लक्ष्मि कोठी आहे. एक भली मोठी बांधीव विहीर आहे. हे सर्व
मनात आणि क्यामेरात साठवून सूर्यास्ताच्या आतच गड उतरलो. fresh होण्यासाठी गावात विहीर
होतीच. त्यानंतर चहा घेत गप्पांचा फड रंगला. जेवणाची वेळ झाली तरी गप्पा सम्पल्या नाहीतच
पण जेवल्या नंतरही काही जण शेकोटी करून गप्पात बुडाले होते. रात्री ११ वाजता शेकोटीची
उब घेत, चहा घेऊन आम्ही झोपायला गेलो. रविवार बसने कुर्वंड्या गावाकडे गेलो. उंबरखिंडीचा
भूगोल आणि इतिहास सर्वाना समजावून सांगितला. ४ तासाच्या आम्बेनलि घाटाने उतरून आम्ही
आंबा नदी ओलांडून छावणी गाव मार्गे उंबरखिंडीत पोहोचलो. आम्ही शिवस्मारकापाशी नतमस्तक
झालो. कारतलाब खानाच्या १० हजार सैन्यानिशी महाराजांनी १ हजार सैन्यानिशी लढा दिला.
रक्ताचा एकही थेंब न सांडता. शत्रूला चारी मुंड्या चित करून स्वराज्याच्या सम्पतित
२० दशलक्ष होनांची भर घातली गेली. हा विजय शिवाजी महाराज्यांच्या बुद्धीचातुर्याचा
होता. आपल्याला गरज आहे ती पक्त अश्या समरभूमीवर जाऊन आपल्यात महाराजांच्या अंश रुजवण्याची.
प्रेरणामंत्र म्हणून आम्ही पवित्र ट्रेकची सांगता केली. शिवशौर्यची संस्थापक मंडळी
नसतानाही २८वी मोहीम यशस्वी झाली.
दिनांक : ७-८ मार्च २०१५
तालुका : हवेली, जिल्हा : पुणे
मोहिमप्रमुख : ऋतुराज पटवर्धन, मुंबई
सहभागी सदस्य : १३
शिवशौर्यच्या हाकेला अपेक्षित प्रतिसाद मिळून मुंबई, पुणे, अलिबाग, नाशिक, परळी वैजनाथ
येथून ट्रेकर्स मंडळी पुण्यात कात्रज बोगद्यापाशी जमली. सायंकाळी ७ वा. संधीप्रकाशात
आमचा ट्रेक सुरु. झाला. ८.३० वाजता चंद्रोदय झाला आणि सार्या आसमंताच रूप पालटलं. torch
होत्या म्हणून पेटत्या ठेवल्या नाहीतर त्याची विशेषं आवश्यकता वाटत नव्हती. काहींनी
torch न वापरता Moon Light Trek चा Feel घेतला. पूर्ण ट्रेकभर दमछाक करणारी चढण आणि
पाय लटपटायला लावणारी उतरण असा खेळ चालू होता. सुरवातीला काहींनी वाटेतील डोंगर / टेकड्या
मोजायला घेतल्याही पण जशी रात्र वाढत गेली तशी मोजदाद सोडून आता ह्या डोंगर टेकड्या
कधी संपताहेत हेच एकमेकांना विचारू लागली. रात्री १२ वाजता सर्वांनी एकत्र बसून sandwich
आणि Frooti चे जेवण घेतले. आणि पुन्हा चढ उताराच्या खेळात सहभागी झाले. चढणीच्या वेळेला
पुढचा मागच्याला आधार देत होता तर उतरणीला मागचा पुढच्याला हात देत होत. 'एक मेका सांभाळून
घेऊ, अवघे पूर्ण करू मोहीम' या भावनेने हा ट्रेकचा खेळ उत्तरोत्तर रंगत जात होता. मध्येच
हास्यविनोद होत होते. इतके सुरु असताना मोहिमेचे सेनापती मात्र मोहीम रेंगाळू देत नव्हते.
संध्याकाळची रात्र झाली, रात्रीची मध्यरात्र झाली, मध्यरात्री नंतर ब्राह्ममुहूर्त
आला. सिंहगडाकडे जाणारा रस्ता दूरवरून दिसू लागला. तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यासाठी
अनेक जथ्येच्या जथ्ये सिंहगडाकडे हातात मशाली घेवून चालले होते. वाटत होते कि शिव जन्माला
गडाच्या वाटेवर दिव्यांची आरासच केली आहे. एव्हाना चालून चालून शरीर बोलू लागले होते.
पण धीर खचला नव्हता. नजरेच्या टप्प्यात गड आला होता. शेवटचे ३ किमी. डांबरी रस्ता लागला.
पुणे पंचक्रोशीतील शिवप्रेमी शिव ज्योत घेऊन गडावर पोहचत होते. आता पूर्ण उजाडले होते.
पुणे दरवाज्यात नतमस्तक होऊन गडाच्या आत सर्वजण प्रवेशकर्ते झाले. आम्ही ४१ शिवशौर्य
ट्रेकर्स गडावरील त्या शिवगर्दीचा भाग बनून गेलो होतो. अत्यंत कठीण समजल्या जाणार्या
ट्रेक पैकी हा कात्रज ते सिंहगड नाईट ट्रेक करून आम्ही २०१५ सालातील शिवजयंती सिंहगडावर
सोनेरी उन्हात साजरी करत होतो. वय वर्ष १२ ते वय वर्ष ६५चे धारकरी यांनी जिद्दीने ट्रेक
पूर्ण केला. आजच्या शिव जयंती बरोबरच आज जागतिक महिला दिन सुद्धा होता. शिवशौर्यच्या
6 महिला ट्रेकर्स यांनी त्यांचा स्वत:चा दिन कठीण ट्रेक करून साजरा केला. आमच्या मोहिमेचे
म्होरके होते ऋतुराज पटवर्धन, श्रेयस कोंडे आणि नंदकिशोर मोहिते. या तिघांनीही आधी
२ वेळा कात्रज ते सिंहगड मार्गक्रमण करून नियोजन केले होते. किती जणांना घेवून जायचे,
किती वाजता ट्रेक सुरु करायचा, आणि खायला काय, किती आणि केंव्हा द्यायचे याचा पूर्ण
Action Plan या तिघांकडे होता. याचा प्रत्यय प्रत्येकाला ठायी ठायी येत होता. पहिल्या
तासाभरातच तीन सहभागी सदस्यांना ट्रेक सोडवा लागला. याही बाबतीत मोहीम प्रमुखांनी अत्यंत
योग्य निर्णय घेतला. जो ट्रेक वेळेत पूर्ण आणि यशस्वी होण्यास कारण ठरला.
दिनांक : २५ - २६ एप्रिल
तालुका : दापोली, चिपळूण, जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : विवेक जाधव, मुंबई
सहभागी सदस्य : ४०
२४ एप्रिलला रात्री १० वा. ट्रेकला निघायच्या आधी मृदुला तांबे हिला श्रद्धांजली वाहिली. २४
एप्रिलला तिचा वाढदिवस असतो. आणि ती गेल्यानंतर आमचा पहिलाच ट्रेक. २ वर्षापूर्वी
रत्नागिरी ट्रेकचे नेतृत्व मृदुलानेच केले होते. यावेळी सुद्धा आम्ही कोलथरे गावात मुक्काम
करणार होतो, जो मृदुलाच्याच ओळखीने आमची सोय झाली होती. ती असती तर आज ट्रेकला
आली असती. show must go on उक्ती प्रमाणे आम्ही निघालो.
पहाटे ५ वा. आम्ही मंडणगड गावात पोहोचलो. एक हॉटेलात शुचिर्भूत होऊन बसने थेट गडावर
जाण्यास निघालो. बस एका वळणावरून पुढे जाउ शकत नव्हती म्हणून ४ किलोमीटर चालत
निघालो. गडावर जायला थेट गाडी रस्ता झाला आहे. गडावरील गणेश मंदिर रंग रंगोटी
करून उत्तम अवस्थेत आहे. मोठे तळे आहे पण त्या पाण्याचा पिण्यासाठी आणि डूंबण्यासाठी
काहीच उपयोग नाही. एका तोफेलाही रंग फासला आहे. गडाची तटबंदी काही प्रमाणात आहे. पण
अवशेष काहीच नाही. गडावर सगळ्यांशी ओळख करून देण्यात आली. घरून आणलेला नाश्ता
एकमेकांना share करत १ तासाने आम्ही गड उतरण्यास घेतला. बस बाणकोट किल्ल्याच्या
दिशेने निघाली. इथेही बस किल्याच्या दारात पोहोचली. किल्ल्याच्या आत मोठे मोठे वृक्ष आहेत.
खंदक आहेत, तटबंदी उत्तम स्तिथीत आहे. किल्ल्यातून समुद्र किनाऱ्याचे विलोभनीय दृष्य दिसते.
इथेच आमचेही ग्रुप फोटोसेशन झाले. किल्ल्याच्या बाहेर महाबळेश्वरचा इंग्रज आर्थर याच्या पत्नी
सोफिया हिची समाधी आहे. गोव्याहून मुंबईला जाताना तिची बोट याच ठिकाणी फुटली होती.
आम्ही बसने पुन्हा मंडणगड गावात जेवायला आलो. पोटभर जेवण आणि ताक पिउन आम्ही
पालगड गावाच्या दिशेने निघालो. वाटेत आमच्या आनंद देवळेकरांच्या सासुरवाडीचा पाहुणचार
घेतला. पालगड हे साने गुरुजींचे जन्मस्थान ते पाहून आम्ही कोलथरे गावाकडे निघालो. वाटेत
एक फारच वाईट अपघात बघावा लागला. कोलथरे गावात यायला ७ वाजले. गेल्या गेल्या
विहिरीच्या थंडगार पाण्याने आंघोळ म्हणजे सुख होतं. त्या नंतर परत पोटभर जेवण आणि
पोटभर ताक. मुक्कामाच्या पाठीमागेच असलेल्या समुद्रावर आमचा कॅम्प फायर झाला. गाणी,
जोक्स, चंद्रशेखर पाटील काकांच्या रहस्यकथा हे सर्व तासभर चालू होते. तिथेच समुद्रावर
बोर्नविटा पिऊन कॅम्प फायरची सांगता झाली.
सकाळी लवकर जाग येउन सर्वांनी आटपायला घेतले. काही जण कोळेश्वर मंदिरात गेले तर काही
जण समुद्रावर गेले. चहा पोहे असा नाश्ता करून आमची बस निघाली दाभोळ जेट्टीच्या दिशेने.
तिथे फेरी बोट यायला अवकाश असल्याने तिथे मिळणाऱ्या फणस आईस्क्रीमवर सर्वांनी ताव
मारला. बस बोटीत चढवायचे सोपस्कार पार पाडून बसने दाभोळ बंदर पार केले. अंजनवेलच्या
गोपाळगडावर गेलो. खाजगी मालमत्ता असलेला किल्ला समुद्रकिनार्यावर पसरलेला आहे. तटबंदी
उत्तम असली तरी आत अवशेष नसून आंब्याची झाडेच भरपूर आहेत. चिपळूणमध्ये येउन
जेवायला ४ वाजले होते. गोवळकोट किल्ला वेळेत बसत नव्हता त्यामुळे मोहीम प्रमुख विवेक
जाधव याने निर्णय घेतला आणि आम्ही सरळ मुंबईच्या वाटेला लागलो. कोकण सफर सफल
संपूर्ण.
दिनांक : १ मे २०१५
तालुका : पनवेल, जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : कु. मित कासकर, मुंबई
सहभागी सदस्य : ३३
गेल्या ५ वर्षात ट्रेक बरेच झाले. किती तरी लहान मुलांची ट्रेक फी अनेक वेळा घेतली
बाल मोहीम, पालक नाहीत आणि तीही पूर्णपणे मोफत असे कधीच डोक्यात आले नव्हते. ते
अचानक पणे आले. कार्यक्रमाची आखणी करून फक्त १५ दिवस अगोदर ट्रेक जाहीर केला.
अपेक्षित प्रतिसाद मिळून १ मे हा निघायचा दिवस उजाडला. शिवशौर्य ट्रेकर्सचे स्वयंसेवक
निघायच्या ठिकाणी ७.३० जमले. आणि पालक मंडळी आपल्या लहानग्यांना घेऊन ८ पासून
यायला लागली. प्रत्येकजण खिडकी पटकावण्याच्या प्रयत्नात होता. पालकांच्या मुलांना सूचना सुरु
होत्या. तसेच आम्हाला प्रश्न विचारले जात होते. किल्ल्यावर कधी जाणार? तुमचे volunters
किती आहेत? परत कधी येणार? या सर्व प्रश्नांना आम्ही समाधानकारक उत्तरे देऊन त्यांची चिंता
कमी करत होतो. सर्व जमे पर्यंत ८.४० झाले आणि आमच्या बसने कर्नाळा किल्ल्याकडे कूच
केले. जोडून आलेली सुट्टी त्यामुळे गोवा महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा होत होता. ११ वाजता
सर्व मुलांना सूचना देऊन आमची बाल मोहीम सुरु झाली. टोपी, बूट, खांद्यावर sports bag, आणि
ब्यागेत आईने दिलेले खाद्य पदार्थ अश्या पूर्ण तयारीनिशी Little Force ने ट्रेक सुरु केला. मीच
सर्वांच्या पुढे असायला हवे, असे प्रत्येकाला वाटत होते. दाट झाडीतून चालल्यामुळे छान वाटत
होते. नंतर नंतर चढण जाणवायला लागली. पहिल्या ३० मिनिटात break घेतला. बसल्यावर
सर्वांनी पाणी पिण्यास घेतले. आम्ही पुन्हा त्यांना पाणी कमी पिण्याची सूचना केली. कारण वाटेत
पाणी नव्हते. १० मिनिटे आराम करून चालू लागलो पुन्हा ३० मिनिटांनी थांबलो. १ वाजला होता.
दुपारचे जेवण पोतडीतून बाहेर निघाले. स्वतःचा डबा खाताना तो दुसर्या समोर सरकवला जात
होता. छोट्यांचे sharing बघताना छान वाटत होत. १५ मिनिटात किल्ल्याच्या दरवाज्यात
पोहोचलो. उन मी म्हणत होते. एवढा वेळ चालून किल्ल्यात पोहोचलो याचा आनद सर्वांना झाला
होता. किल्ल्याच्या गुहेत थंडगार पाण्याचे स्त्रोत आहेत. ते पाणी पिउन सर्व शांत झाले. उन्हाचा
तडाखा बसु नये म्हणून फार वेळ न थांबता आम्ही किल्ल्याच्या पायऱ्या उतरून खाली आलो
आणि सावलीत बसलो. ट्रेक केल्यावर कसं वाटतय? असं जेव्हा मुलांना विचारलं त्यावेळी
प्रत्येकांनी ट्रेकला मजा आली, सुरवातीला घाबरायला झाले होते. पण सगळ्यांसोबत ट्रेक करत होतो
त्यामुळे भीती वाटली नाही. पुन्हा ट्रेकला यायला आवडेल. अशी उत्तरं आम्हाला दिली. आमचा
उद्देश सफल झाला. किल्ल्यांच्या पवित्र मातीशी नाळ जोडली जावी म्हणून हा सर्व खटाटोप.
उतरणीला सर्वच जण मस्ती करत उतरत होते. पायथ्याच्या कॅन्टीन मध्ये चहा उपमा आमची
वाट बघत होताच. तो खाऊन मुलं पकडा पकडीचा खेळ खेळू लागली. कोणी पिंजर्यातले पक्षी
बघण्यात गुंग झाला. अशी एकंदर बाल मोहीम सफल झाली. बस जेव्हा end point ला आली
त्यावेळी प्रत्येकजण आम्हाला जाताना थ्यांक्यू काका, दादा, ताई म्हणून निरोप घेत होता. सकाळी
सोडायला आलेल्या पालकांचे चेहरे आणि आपल्या मुलांना घ्यायला आलेल्या पालकांच्या चेहऱ्यात
कमालीचा फरक होता. सकाळी चेहऱ्यावर चिंता आणि बरेच प्रश्न होते तर संध्याकाळी हसत
हसत १० वेळा तरी थ्यांक्यू म्हणत होते. ट्रेक यशस्वी होणे यात आम्हाला नाविन्य नाही पण
आजचा ट्रेक आमची कसोटी होती आणि त्यात शिवशौर्य ट्रेकर्स १०० मार्कांनी पास झाली. हे मार्क
आम्हाला त्या चिमुकल्या हातांनी थ्यांक्यू म्हणून दिले होते. पुढील बाल मोहिमांसाठी बळ दिले
होते. आम्हीच तुम्हा चिमुकल्यांना थ्यांक्यू म्हणतो.
दिनांक : ३१ मे २०१५
तालुका : महाड जिल्हा : रायगड
मोहिमप्रमुख : गणेश पवार, मुंबई
सहभागी सदस्य : ४२
अनेक थोरमोठ्यांची जयंती / पुण्यतिथी भव्य प्रमाणात कुठेना कुठे साजरी होत असते. पण अस कुठेच पाहण्यात नाही कि ३४२ वर्षानंतर कुणा राजाचा राज्याभिषेक सोहळा हजारोंच्या संख्येत त्याच राजदरबारात अतिभव्य प्रमाणात साजरा होतो. हे फक्त नशीब फक्त शिवराज्याभिषेक सोहळ्याचेच. २ दिवस सोहळा चालू होता रायगडावर. आदली रात्र सुद्धा जागवली गेली. शिवशौर्यच्या दृष्टीने अभिमानाची बाब म्हणजे आमच्या परिवारातील अनिल नलावडे आणि पद्मश्रीताई यांनी मध्य रात्री ३ वाजाता संगीतमय सेवा महाराजांच्या चरणी अर्पण केली. नाट्य, संगीत, पोवाडे असे एका पेक्षा एक कार्यक्रम पहाटे ४.३० वाजेपर्यंत चालू होते. त्यानंतर ५ वाजता राज्याभिषेकाची लगबग सुरु झाली. ६ वा. महाराजांची पालखी निघाली. ७ वाजता राजदरबारात महाराजांचा विधिवत राज्याभिषेक सुरु झाला. अंदाजे दोन तास विधी चालू होते. पुन्हा महाराजांची पालखीतून मिरवणूक काढली गेली. ढोल ताशांच्या गजरात भगवे झेंडे नाचवत मिरवणूक गडावर सुरु होती. मिरवणुकीतच मलखांब प्रात्यक्षिके सादर होत होती. हौशी शिवप्रेमींनी तलवारीहि नाचवल्या मिरवणुकीत.
दिनांक : ८-९ फेब्रुवारी २०२०
अंतर : ६१ किमी
तालुका : जावळी जिल्हा : सातारा
मोहिमप्रमुख :नम्रता सावंत
मोहीम कार्यवाह : नारायण धनावडे
सहभागी सदस्य : ३३
महाबळेश्वर येथील आर्थरसीट ट्रेकसाठी दिनांक ०७/०२/२०२० शुक्रवार रोजी रात्री ०९:३० वाजता प्रभादेवी- मुंबई येथुन सुरुवात करण्यात आली. वाशी, खारघर, कळंबोली अशा पिकअप पाँइंटवरून सहभागी सदस्यांना घेत बस पुढे मार्गस्थ झाली. पहाटे वाई जवळील बलकवडी धोम धरणाच्या अंगा अंगाने बस उळुंब गावातून जोर या गावात दिनांक ०८/०२/२०२० शनिवार रोजी पहाटे ०६:०० वाजता थांबली जे त्या रस्त्यावरील शेवटचे गाव आहे. सर्व सदस्य झोपेतून जागे होत खाली उतरले तो पर्यंत झुंजुमुंजू पहाट झाली सोबतच चहाची तयारी झाली होती, सिध्दार्थने फक्कड चहा बनवला. संस्थेने सोबत आणलेली बिस्किटे चहासोबत दिली. पोटास आधार होताच तरतरीत होऊन सहभागी बसमधून पीट्टु मध्ये नाश्ता आणि इतर खाऊ सोबत घेऊन पुढे निघाले, पुढील जलाशय शेजारील मंदिराचे दूरदर्शन (कोणीही आंघोळ न केल्यामुळे) घेऊन व काहींनी प्रातविधी आटोपून सर्व पुढे मार्गस्थ झाले.
कृष्णा नदीच्या पुलाच्या उजव्या बाजूस असलेल्या पायवाटेने जाण्याआधी मोहीम प्रमुख नम्रता सावंत व नारायण धनावडे यांनी काही महत्त्वाच्या सुचना दिल्या. गव्हाच्या शेतातून, बांधा बांध्यावरून भैरीच्या घुमटी कडे पहाटेच्या प्रसन्न वातावरणात वेगाने व उत्साहात पायपीट चालू केली. साधारण दोन ते अडीच तासाच्या घनदाट जंगलाचा सतत प्रत्यय येत होता की जावळीचे खोरे काय आहे ज्यासाठी महाराजांना चंद्रराव मोरेंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी येथे यावे लागले. नंतर आमचा तांडा हा भैरीची घुमटी येथे पोहोचला. तेथिल देवतांचे दर्शन घेऊन सोबतची आणलेली न्याहारीची शिदोरी काढली. मस्त ताव मारुन व एकमेकांचे डबे फिरवत पंचपक्वानासमान शिदोरीचा आस्वाद घेतला. शार्दुल दादाने भैरीची घुमटी विषयीची कथा (दंतकथा) सांगितली जी फारच रोचक व मनोरंजक होती. अर्धा तास आराम करून लवाजम्यासह भैरीच्या घुमटीच्या काल्पनिक? कथा आमच्या सोबतच पुढे मार्गस्थ झाल्या.
जी कडे कपारी व झाडीतून पुढे आर्थरसीटच्या खड्या चढाईवर नियोजनबद्ध चढाई करून सर्व सदस्य सुखरूप आर्थरसीटच्या माथ्यावर पोहोचले. आर्थर सीटच्या खाली असलेल्या पॅचवर सिद्धार्थ दादाने टणटण उड्या मारून सेफ्टी रोप लावला. नारायण धनावडे आणि गुरुनाथ मयेकर हे टप्प्या टप्प्यावर उभे राहिले जेणे करून एक एक करून लवकरात लवकर वर चढतील. दुसरी कडून अमित दादानेही रोप सोडला. आता सोयी नुसार दोन्ही कढून एक एक करून मेंबर्स वेळ न दवडता वरचढू लागले.
सगळे आर्थरसीटच्या माथ्यावरील बर्फ-गोळ्याचा आस्वाद बरेच मोठ्यातील लहान व लहानातील लहानांनी घेत पुढे सावित्री पाँइंटकडे डांबरी रस्त्याने निघाले, सावित्रीपाँइंट पासून पुढे चाल करून पहिल्या वळणावर डाव्या हाताला १ बोर्ड आहे तेथून पायवाटेने पुढे जाऊन २० मिनिटे चालल्यावर २ वाटा लागल्या. उजवीकडे जाणाऱ्या वाटेने पुढे जाऊन पुन्हा काही वेळाने डांबरी रस्त्याने निघालो की पुन्हा एकदा उजव्या बाजूला पायवाटेने पुढे मार्गस्थ झालो.पुढे करवंद व इतर झुडूपांच्या चक्रव्युहात सापडलो, अमित दादाच्या प्रयत्नानंतर अखेर मार्ग सापडला व आमचा गोतावळा पंचगंगा मंदिराच्या जवळ पोहोचला. वेळे अभावी बाहेरूनच दर्शन मात्र घेऊन पोटोबा करण्यासाठी हाॅटेल सिध्देश मध्ये धडकलो. मस्त शुद्ध शाकाहारी भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेऊन लवाजमा हा पुढच्या प्रवासाला निघाला. हाॅटेल सिध्देश समोरून एक वाट ही साई अॅग्रो रेस्टॉरंट कडे जाणाऱ्या रस्त्याने सरळ जाते तेथून पुढे सरसावलो.
गणेश दरवाजातून खाली उतार झालो आणि उजव्या बाजूला खाली दुरवर दिसणाऱ्या कृष्णा नदीवरील बलकवडी धरणाचे विस्तृत जलाशय व त्यामुळे हिरवागार समृद्ध परीसर न्याहाळत उतरू लागलो. नजरेला सुखद हिरवा गारवा मिळाला जो शहरात दिसतच नाही. असो पुढे चाल करून आंम्ही तीव्र उतारावर असलेल्या नयनरम्य, शांत ,सुबक, सुंदर अशा गणेश मंदिरातील गणेशमूर्ती चे दर्शन घेऊन वळणाच्या पायरी मार्गे स्वतः व सहभागी सहकार्यांना सांभाळत उतरू लागलो. साधारण २० मिनीटे उतरून गेल्यावर २ पायवाटा दिसल्या. मग काय, सोबतचे स्थानिक चाचा चौधरी टाईप काकांनी योग्य मार्ग दाखवला व क्षणभर थबकलेला आमचा काफीला पुढे निघाला. काही अंतरावर पुन्हा मागच्या सारखाच दोन वाटांचा गोंधळ समोर आला. पुन्हा चाचा चौधरी व योग्य मार्ग, नंतर तर उड्या मारतच सर्व जोरदार चाल करत जोर गावाकडे जेथे बस उभी होती व भटकंतीची सुरुवात केली होती तेथे निघालो. साधारण दीड तासात बस जवळ पोहोचून हातपाय पसरून काही बस मध्ये तर काही मोकळ्या जागेत पसरले. थोडा वेळ आराम करून बसस्थ होऊन पुढे बस मार्गस्थ झाली. वाटेत नारायण काकांच्या घरून फक्कड असा चहा सर्वाना मिळाला. बस तेथून निघून थेट मेणवली येथील शंकर मंदिराच्या परिसरात थांबली. मेणवली घाट, नानांचा वाडा, ती सुरेख मंदिरे यांच्या सानिध्यात रात्रीचा मुक्काम करण्याचे पूर्व नियोजित होते, त्या नुसार सोबत आणलेले तंबु काढून ते लागले व ज्या सहभागी सदस्यांची ईच्छा असेल त्यानीं तंबुत व ज्यांना मोकळ्या जागी इच्छा होती त्यांनी मोकळ्या जागी, तसेच काही मंदिराच्या ओटीवर असे झोपण्याचे पर्याय उपलब्ध केले. रात्री वाई येथून धनावडे दादांच्या नियोजनाने गरमागरम शाकाहारी जेवण घेऊन काही मंडळी आली. मग काय त्या पवित्र व शांत वातावरणात आकाशातील तारे व ताटातील अन्नाचा आनंद घेत, तन व मन शांत झाले. जो काही थकवा होता तो कधी व कसा पळाला कळलेच नाही. गप्पा टप्पा करत कधी झोप लागली हे कळलेच नाही. रात्री सुचीत केल्या प्रमाणे पहाटेच उठुन काही सदस्यांनी नदीपात्रात मनसोक्त उड्या मारल्या, तर काही काठावर बसून आंघोळ करून तयार झाले. मग देवदर्शन करुन पुढे नदी काठी असलेल्या नाना फडणवीस यांच्या वाड्यावर पोहोचलो. काय शान असेल त्या काळी या वाड्याची. सध्या वाड्याची डागडुजी चालु आहे. वाडा फेरी पूर्ण होईस्तोवर बाहेर स्वत: अमित दादा, धनावडे दादा व गुरु दादा यांनी संयुक्तपणे मॅगी बनवली. गरमागरम मॅगीचा आनंद घेईपर्यंत मोहिम प्रमुख नम्रता सावंत यांनी गुरु दादाच्या सहाय्याने चहा बनवला. चहा पिऊन पोट व मन शांत झाले. आत्ता बस मध्ये स्थानापन्न होताच बस वाईच्या दिशेने निघाली. ढोल्या गणपतीचे दर्शन घेऊन खामकरांच्या मिठाईचा आस्वाद स्वतः व घरच्यांसाठी घेत सगळी मंडळी भिल्लार गावा कडे रवाना झाली. गावाकडे पोहोचता पोहोचता रस्त्याचे काम सुरु असल्या कारणाने थोडीशी पायपीट करावी लागली. या गावाला पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. पुस्तकांचे गाव नाही तर स्वप्न मधील गाव म्हटले पाहिजे. अनेक घरात विविध प्रकारची पुस्तके नीट रॅक वर, कपाटांमध्ये मांडून ठेवली होती. संपूर्ण गाव मराठी साहित्याची सेवा करताना दिसत होता. सरस्वती देवीचे माहेरघर असल्याचा भास होत होता तिथे पोहोचल्यावर सर्वाना एका घरात पूर्ण गावाची माहिती देण्यात आली. एक विडिओही दाखवटण्यात आला. एकूण 32 घरात या पुस्तकांचा विषया नुसार समाविष्ट होता. उमा शिंदे या सहाय्यक ग्रंथपाल तिथे तळमळीने काम करीत आहेत. मराठी भाषेचे, वाचन संस्कृतीचे असे मनापासून सेवा करणारे सेवक असतील तर या कार्याला मरण नाही. आम्ही सगळी नाही पण काही घरं फिरलो. बऱ्याच घरात मनसोक्त स्ट्रॉबेरीजचा फडशा पाडला. बऱ्याच जणांनी घरी नेण्यासाठी स्ट्रॉबेरीज विकतही घेतल्या. नियोजन केलेल्या ठिकाणी जेवणाचा आस्वाद घेऊन परतीच्या वाटेने कूच केले. पुढे मध्ये १ चहा घेऊन बस थेट रात्री ०८:०० वाजता मुंबई प्रभादेवी येथे पोहोचलो. दरवेळी वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या आर्थर सीटचा हा ३रा ट्रेक पुन्हा एकदा यशस्वी झाला.
दिनांक : ०६ मार्च २०२२
मोहिम प्रमुख :गायत्री म्हात्रे
मोहीम कार्यवाह :नम्रता सावंत
सहभागी सदस्य : ५१
सन २०२० च्या पहिल्या "महिला स्पेशल" ट्रेकच्या यशानंतर शिवशौर्य ट्रेकर्सने पुन्हा वेगळी वाट चोखाळत पालघर जिल्ह्यातील किल्ले अशेरी गडावर महिला दिनानिमित्त महिलांना समर्पित शिवशौर्य ट्रेकर्सचा Ladies Special ट्रेक आयोजित केला. जवळपास ११ वर्षांपूर्वी सुरू झालेल्या शिवशौर्य ट्रेकर्सच्या प्रवासातील हा दुसरा Ladies Special ट्रेक. पहिल्या ट्रेकला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आमचा ही उत्साह दुणावला होता. तरीही हुरहुर होती ती गेल्या दीड वर्षातील करोना परिस्थितीची. पण तरीही मळभ झटकून आम्ही उत्साहाने कामाला लागलो. मोहिमेची घोषणा झाल्यावर लगेचच नोंदणीसाठी फोन येऊ लागले. बघता बघता ५१ जणींची नोंदणी झाली. काही जणी कमी होत होत्या, तर काही नव्या नोंदणी करत होत्या. ह्या सर्वाचा Whatsapp Group बनवून त्यांच्यापर्यंत आवश्यक सुचना पोहोचवणे, त्यांची माहिती गोळा करणे हे सर्व चालू होते. ह्यावर्षी महिला दिन हा मंगळवारी येत असल्याने सर्वांना सोयीचा होईल असा रविवार म्हणजेच ६ मार्च २०२२ हा दिवस ट्रेकसाठी निश्चित करण्यात आला होता. सर्व गोष्टींची व्यवस्था पूर्ण होईपर्यंत शेवटी तो दिवस उजाडलाच. ह्यावर्षी पालघर जवळील अशेरीगड येथे महिला दिन साजरा करायचा ठरला होता. त्याप्रमाणे सकाळी ७:३० वाजता पालघर स्टेशन जवळ सर्वजणी एकत्र आल्या. तिथेच कांदे-पोह्याचा नाश्ता करून जीपने पुढील प्रवासाला सुरुवात केली.गड पायथ्याला पोहोचायला ९ वाजले. पोहोचल्यावर सर्वांना आवश्यक सुचना देवून लगेच चढाईला सुरुवात करण्यात आली. थांबत थबकत, फोटो काढत ११ वाजेपर्यंत आम्ही साऱ्याजणी गडमाथ्यावर पोहोचलो. तेथेच एका झाडाखाली थांबलो. सर्वांनी सोबत आणलेला खाऊ उघडला. ओळखी, गप्पा-टप्पा आणि थोडं फोटो सेशन सुरू झालं. नंतर मोहीम प्रमुख गायत्री म्हात्रे यांनी गडाच्या इतिहासाविषयी माहिती दिली आणि गड फेरीसाठी निघालो. गडावर पाहण्यासारखे बरेच अवशेष शिल्लक आहेत. जुन्या वाड्यांचे चौथरे तसेच गडावरील गुहेत देवीचे मंदिर आहे. तिथेच बाहेर ३ तोफा आहेत. ह्यातील एक तोफ गडावरील तलावात संर्वधन कार्यादरम्यान सापडली आहे. तिथेच आम्ही ग्रुप फोटो काढले आणि पुढे निघालो. गडावर ३ तलाव आणि १५ पाण्याच्या टाक्या आहेत. टाक्यातील पाणी पिण्यायोग्य असुन अतिशय गोड आहे. उंचावरून नजारा खूप सुंदर दिसतो. समोर कोहोज, असावा असे गड दिसतात. गडावर सदरेचेही काही अवशेष पाहण्यास मिळतात. रणरागिणींनी अगदी उत्साहात सर्व गोष्टींमध्ये सहभाग घेतला. दुपारी २:३० पर्यंत सर्व गड दर्शन पुर्ण करुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली. गड पायथ्याला गावात एका टपरीवर चहा घेऊन आलेला क्षीण घालवला. तिथेच प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. प्रमाणपत्रावर आपाआपले फोटो पाहून साऱ्याजणींचे चेहरे अगदी खुलले होते. सर्व जणी खूप खुश होत्या. इच्छा नव्हती ट्रेक संपवायची पण पुन्हा भेटण्यासाठी आता निघावं लागणार होतंच. जवळजवळ ५ च्या सुमारास आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
दिनांक : ११-१४ जुलै २०२२
मोहिम प्रमुख :अमित मेंगळे
मोहीम कार्यवाह :महेश म्हात्रे
सहभागी सदस्य : १०६
शिवशौर्य ट्रेकर्सची आषाढ वद्य प्रतिपदेला नित्य नेमाने पोहचणारी पावन वारी दोन वर्ष कोविड महामारीमुळे खंडित झाली होती. त्यातच पावनखिंड सिनेमाने सर्व सामान्य जनतेमध्ये पावनखिंडी बाबत कमालीचे औत्सुक्य वाढवले. या दोन्ही बाबींमुळे आधीच all time favourite असणारी शिवशौर्य ट्रेकर्सच्या "पन्हाळगड - पावनखिंड - विशाळगड" मोहिमेची बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली. नाव नोंदणी होत असतानाच टीम शिवशौर्य मोहिमेच्या तयारीला लागली. लागणाऱ्या सामानाची जुळवाजुळव, फोनवरून सहभागी होणाऱ्यांच्या शंकांचे निरसन, कोणी काय काय सामान घायचे, चार दिवसांच्या जबाबदाऱ्या सुद्धा वेगवेगळ्या खांद्यांवर सोपवल्या गेल्या. आणि एक दिवस आधीच मोहीम प्रमुख आणि सचिव पन्हाळ्यावर दाखल झाले. संभाजी महाराजांच्या मंदिरासमोर आमची गाडी थांबली. मंदिराचे पुजारी हनीफ नगारजी भेटीसाठी पुढे आले. त्यांना पाहून मोहीमप्रमुखांनी जोशात "जय शिवराय" आरोळी ठोकली. पण हनीफ यांच्याकडून थंड प्रतिसाद मिळाला. त्याचे उत्तरही लगेच मिळाले आणि धक्का बसला. हनीफ यांची ३ महिन्यांची नात सकाळीच निधन पावली होती. हनीफ यांचे घर, मंदिर शिवशौर्य साठी कायम उघडे असते. मोहिमेच्या १०० लोकांची जेवणाची व्यवस्था त्यांच्याच घरातुन होती. ज्याची मुलगी गेली आहे त्या शरीफ नगारजीचा टेम्पो आपण ३ दिवस ठरवला होता ३ महिन्यांचे बाळ जातं हे दुःख होतंच पण ऐनवेळेला आता १०० जणांच्या जेवणाचे काय? टेम्पोचे काय? याची चिंता लागली. पण प्रामाणिक कार्याला देव पाठीशी असतो याचा प्रत्यय कायम याच मोहिमेत येत असतो. १०० लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगारजी कुटुंबाने आपले दुःख बाजूला ठेवून हे शिवकार्य सुखरूप पार पाडण्याचे ठरवले. आपल्या सर्वांचा चहा नाष्टा पॅकलंच हे त्यांनीच बनवले. आणि ज्याचं बाळ आदल्या दिवशी गेलंय तोच स्वतः टेम्पोचे सारथी म्हणून ३ दिवस मोहिमेत सामील झाला. जात-पात-धर्म माणुसकीच्या आड आला नाही. आता पर्यंत असे प्रसंग सिनेमातच आपण बघितले असतील मोहिमेत आपण सर्वांनी ते प्रत्यक्ष अनुभवलेत. नगारजी कुटुंबाला या पुढे सुख समाधान निरोगी आयुष्य प्राप्त होवो हीच देवा जवळ प्रार्थना. सोमवार दि. ११ जुलै महाराष्ट्राच्या विविध भागातून मावळे जमण्यास सुरुवात झाली. जे सकाळी पोहचले ते पन्हाळगड फिरण्यास बाहेर पडले. डॉ. श्रीदत्त राऊत प्रत्येक मुर्त्या, अवशेष, स्तंभ, शिलालेख, देवळं, तटबंदी, बुरुज, दरवाजे या बद्दल इत्यंभूत माहिती देत होते. सायंकाळी श्रीदत्त यांनी संग्रहित केलेली शिवकालीन नाणी पहिल्यांदाच जाहीर प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांसमोर खुली झाली. शिवशौर्यच्या माध्यमातून सुरु झालेली गोष्ट पूर्णत्वास जाते असं राऊत सरांचं मत आहे. सदर प्रदर्शनाचे उदघाटन शिवशौर्यचे ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्य डॉ. रवींद्र शिवदे, श्री. डी डी पाटील सर, श्री. चंद्रशेखर पाटील सर यांनी केले. त्यानंतर अध्यक्षांनी संस्थेची तर उपस्थित सर्व मावळ्यांनी आपली ओळख करून दिली. पुढे सुरु झाला इतिहासाचा तास. खरंतर तासात मोडणारा हा तास नव्हताच. इतिहासाचं दालनच खुलं झालं होतं. जेवण आलं म्हणून थांबवावं लागलं इतके सर्वजण त्यात मग्न झाले होते. मंगळवार दि. १२ जुलै सूचनेप्रमाणे पहाटे ४.३० वाजता सर्व सैन्य उठलं. ६.३० वा. संभाजी महाराजांच्या मंदिरात जमून न्याहारी आटपून शिदोरी बांधून घेतली. बाजी प्रभूंच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून, श्रीफळ वाढवून मोहिमेस सुरुवात झाली. काही अंतरावरच गडावरून पायउतार होण्याची जागा आली. हीच ती राजदिंडी जिथून शिवाजी महाराजांची आणि शिवा काशीद यांची पालखी गड उतार झाल्या होत्या. याच ठिकाणी महाराजांनी शिवाकाशीद याचा निरोप घेतला होता. त्या दोंघांचे निरोपाचे संभाषण काय झाले असेल? दोघांच्याही मनात काय कालवाकालव झाली असेल? याचा विचार करतच आपले १०० मावळे राजदिंडी उतरू लागले. पन्हाळावरील सोयी सुविधा मागे ठेऊन आता आम्ही ग्रामीण जीवनशैली जवळून पाहत होतो. तुरुकवाडी गाव आलं, एक दमछाक करणारा चढ लागला. म्हाळुंगे गाव आलं. म्हसाई पठार सुरु झाले. म्हसाई देवीची आरती झाली. अजूनही पठार बाकी होते. कुंभारवाडी - खोतवाडी - मांडलाईवाडी - करपेवाडी ओलांडून जंगल सुरु झाले. आता सैन्य थोड्या दमाने चालू लागले. ४.३० वाजले होते. आंबेवाडी - कळकवाडी - रिंगेवाडी ओलांडून सायंकाळी ६ वाजता पहिली तुकडी माळेवाडी गावात अवतरली. आपापली जागा पकडून दिवसभर किती श्रम झाले, आपला मागे पडलेला मित्र, चिखलात झालेली घसरगुंडी याचे किस्से सुरु झाले. जेवणं झाली, चारी बाजूने बामचे, रॅली स्प्रे चे वास दरवळू लागले आणि आजच्या "दमछाक दिवसाची" समाप्ती झाली.
बुधवार दि. १३ जुलै
पहाटे लवकर उठायचे नव्हते, कारण आज अंतर कमी होते. तरीही कोंबड्याने त्याचे इतिकर्तव्य समजून खणखणीत आवाजात पहाटे ४.३० वाजता बांग देण्यास सुरुवात केली. मग काय उठून आन्हिकं ऊरकण्या शिवाय पर्यायच नव्हता. न्याहारी / शिदोरीचे कार्यक्रम पार पडून माळेवाडीचा निरोप घेतला. पाटेवाडी गाव व त्या नंतर सुरु झालेले घनदाट जंगल. छोटे छोटे ओढे, चिखलवाटा तुडवत एका मोठ्या ओढ्यापाशी येऊन विसावलो. हा ओढा वय विसरायला लावतो. लहान थोर सर्वांनीच या वाहत्या पाण्यात दंगा केला. सह्याद्रीत असंख्य आयुर्वेदिक झाडं झुडपं आहेत. त्यातूनच वाहत येणारे हे आयुर्वेदिक तीर्थ, जे शहरात नाही मिळू शकत. म्हणूनच मनसोक्त "तीर्थस्नान" करूनच त्या ओढ्यातून बाहेर पडलो. पुन्हा भिजलेल्या वाटा, दाट झाडी पार करून म्हाळसवडे या धनगर वाड्यात पोटपूजा केली. या नंतर एक टेकडी चढून माण वाडी आली. तिथून खाली उतरून डांबरी रस्त्यावरून मार्गक्रमण सुरु झाले. समोरच शिवशौर्यने लावलेला फलक नजरेस पडला. जुना शिवकालीन फरसबंदी मार्ग होता तिथे. पावन खिंडीच्या दिशेला जाणाऱ्या मार्गाची साफसफाई शिवशौर्य कडून केली गेली आहे. त्या पुढे पांढरपाणी गावात शिवाजी महाराजांनी विहीर बांधून दिली होती, आजही ती विहीर सुस्थितीत असून गावकऱ्यांची तहान भागवते. सायंकाळी मालाईवाडा गावात आमचा डेरा पडला. स्वागताला मुगाचे सूप आणि रात्रीचे जेवण म्हणून कोल्हापुरी मिसळ असा बेत होता. आजचं मार्गक्रमण कमी त्रासाचं असल्याने ट्रेक जास्त एन्जॉय करता आला. गप्पा टप्पा, मैफील होऊन आजचा दिवस संपला.
गुरुवार दि. १४ जुलै
आज आषाढ वद्य प्रतिपदा, पावनखिंड रणसंग्राम आजच्याच दिवशी घडला. या एका दिवसासाठी हजारो मावळे आपले काम धंदे सोडून येतात. या एका दिवसासाठी हजारो मावळे तंगडतोड करतात. या एका दिवसासाठी शहरी सोई सुविधा विसरून निसर्गाचा भाग होतात. मुख्यतः आपल्या राजाला, राजाच्या शिलेदारांना, सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांच्या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी येतात. श्रीदत्त राऊत यांनी नकाशाच्या आधारे पावनखिंडीचा इतिहास त्याच पावन रणक्षेत्रावर आपल्या ओघवत्या शैलीत मांडला. सर्वच उपस्थित तिथे भारावून गेले होते. रणभूमीचे पूजन झाले, आरती झाली आणि ६०० बांदल वीरांच्या रक्ताने पावन झालेल्या त्या रणक्षेत्राला नतमस्तक होऊन विशाळगडाकडे कूच केले. सायंकाळी ४ सुमारास विशाळगडावर चढाई झाली. सलग ४ दिवस इतिहासाचा जो जागर मांडला होता त्याची सांगता भगवंतेश्वर मंदिरात झाली. सहभागी सर्व मावळ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. शिवशौर्य ट्रेकर्स ही संस्था मुंबईची असली तरी संस्थेचा परिवार महाराष्ट्रभर पसरला आहे. या महा मोहिमेच्या निमित्ताने परिवाराचा अजून विस्तार झालाय असे अभिमानाने सांगावेसे वाटते. जे आज सहभागी सदस्य म्हणून श्रोते होते ते उद्या संस्थेचे शिलेदार म्हणून वक्ते असतील कारण हे कार्य फक्त ८-१० जणांचं नसून जमलेल्या सर्वांचं आहे. हे शिवकार्य आहे. हे कार्य अविरत सुरूच राहावे हि तो श्रींची इच्छा आहे.
दिनांक : ३१ जुलै २०२२
मोहिम प्रमुख :हार्दिक म्हात्रे
मोहीम कार्यवाह :सागर हर्षे
सहभागी सदस्य : ४२
शिवशौर्य ट्रेकर्सने यावर्षी देखील पावसाळी ट्रेकच वेगळेपण जपत भटकंतीसाठी निवड केली ती मुरबाड येथील गणपती गडद नावाने प्रसिद्ध असलेल्या कातळ लेण्यांची. दुर्ग-ढाकोबाच्या पोटात असणाऱ्या या गुहा म्हणजे दुर्गम ठिकाणी भटकंती करणाऱ्यांसाठी एक पर्वणीच. गडदेच्या दिशेने जाताना बाजूला असणाऱ्या नानाचा अंगठा, नाणेघाट, जीवधन या ऐतिहासिक वास्तू आपले लक्ष वेधून घेतात. या ट्रेकसाठी तब्बल ४२ जणांनी नावनोंदणी केली. रविवार ३१ जुलै रोजी सकाळी ५ ची कसारा ट्रेन पकडून सगळी मंडळी टिटवाळा येथे जमली. हजेरी होऊन ठीक ७.२० ला वाजता बस निघाली आणि साधारण दीड तासाने पायथ्याच्या सोनावळे गावात दाखल झालो. फ्रेश होऊन चहा-नाश्ता उरकून सुरू झाला लेण्यांचा प्रवास.
पावसाळी ट्रेक असूनसुद्धा वरुण राजा आमच्यावर रुसला होता त्यामुळे ऐन श्रावणात वैशाख वणव्याची अनुभूती येत होती. पण आमची सेना काही कमी नव्हती, असलेल्या वातावरणाचा आनंद लुटत ठिकठिकाणी थांबत फोटोसेशन करत मजल दरमजल सुरू होती. पुढे एका अवघड पॅचपाशी आलो जिथुन वरती चढणे थोडे जिकरीचे होते पण एकमेकांना सहाय्य करून तोदेखील टप्पा पार करत गुहेपाशी आलो. सातव्या शतकात खोदलेल्या गडद इथल्या भव्य लेण्यांद्वारे तात्कालिन संस्कृतीची ओळख होण्यासाठी मोठी मदत होते. गणेश लेणी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दगडी गुहेत विविध दालने असून त्यामध्ये विविध हिंदू देवी देवतांची शिल्पे कोरण्यात आली आहेत. मध्यभागी मुख्य सभागृह आहे आणि शेजारीच छोटीशी तीन-चार दालने असे या लेण्यांचे स्वरूप आहे. लेण्यांच्या बाहेरील बाजूस पाण्याच्या टाक्या देखील आढळतात. गुहेत गणपतीच्या मुर्त्या आहेत, गुहा तशी प्रशस्त आहे.
पावसाळ्याच्या दिवसांत लेण्यांच्या माथ्यावरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे पाण्याची एक चादरच गडदेसमोर पाहायला मिळते ज्यामुळेच पर्यटक गडदकडे आकर्षित होतात. गुहा फिरून बाप्पाचे दर्शन घेऊन सगळे गुहेतच एकत्र एका बाजूला जमलो. मोहिम प्रमुखांनी गुहेबद्दल थोडक्यात माहिती सांगितली म एक ग्रुप फोटो काढून झाल्यावर थोडासा आराम करुन परतीच्या वाटेला लागलो. सोनावळ्यातून निसर्गाच्या कुशीतून गणपती गडद गाठताना आपण त्या वातावरणात रमून जातो. हा छोटा ट्रेक जेव्हा आपण गडदेत पोहोचतो, तेव्हा येथे आल्याचे सार्थक घडवतो. गावात आल्यावर गरमागरम जेवण तय्यारच होते त्यावर आडवा हात मारुन सर्व जण टिटवाळ्याच्या दिशेने निघालो. टिटवाळ्याहून ट्रेन पकडून सगळे ट्रेकच्या सुंदर आठवणी घेऊन घराकडे निघाले खरे पण पावसाने हजेरी न लावल्याची रुखरुख मनात होतीच.
दिनांक : १५ ऑगस्ट २०२२
मोहिम प्रमुख :अमित मेंगळे
मोहीम कार्यवाह :कुणाल राणे
सहभागी सदस्य : १५
असं म्हणतात कि जेव्हा तुम्ही देश पायी फिरता तेव्हा खऱ्या अर्थाने तिथल्या लोकांशी समरस होता, नवीन अनुभव आपल्या गाठीशी येतात. ह्या प्रवासात जर अनुभवी मंडळी व आत्ताच सुरुवात केलेली चिल्ली पिल्ली असतील तर दोघांकडूनही आम्हा मध्यमवयी मुलांना भरपूर शिकता येत.
आमच्या शिवशौर्य चे ट्रेक्स हे असेच अनुभव देणारी पर्वणीच आहे. इथे खुळे काका, अमित व शार्दूल दादा सारखी बरीच अनुभवी मंडळी सुद्धा आहेत आणि मुद्रा, राञी, चिऊ अशी बरीच लहानगी आम्हाला वेळोवेळी काहीतरी नवीन धडे देत असतात.
अशीच ह्यावेळची भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षाचा मुहूर्त साधून आखलेली कर्जतयेथील एकदिवसीय कोथळीगड येथील मोहीम. आधी ठरवल्याप्रमाणे १५ ऑगस्ट ला साल्हेर ची मोहीम होती पण काही कारणास्तव अगदी १५ दिवसांअगोदर किल्ले साल्हेर बदलून कोथळीगड करावी लागली आणि मोहीम प्रमुख म्हणून मी आणि मोहीम कार्यवाह म्हणून अजित नर ह्याने जबाबदारी स्वीकारली. आम्ही आपापल्या परीने सर्वांपर्यंत माहिती सामायिक करत होतो पण बरेच दिवस मोहिमेला हवा तसा प्रतिसाद येत नव्हता. १२ तारखेला अविनाश खुळे काकांचा फोन आला ते यायला तयार होते, म्हणाले तिरंगा फडकवायला फक्त ३-४ जण असलो तरी देखील जाऊ मग मला थोड हायस वाटलं. असं करत करत १४ तारखेच्या सकाळपर्यंत ७ तर दुपारच्या १२ नंतर चक्क १५ जण तयार झाले त्यात काही नवीन समवयस्क मित्र मैत्रिणींचा गट सुद्धा होता. मी व अजितने ताबडतोब त्या हिशोबाने जेवणाची व येण्याजाण्याची सोय केली. बॅग वरून भरून, जेवून मी संध्याकाळी ९ च्या आसपास बोरिवली स्टेशन ला पोहोचलो. तिथे खुळे काका व पुढे प्रवासात कास्कर काका, काकी आणि त्यांचा मुलगा भेटला. ठरल्याप्रमाणे सर्वांनी दादरवरून १०.२८ ची ट्रेन पकडली पण त्यात आम्हा सर्वांना surprise म्हणजे अगदी ऐन वेळी अमित दादाने ठरवल कि तोही येतोय. मी तर खुळे काकांच्याच बाजूला बसून होतो. खुळे काका म्हणजे ट्रेकिंग च्या दुनियेतील महाराष्ट्रातील अग्रेसर व्यक्तींपैकी एक व हरहुन्नरी व्यक्तिमत्व. त्यांच्याकडे त्यांच्या अनुभवाचा भलामोठा खजिना आहे जो ते सर्वांना भरभरून वाटत असतात. त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारत मारत वेळ कसा गेला कळलं नाही व आम्ही दीड च्या सुमारास कर्जत स्टेशन ला उतरलो. तिथे सर्वांनी पटापट गोष्टी उरकून उल्हास ह्यांच्या टमटम मध्ये उड्या टाकल्या. जवळजवळ एक तासाभराने आम्ही आंबिवली येथे गोपाळ जोरी ह्यांच्या हॉटेलात आलो. सर्वानी पटापट अंथरूण काढली व लगबगीने झोपी गेले.
जवळपास दोन तासाच्या विश्रांतीनंतर सर्वजण ५.३० ला उठून तयारीला लागले तिथेच चहा झाला. ट्रेकला सुरुवात करण्यापूर्वी गोपाळ ह्यांच्या मोठ्या भावाच्या दोन्ही मुंलांनी स्वातंत्र्य विषयावर भाषण न गीत सादर केले. गोपाळदादानेहि कोथळीगडाची ऐतिहासिक'माहिती व शिवाजी महाराजांची शिकवण व आजच्या जगात त्यांचा वापर ह्यावर अगदी सुंदर भाष्य केले. मग आमची ट्रेक सुरु झाला. सोबत गावचे रहिवासी भांबुर्डे काका guide म्हणून होते. मी पुढे होतो. पायवाट असल्याकारणाने जंगलातून मार्ग काढणं अगदी सोप्प होतं. पुढे पेठ गावाजवळ पोहोचल्यावर एका जागेवरून आम्हांला कोथळीगड व त्याच्या आजूबाजूचा अगम्य असा निसर्ग दृष्टीस पडला. त्यात मस्त असा वारा वाहत होता. आम्हाला कोणालाही ते सौन्दर्य सोडून पुढे जाववेना. म्हणून सर्वांच एक मस्त असं photo session तिथे झाल. पुढे काही मिनिटात आम्ही वर पेठ माचीवर गोपाळ जोरी ह्यांच्या घरी गेलो. त्यासमोरच एक विरगळ आहे ती व्यवस्थित पाहिली. तिथे घरी मनसोक्त पोहे व चहा घेऊन सर्वांनीच थोडा वेळ आराम केला. मग ९.३० च्या दरम्यान पुन्हा चालायला सुरुवात केली. १०.३० वाजता आम्ही अखेरीस वर कोथळीगडाच्या भैरोबाच्या गुहेत पोहोचलो. तिथे नमस्कार करून लेणी पाहून सर्व शांत बसले. मग खुळे काकांनी नवीन आलेल्या आपल्या मित्रमंडळींपैकी एक प्रीतम ह्याला बोलावलं. हा मुलगा कामाने एक animator पण त्याचा आवाज अगदी गोड व सुरेख होता. त्याच्या आवाजात अशी काही जादू होती कि त्या जुन्या मराठी -हिंदी गाण्यांमध्ये आम्ही सर्वच मग्न होऊन स्वरानंद घेऊ लागलो.
नंतर अर्ध्या तासाने गडाच्या माथ्यावर जाऊन तिथे ध्वजवंदनासाठी तयारी सुरु केली. राष्ट्राचा तिरंगा व स्वराज्याचा भगवा झेंडा हातात धरून सर्वांनी एका सुरात राष्ट्रगीत गायलं. ह्यावेळी पारतंत्र्यात गेलेल्या आपल्या मातृभमीला सोडविण्यासाठी केलेले महाराजांचे, मराठ्यांचे व अश्या असंख्य हिंदुस्थान वासियांचे त्याग व बलिदान आमच्या स्मरणात होते. वंदे मातरम च्या घोषणा दुमदुमू लागल्या. त्याच दिवशी शिवशौर्य चे काही मावळे सुद्धा रायगडावर आपल्या तिरंग्याला नमन करत होते. कारण अखंड हिंदुस्थानाच स्वातंत्र्याचं स्फूर्तिस्थान रायगड हे होत.
परतीच्या वाटेवर भरभरून पाऊस लागला. मी खुळेकाकांसोबत पेठ किल्ल्याच्या आठवणी, कंटोळ्याची भाजी , खवा, कारवीच्या झाडे अश्या अनेक विषयांवर त्यांच्याशी गप्पा मारत मी व भांबुर्डे काका खाली उतरत होतो. नवीन मंडळी बरीच मागे होती. वाटेत आम्हाला एक तरुण पोलीस व त्याचा मित्र भेटला. दोघेही मालवणी त्यामुळे आमची सहजच ओळख झाली व गप्पा सुरु झाल्या. तो एका कारागृहातील फाशी विभागात काम करत होता त्यामुळे त्याने त्याचे बरेच चांगले वाईट अनुभव, त्याचं पुढचं करिअर प्लानिंग व असं बरच काही सांगितलं. ते ऐकून आम्हा दोघांना त्याच्याबद्दल आदर अधिकच वाढला. आम्ही नंतर आंबिवली च्या पायथ्याशी गोपाळदादाच्या हॉटेलात परतलो. बरेच जण मागून येत होते आणि बऱ्याच जणांना भूक अनावर झालेली. त्यामुळे जेवण उरकायला सुरुवात झाली. त्यानंतर अध्यक्ष सचिन कातकर व खुळे काकांच्या हस्ते तिथल्याच शाळेला शिवशौर्यकडून मदत म्हणून एक पंखा व पेन्सिल बॉक्स देण्यात आला. इथेच आमच्या ट्रेकची सांगता झाली व सर्वजण टमटम मध्ये बसून कर्जत स्टेशन कडे पुन्हा मार्गस्थ झाले.
दिनांक : २१ ऑगस्ट २०२२
मोहिम प्रमुख :राम सातपुते
मोहीम कार्यवाह :नम्रता सावंत
सहभागी सदस्य : २०
शिवशौर्य ट्रेकर्स नेहमीच काहीतरी नवनवीन उपक्रम राबवण्याच्या प्रयत्नात असते. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. मोहिमेची तारीख आणि आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिवस हे दोन्ही एकाच दिवशी असणे हा निव्वळ योगायोग होता. नियोजन पूर्ण झाले आणि ट्रेकचा दिवस उजाडला. २१ ऑगस्टच्या सकाळी २० चिरतरुण मंडळी ट्रेनने कर्जतच्या दिशेने निघाली. ८.१५ च्या सुमारास कर्जत स्टेशनला उतरून पुढील प्रवास ट्रॅक्सने करून पायथ्याच्या कोंढाणे गावात पोहोचली. त्यानंतर चहा-नाश्ता होऊन उपस्थितांची ओळख परेड झाली आणि मोहीमप्रमुख व मोहीम कार्यवाह यांनी सूचना सांगून झाल्यावर एक समूह फोटो काढून निसर्ग मोहिमेला सुरुवात झाली. कल्याणचे ज्येष्ठ लेणी अभ्यासक आणि नाणी व दगड संग्रहक तसेच शिवशौर्य परिवाराचे सदस्य श्री. विजय विखरणकर यांची उपस्थिती हे या मोहिमेचे मुख्य आकर्षण होते.
मजल दरमजल करत हिरवागार निसर्ग सौंदर्य न्याहाळत, ओढे-नाले तुडवत, खळखळणाऱ्या धबधब्यांचा मनमुराद आनंद लुटत साधारण १०:०० च्या आसपास सगळे लेण्यांपाशी पोहोचले. स्थिरस्थावर झाले आणि सुरू झाला लेणी अभ्यास मोहिमेचा रंजक प्रवास. लेणी म्हणजे काय, त्याच तंत्रज्ञान भारतात कुठून आलं, लेण्यांचे प्रकार, त्यांचा उपयोग इत्यादी बद्दलची सखोल माहिती विखरणकर सरांनी दिली. त्यानंतर सरांनी त्यांच्या संग्रहातील सोबत आणलेली विविध प्रकारची नाणी आणि दगड पहायला दिली व त्याबद्दल विस्तृत माहितीही दिली. उपस्थितांनी त्यांच्या शंकांचे निरसन देखील करून घेतले. लेण्यांच्या परिसराचा फेरफटका मारून, फोटोसेशन होऊन एक ग्रुप फोटो झाला आणि आपल्याकडील अमूल्य अशी माहिती देऊन उपस्थितांच्या ज्ञानात भर घातल्याबद्दल विखरणकर सरांचा शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे सत्कार करून मंडळी पायथ्याच्या गावाकडे निघाली. परतीच्या वाटेत येताना काही जणांनी धबधब्यावर यथेच्छ भिजण्याचा आनंद लुटला, तर काही जणांनी टाकळ्याची रानभाजी गोळा केली. साधारण दुपारी २:०० च्या सुमारास पायथ्याच्या गावात येऊन फ्रेश होऊन सगळ्यांची जेवणं झाली. आनंदमय व उत्साहवर्धक वातावरणात मोहिमेची सांगता झाली आणि ट्रॅक्सने सर्वजण ट्रेन पकडण्यासाठी कर्जतच्या दिशेने निघाले. सर्व सहभागी चिरतरुणांना ट्रेनमध्ये प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
गड-किल्ले मोहिमा, गड-किल्ले संवर्धन मोहिमा, बाल मोहिमा, महिला विशेष ट्रेक, रक्तदान शिबिर, शिवकालीन शस्त्रे-नाणी प्रदर्शन, पूरग्रस्तांना मदत, शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप यासोबत आता ज्येष्ठ नागरिक ट्रेकचं यशस्वी आयोजन करून शिवशौर्य ट्रेकर्सने आपल्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला आहे.
दिनांक : ११ सप्टेंबर २०२२
मोहिम प्रमुख :प्रफुल बिडू
मोहीम कार्यवाह :अजित नर
सहभागी सदस्य : ४१
शिवशौर्य ट्रेकर्स ही संस्था गेली अनेक वर्षे गडकिल्ल्यांवर मोहिमा राबवत आहे. हजारो बंधू-भगिनींना गड आणि तेथील इतिहासाची ओळख करून देत आली आहे. किल्ल्यांच्या इतिहासाबरोबरच पुरातन प्रचलित घाटवाटा याचा अभ्यास आणि त्यांचा मागोवा म्हणून घाट वाटांचे ट्रेक संस्थेतर्फे राबविण्यात येतात आणि त्याचाच एक भाग म्हणून अहुपे घाट हा ट्रेक निवडला गेला. ज्या प्रमाणे नाणे घाट हा प्राचीन घाटमार्ग प्रचलित आहे त्याचप्रमाणे अहुपे घाट हा सुद्धा प्रचलित घाट मार्ग म्हणून याचा वापर आजही केला जातो. खोपिवली ते मुरबाड या मार्गांवर म्हसा हे गाव लागते. तेथे रविवारचा मोठा आठवडा बाजार, बैल बाजार भरतो. पुणे जिल्ह्यातील लोक म्हसा येथे बैलांची खरेदी-विक्री करण्याकरिता याच मार्गाचा वापर करतात. म्हणून या घाटरस्त्याला बैल घाट सुद्धा म्हणतात.
१० सप्टेंबर २०२२ रोजी रात्री साधारण १०.०० वाजता मुंबईहून आमची गाडी निघाली. आमच्या ट्रेक मध्ये सहभागी झालेल्या शिल्पा कास्कर आणि स्नेहल घाग या दोघांचा वाढदिवस असल्यामुळे बस मध्येच केक कापून वाढदिवस साजरा झाला. ठाणे-कल्याण-शहाड-मुरबाड अशी ठिकाणे घेत खोपिवली हे गाव गाठले. त्यावेळी तीन वाजले होते. गावातील पप्पू भोईर यांनी तेथेच जवळ असलेल्या स्पोर्टस रूम मध्ये फ्रेश होण्यासाठीची व्यवस्था केली होती. सहा वाजता फ्रेश होऊन सगळे जण पप्पू भोईर यांच्या खोपिवली गावातील घरी गेले. तेथे कांदेपोहे, चहा-नाश्ता झाला त्यानंतर भाकरी आणि छोले-बटाटा भाजी डब्यात घेऊन सगळ्यांनी अहुपे घाटाच्या दिशेने कुच केले. छान अशी भाताची रोपे न्याहाळत बांधाच्या कडेने गावातील रस्ता चालुन झाला. पुढे एक मोठा वहाळ लागला तॊ पार केला. हळूहळू घाट रस्ता चढ चालु झाला. सगळे जण स्वतःचा तोल सांभाळत चालत होते. दगडावर शेवाळ साठल्यामुळे बरेच जण पाय घसरून पडत होते. आता चालून दोन तास झाले होते. एक छान असा धबधबा लागला. बरेचजण तोंडावर पाणी मारत होते, पाणी पीत होते त्यामुळे पुन्हा ताजेतवाने झाल्यासारखे वाटत होते. पुन्हा चालु लागलो गाईड काकांना काहीजण विचारत की अहुपे गाव यायला आता किती वेळ लागेल. काका त्याना सांगत हा थोडं तॊ डोंगर चढून गेलो की आलच. बऱ्याच ठिकाणी डोंगराची पडझड झालेली असल्यामुळे रस्ता बंद झाला होता त्यावर मार्ग काढत सगळे जण पुढे जात होते. असे करत करत साडे अकरा वाजले. आता आम्ही अहुपे गावाच्या घाटमाथ्यावर आलो. सकाळी साडे सात वाजता आमचा ट्रेक सुरु होऊन जवळजवळ चार तास आम्हाला पोहोचायला लागले. त्यानंतर आम्ही जेवण उरकले. जेवण झाल्यानंतर शिल्पा कास्कर यांनी गोडधोड खाऊ घातले. त्यानंतर मात्र पावसाने चांगलाच जोर पकडला. थंडी पण वाजत होती. आमच्या ट्रेक मध्ये बरीच छोटी मंडळी होती त्याना थंडी वाजत होती तरी पण ते पावसाची मजा घेत होते. पाऊस चालु असतानाच आम्ही अहुपे गावाला फेरफटका मारला. खरंच खुप सुंदर असे गाव. सगळ्यांनी तेथे एक ग्रुप फोटो काढला आणि आम्ही अहुपे घाट उतरायला सुरवात केली. अचानक पाऊस भरपूर झाल्यामुळे धबधब्याना आणि ओहोळाला भरपूर पाणी वाढले होते. आता मात्र प्रत्येकाचे पाय थोडे थोडे दुखू लागले होते. गावातल्या ओहोळाचे पाणी खुप वाढले होते. सिद्धार्थ दादाने रोप बांधून सगळ्यांना सुरक्षित पलीकड़े आणले.
खोपिवली गावात उतरलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. पुन्हा पप्पू भोईर यांच्या घरी आलो आणि यथेच्छ कांदाभाजी, गोलभजी आणि चहा यांचा आस्वाद घेतला व परतीच्या मार्गाला लागलो. ट्रेक खुप छान झाला. तन मन निसर्गाच्या कुशीत शिरून सार्थकी झालं होत.
दिनांक : २ ऑक्टोबर २०२२
मोहिम प्रमुख :सिद्धार्थ बाविस्कर
मोहीम कार्यवाह :गौतम कास्कर
सहभागी सदस्य : ८
निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या शेवते घाट आणि मढे घाट ट्रेकची सर्व ट्रेकर्स आतुरतेने वाट बघत होते. पण नवरात्र उत्सव असल्यामुळे ट्रेकसाठी आठ सदस्यांचीच नावे आल्या कारणाने ट्रेक करावा की पुढे ढकलावा अशी परिस्थिती असताना ट्रेक ठरलेल्या दिवशीच करण्याचा निर्णय झाला. छोटी गाडी घेऊन शनिवारी दि.०१/१०/२०२२ रोजी रात्री १०:३० वा. अंधेरी वरून प्रवासाला सुरुवात केली. गौतम, सिद्धार्थ आणि धुमाळ भाऊ अंधेरीहुन गाडीत बसले तर सागर हर्षे, सागर डेरे, पावसकर भाऊ आणि सावंत भाऊ जुईनगर येथून गाडीत बसले. माणगाव, महाड, बिरवाडी, वाकी करत सकाळी ०५:३० वा. शेवते गावात गाईड संतोष बुवांच्या घरी पोहोचलो जिथे अविनाश खुळे काका आदल्या दिवशीच मुक्कामी येऊन आमची वाट पाहत होते. थोडावेळ आराम करून नंतर फ्रेश होऊन चहा आणि कांदेपोहे खाऊन सकाळी ०७:०० वा. ट्रेकला सुरुवात केली. सर्वत्र पसरलेले हिरवे गार रान, नागमोडी वळणे आणि पावसाळ्यातील धुंद असे वातावरण. धुक्याने कवेत घेतलेल्या डोंगर रांगांच्या मधून आम्ही घाट चढत होतो. हिरव्या रंगाच्या वेगवेगळ्या छटा आम्ही न्याहाळत होतो. फक्त आठ जणांचा ग्रुप असल्याने आम्ही सर्व एकत्रच चालत होतो. साधारण तीन-साडेतीन तासात शेवटे घाटाच्या उंच पाॅईंटला चढून गेलो. तिथून पुढील वाट सरळ आणि कमी चढ उताराची होती. वाटेत वेगवेगळ्या रंगांची रानफुले फुलली होती. जणू निसर्ग आमच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. आमच्यातील अनुभवी ट्रेकर्स अविनाश खुळे भाऊ म्हणाले की, बर्याच वर्षांनंतर इतका सुंदर निसर्ग मी अनुभवत आहे. पुर्वी बैलांच्या पाठीवर सामान लादून पुणे आणि रायगड जिल्ह्या दरम्यान व्यापार होत असे. आता या घाटाचा खूप कमी वापर केला जातो.
आमचे गाईड संतोष बुवा शेवते घाट आणि आजूबाजूच्या परिसराची खूप छान माहिती देत होते. वर जंगलात रानडुक्कर, भेकर, ससा, गवा, बिबट्या वैगरे प्राण्यांचा वावर असतो. वाटेत एका ओहोळात पाय मोकळे करून सर्वजण बसलो. त्या ओहोळाच्या शुद्ध आणि अविट अश्या गोडीच्या पाण्याने सर्वांनी आपली तृष्णा भागवली. दुपारी ०२:३० वा. घाट माथ्यावरील केळद या गावी शिंदे भाऊंच्या 'गिरीराज हाॅटेल' येथे पोहोचलो. तिथे पोहोचून फ्रेश होऊन गरमागरम जेवणावर मस्त ताव मारला. शिंदे भाऊंनी जेवणाची उत्तम सोय केली होती. दुपारी ०३:३० वा. केळदहून मढे घाट उतरायला सुरुवात केली. सिंहगडच्या लढाईत नरवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आल्यावर त्यांचा पार्थिव देह (मढे) या घाटातून उतरवून त्यांच्या उंबरठ या गावी नेण्यात आला होता म्हणून या घाटाला 'मढे घाट' असे नाव पडले. मढे घाटाच्या धबधब्यातून रॅपलिंगचा थरार सुरू होता. घाट उतरून खाली आल्यावर अविनाश खुळे भाऊ आमच्या गाईडला म्हणाले की, तुम्ही तुमच्या गावातील मुलांना तयार करा, मी आमच्या शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे तुम्हाला क्लायम्बिंगचे / रॅपलिंगचे परिपूर्ण असे प्रशिक्षण देऊ म्हणजे तुम्हा गावकऱ्यांना उदरनिर्वाहाचे आणखी एक साधन निर्माण होईल. संध्याकाळी ०५:३० वा. मढे घाट उतरून पायथ्याला कर्णवडी या गावी पोहोचलो. आमची गाडी आधीच येऊन तिथे उभी होती. कर्णवडी गावाचा निरोप घेऊन एक सुंदर असा ट्रेक संपवून मुंबईसाठी प्रस्थान केले. सर्व सहभागी ट्रेकर्स चे मन:पूर्वक आभार.
धन्यवाद.
जय शिवराय !!!🙏🚩
दिनांक : ८ - ९ ऑक्टोबर २०२२
मोहिम प्रमुख :विशाखा चौधरी
मोहीम कार्यवाह :सागर हर्षे
सहभागी सदस्य : ४१
प्रदक्षिणेसी अवघड पुजिला तो रायगड,
शिवतीर्थाचा गड तो दुर्गाधिपती शोभला !
महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते...,
"राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोट, चौतर्फा पाहता कडे तासिल्याप्रमाणे गाव दीड-गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही पण धोंडीतासे एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवरचा चखोट गड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादहून दशगुण उंच ऐसे देखोन राजे संतोषिले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड खरा".
रायगड पहायला तर सर्वच जातात, पण रायगडाच्या रहाळ परिसरातून प्रदक्षिणा करत परिसरात असलेल्या गावामधील इतिहास जाणून घेण्यासाठी आखलेली ही मोहीम.
ट्रेकिंगच्या क्षेत्रात प्रत्येकवेळी काहीतरी नवीन कल्पना राबवणं यासाठीच शिवशौर्य ट्रेकर्सची नेहमी धडपड सुरू असते. त्याचाच एक भाग म्हणून ही परिक्रमेची मोहीम सुचली आणि यशस्वीरित्या पार पाडण्यात आली. नेहमीप्रमाणे मोहीम ठरली, नाव नोंदणी सुरू झाली आणि बघता बघता मुंबई, पालघर, चिपळूण, बीड, नांदेड, लातूर अश्या वेगवेगळ्या भागातून ४१ मावळ्यांची फौज उभी राहिली आणि विविध मार्गांनी ८ ऑक्टोबर २०२२ रोजी पहाटेसच रायगडाच्या पायथ्याच्या हिरकणीवाडीत डेरेदाखल झाली. सकाळचे सोपस्कार आटपून चहा-नाश्ता करून दुपारची शिदोरी आपल्या सोबत घेऊन हजेरी झाली आणि मावळ्यांनी मोहिमेची म्हणजेच परिक्रमेची वाट धरली.
हिरकणीवाडीतून सुरू झालेली परिक्रमा पुढे कधी डांबरी रस्ता, कधी कच्चा रस्ता, ओढे-नाले, शेतीचे बांध, छोटे-मोठे साकव पार करत काळकाई खिंड, तेथील जिवाजी लाड यांची समाधी, पोटल्याचा डोंगर, वाघ दरवाजा (सकाळच्या वेळी धुकं असल्याने दर्शन झाले नाही), वाघजाई मंदिर, वाघोली गावातील महाराजांचे स्मारक, मांघरूण मार्गे दुपारी साधारण १.३० च्या सुमारास दुपारच्या जेवणासाठी वाळणकोंड येथे काळ नदीच्या पात्रात विसावली. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या उघडल्या आणि निसर्गाचा आनंद घेत संपवल्या देखील. भोजनानंतर काळ नदी पात्रातील वरदायिनीच्या ठाण्याचे दर्शन घेतले आणि काळ नदीवरील पूल देखील पाहिला जो की पाहण्यासारखा आहे. काळ नदीच्या त्या किनाऱ्यावरून समोरच रौद्रभिषण असा लिंगाणा आपले लक्ष वेधून घेतो. त्यासोबत समोर असलेल्या सिंगापूर धबधबा, आग्याची नाळ, बोराट्याची नाळ, फडताळ नाळ या जागा देखील ट्रेकर्स मंडळीना खुणावत होत्या. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटून परिक्रमा वाघेरी मार्गे वारंगी गावाकडे रात्रीच्या मुक्कामासाठी मार्गस्थ झाली. दुपारी ३.३० वाजता वारंगी गावात आल्यावर श्री. समीर चाळके यांच्या घरी स्थिर-स्थावर होऊन फक्कड असा चहा झाला आणि सगळेजण दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी काळ नदीच्या थंडगार पाण्यात उतरले. साधारण एक-दीड तास पाण्यात डुंबल्यावर सर्वजण दिवसभराची पायपीट विसरून ताजेतवाने झाले होते. संध्याकाळी गावातीलच ऐतिहासिक अश्या शिव हनुमान मंदिराला भेट दिली जिथे गडावरील महाराजांच्या पूजेतील तांदळा पहावयास मिळतो (जुल्फीकार खानाने जेव्हा रायगडाला वेढा दिला होता त्यावेळी तो तांदळा मावळ्यांनी भवानी कड्यावरून खाली वारंगी गावात आणल्याची कथा सांगितली जाते). मंदिराच्या परिसरातच समीर दादांनी मंदिराबद्दल, गावाबद्दल आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल छान अशी माहिती दिली. दिवसभर थकल्यामुळे रात्रीची जेवणं लवकरच उरकली आणि साधारण ९ च्या आसपासच काहीजण रामाच्या मंदिरात, काहीजण मंदिराच्या पटांगणात, काहीजण ओसरीवर तर काहीजण घरात असे क्षणार्धातच निद्रा देवीच्या स्वाधीन झाले.
दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचे होते त्यामुळे सूर्योदयापूर्वीच सगळेजण उठून तयार झाले होते. गरमा गरम कांदे पोहे आणि चहा झाला. त्यानंतर समीर दादांना सोबत घेऊन उर्वरित परिक्रमेला सुरुवात झाली. काळ नदीचा पूल पार करून कातकरवाडी, टकमकवाडी, रायगडवाडी मागे टाकत नाणे दरवाजापाशी येऊन पोहोचलो. आजचा रस्ता मात्र बऱ्यापैकी चढणीचा आणि डोंगरातला होता त्यात ऊनही चांगलेच होते. पुढे प्रत्येकजण आपापल्या चालीप्रमाणे गड चढून शिरकाई देवीच्या मंदिरासमोर येऊन थांबत होते. सर्वजण एकत्र आल्यावर पुढे महाराजांचे सिंहासन, होळीचा माळ, बाजारपेठ करत जगदिश्वर मंदिरात दर्शन घेऊन महाराजांच्या समाधी जवळ नतमस्तक झालो. आकाश एकदम निरभ्र असल्याने गडावरून आजूबाजूचा परिसर अगदी स्पष्ट दिसत होता. तो बघून झाल्यावर जगदिश्वर मंदिराच्या आवारात एक ग्रुप फोटो काढण्यात आला. दुपारची जेवणं गडावरच उरकून साधारण ४ च्या सुमारास गड उतरायला घेऊन ५.३० ला चित्त दरवाज्याने पायथ्याशी येऊन परिक्रमेची सांगता झाली. दोन दिवसांच्या भटकंतीत वेगवेगळ्या मित्र-मैत्रिणींशी ओळख होऊन खुप गप्पा झाल्या होत्या खऱ्या पण आता निरोपाची वेळ झाली होती. अशाच एका ट्रेकला किंवा भटकंतीत पुन्हा एकदा भेटू असे म्हणत सगळेजण एकमेकांचा निरोप घेत आपापल्या घराकडे मार्गस्थ झाले.
परिक्रमेतील सहभागी सर्व मावळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि दिलेल्या सहकार्याबद्दल आभार.
धन्यवाद... 🙏🏻
|| जय भवानी 🚩जय शिवराय ||
दिनांक : ३० ऑक्टोबर २०२२
मोहिम प्रमुख :काव्या शिरसाट
मोहीम कार्यवाह : तेजश्री खरपुडे
सहभागी सदस्य : ४८
शिवशौर्य ट्रेकर्स एक सामाजिक बांधिलकी म्हणून लहान मुलांना प्रत्यक्ष किल्ल्याचा इतिहास अनुभवता यावा यासाठी दरवर्षी निःशुल्क बालमोहीम आयोजित करत असते. दिवाळीच्या सुट्टीत वेध लागतात ते या बालमोहिमेचे. यावर्षी बालमोहिमेसाठी किल्ले प्रबळगड निवडला होता. या ट्रेकची खासियत अशी असते की, ट्रेक जाहीर होण्याआधीच निम्मा भरून जातो. ३० ऑक्टोबर बालमोहिमेचा दिवस आला. बस सकाळी प्रभादेवीहून ठरलेल्या वेळेच्या थोडी उशिरा सुटली. मुलं मात्र वेळेआधीच उपस्थित होती. नाशिककर मंडळी रात्री ३ वाजता नाशिकवरून निघाली आणि थांबत थांबत सकाळी ८.३० च्या सुमारास पनवेलला पोहोचली. बसमध्येच मुलांनी आणलेला नाश्ता केला. काहीजण गाणी म्हणत होते, तर काही आपली झोप पूर्ण करत होते. प्रभादेवीहून सुटलेली बस वाटेत मुलांना घेत घेत पनवेलला पोहोचली. तिथे पोहोचल्यावर हजेरी झाली. गडाकडे जाणारी वाट निमुळती असल्याने बस थोडी मागे उभी करून सगळे पायथ्याशी जमा झाले. सकाळी ९ वाजता ४८ मावळ्यांना घेऊन प्रबळगड चढायला सुरुवात केली. मोहीमप्रमुख पुढे, मागे बाकी मावळे असा प्रवास सुरु झाला आणि साधारण २ तासाच्या चढाई नंतर प्रबळ माचीवर पोहोचले.
प्रबळगड माचीवर निरंजन दादांनी कवी भूषण यांचे छंद बोलून दाखवले व त्याचा अर्थही समजावून सांगितला. थोडीशी पेटपूजा करून पाण्याच्या रिकाम्या झालेल्या बाटल्या भरून बहुतेकशे गडाच्या माथ्याच्या दिशेने निघाले तर काही मावळे माचीवरच थांबले. दुपारचे १२ वाजले होते ऑक्टोबर महिन्यातील ऊन, तरीही सगळयांमध्ये एकच जोश होता. साधारण २ तासात गडमाथा गाठला. गडावरील सर्व वास्तू पडलेल्या अवस्थेत आहेत, हे पाहून खूप वाईट वाटलं. गडावर ठिकठिकाणी पाण्याच्या टाक्या आहेत ज्यात थंड पाणी होते. उन्हाच्या तडाख्याने सगळे दमले होते, जणू काही महाराज परीक्षा पाहत होते. पण मावळे मात्र खंबीर होते. किल्ल्याचा इतिहास सांगून झाल्यावर गडावर फेरफटका मारून खाली उतरायला सुरुवात केली आणि साधारण ४ च्या सुमारास माचीवर परतले. सगळ्यांनी हात पाय धुऊन गरमागरम जेवणावर ताव मारला. जेवण झाल्यावर ग्रुप फोटो काढून माचीवरून उतरायला सुरुवात केली. पायथ्याला आल्यावर वडापाव, फ्रुटी आणि चहाची मेजवानी होती. शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे सहभागी झालेल्या प्रत्येक मावळ्याला ट्रेकिंगची बॅग आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. ते मिळताच सगळ्यांचा आनंद द्विगुणीत झाला. साधारण रात्री ८ वाजता नाशिककर आणि मुंबईकर आपापल्या घराकडे रवाना झाले. सगळे खूप दमलेले असल्यामुळे बसमध्ये बसताच झोपी गेले.
लहानग्यांना बालमोहीम आवडायचं कारण म्हणजे तिथे आई-बाबा किंवा घरातील कोणी नसतं, असतात ते मजा-मस्ती करणारे, मनसोक्त बागडणारे आणि मुख्य म्हणजे इतिहासाची आवड असणारे महाराजांचे मावळे आणि लाड करणारे शिवशौर्य ट्रेकर्सचे सभासद.
दिनांक : १३ नोव्हेंबर २०२२
मोहिम प्रमुख :हार्दिक म्हात्रे
मोहीम कार्यवाह : श्रीकांत नागावकर
सहभागी सदस्य : ३५
निमगिरी-हनुमंतगड मोहीम मुक्रर झाली अन् आधीच्या प्रबळगडच्या बालमोहिमेतला उत्साह अजूनही टिपेला असल्याचं बालमावळ्यांनी नावनोंदणीच्या वेळीच जाणवून दिलं. कारण याखेपेस अर्धी फौजच लहानग्यांची होती. बालमोहिमेद्वारे पुढील पिढीला गिर्यारोहणाची व त्यायोगे आपल्या गौरवशाली इतिहासाची, वैविध्यपूर्ण भूगोलाची आवड व माहिती व्हावी हा शिवशौर्यचा हेतू सफल होत असल्याची पोचपावतीच जणू मिळाली. एकूण ३५ सदस्यांना घेऊन शनिवारी रात्री १२ वाजता परळ येथून प्रवासाला सुरुवात केली. कल्याण, मुरबाड करत माळशेज घाट चढून पहाटे ४.३० वाजता पायथ्याच्या खांडीची वाडी या गावात पोहोचलो. हाताशी चांगले दोन तास असल्याने गावातल्या प्राथमिक शाळेच्या ऐसपैस ओसरीवर सगळ्यांनी पडी मारली. काहींनी झोपण्यापेक्षा बाजूच्याच घरासमोरच्या शेकोटीजवळ बैठक घेतली. तिथेच गप्पा रंगत असताना डोंगराआडून कधी झुंजुमुंजू झालं कळलं देखील नाही. सकाळचे सोपस्कार आटोपून चहा पोह्यांचा नाश्ता झाला आणि चढाईसाठी सारे सज्ज झाले. पायथ्याशीच सगळ्यांची जुजबी ओळख करून व चढाईची रूपरेषा ठरवून साधारण ८ वाजता मोहिमेला सुरुवात केली. सुरुवातीपासूनच सारी छोट्यांची गँग मोहीम प्रमुखासोबत पुढून नेतृत्व करत होती. भात शेतांच्या बांधावरून सुरुवातीची वाट जाते. काही ठिकाणी हिरवी-पिवळी कणसे लेऊन पिके वाऱ्यावर डोलत होती तर काही शेतात कापणी आटोपली होती. नंतर वाट रानात शिरते. वर गडावर नाहीत त्याहून अधिक पुरातन अवशेष या रानात लपले आहेत. आजूबाजूला विखुरलेले हे सारे अवशेष स्थानिकांनी एकत्र करून एका ठिकाणी स्थापले आहेत. मात्र पाऊस-पाण्यात अजूनही यांवर झाडी-वेली यांचेच आवरण असते, त्यामुळे हे अवशेष शोधणेही कठीण जाते. सुरुवातीला वाटेशेजारी गणेशाचे कातळशिल्प, शिवपिंडी व काही वीरगळ आहेत. त्यापुढे लगेच एका बाजूला ४२ वीरगळी रांगेत ठेवलेल्या दिसतात. त्यावरील वेगवेगळी शिल्प, नक्षी यांचा अर्थ व त्याद्वारे जतन केल्या जाणाऱ्या स्मृती याबाबतची माहिती साऱ्यांनीच मोठ्या उत्सुकतेने घेतली. लगेच पुढील बाजूस असलेल्या सुरेख मारुतीरायाचे दर्शन घेऊन खऱ्या चढाईला हात घातला. सुरुवातीची पाऊलवाट हळूहळू चढ घेत दोन्ही किल्ल्यांच्यामधील घळीकडे धावू लागते आणि एका ठिकाणी उजव्या बाजूच्या निमगिरी गडाच्या कातळास येऊन भिडते. इथून सुरू होतो निमगिरी किल्ल्याचा कातळकोरीव पायरी मार्ग. अखंड कातळात कोरलेल्या या पायऱ्या दोन वर्षांपूर्वी मातीच्या ढिगाने संपूर्ण गाडल्या गेल्या होत्या. वनपरिक्षेत्र जुन्नर च्या अधिकारी व कर्मचारी लोकांनी स्थनिकांच्या मदतीने श्रमदान करून हा मार्ग मोकळा केला. हा पायरी मार्ग हे निमगिरी किल्ल्याचे वैशिष्ट्यच आहे. हा सोपानमार्ग एक वळण घेऊन मागच्या बाजूला असलेल्या गडाच्या थेट दरवाजापर्यंत घेऊन जातो. दरवाजा उध्वस्त झालेला असला तरी बाजूच्या देवड्या शाबूत आहेत. गडावर दाखल झाल्यावर उंच वाढलेल्या सुक्या गवतातून वाट काढत सुरुवातीच्या दोन पाण्याच्या टाक्यांकडे पोहोचलो. सध्या दोन्ही गडावर टाक्यांव्यातिरिक्त फारच अल्प अवशेष शिल्लक आहेत, त्यामुळे बच्चे कंपनीला पाण्याच्या टाक्या मोजायचे काम मुद्दामच दिले होते. ही सारी टाकी कातळात खोदून काढली गेली आहेत, त्यामुळे संवर्धनानंतर त्यात अमाप पाणीसाठा जमतो. पुढे आणखी दोन टाक्या आहेत. त्यापुढे सरळ चालत आल्यावर गजलक्ष्मीचे शिल्प आहे, त्याभोवती दगडी शिळा रचलेले मंदिराचे अवशेष आहेत. मंदिराच्या समोरच तीन पाण्याची टाकी आहेत. त्यापुढे जाणारी वाट गडाच्या पलीकडल्या बाजूस कड्यावर असलेल्या गुहांकडे घेऊन येते. मूळ कातळात कोरलेल्या ५-६ गुहा येथे रांगेत आहेत. सुरुवातीच्या काही प्रमाणात बुजल्या गेल्या आहेत, मात्र शेवटच्या गुहेत पाण्याचं टाकं व आतमध्ये एक खोलीसदृश्य गुहा आहे. उंच गवत वाढेलेले असल्याने माथ्यावरील वास्तूंचे चौथरे व काही समाध्या पाहता आल्या नाहीत. मात्र टेकडीवर आलोच होतो तर छोट्या मंडळींना घसरगुंडीची मजा अनुभवास द्यायची हौस प्रमुखांनाच आवरली नाही. सुकलेल्या गवतावरून एकवार घसरत जाऊन प्रमुखांनी घसरणीची वाट तयार करून दिली. त्यानंतर लहानच काय मोठ्यांनाही हा बचपना करायचा मोह आवरला नाही. मागे फिरल्यावर आलो त्या वाटेने गड खाली उतरण्यास सुरुवात केली. उतरताना आता समोर खुणावतो हनुमंतगड, खिंडीतून त्यावर जाणारी अरुंद वाट पाहून बऱ्याच सदस्यांचे पाय निमगिरीवरच थबकले, परंतु प्रमुखांनी एकवार चढाईचे प्रात्यक्षिक करून दाखवल्याबरोबर भीतीची जागा उत्साहाने घेतली आणि लगोलग खिंडीत उतरून हनुमंतगडाच्या चढाईला सुरुवात केली. या बाजूस वाट अरुंद असली तरी वळणावळणाची आहे, शिवाय बऱ्याच ठिकाणी कातळात कोरलेल्या, अर्ध्या कापलेल्या पायऱ्या आहेत. या वाटेने थोड्याच वेळात आपण गडावर दाखल होतो. येथे उजव्या बाजूस गडाच्या मुख्य दरवाजाचे अवशेष आहेत, त्या बाजूलाच पाण्याचे टाके आहे. सरळ गेल्यावर किल्ल्याच्या माथ्यावर चार बुरुजांमध्ये बांधलेल्या चौकोनी वाड्याच्या भिंती दिसतात. संपूर्ण गडावर झाडी वाढल्याने त्यातून वाट काढत पलीकडच्या बाजूस असलेल्या ४-५ पाण्याच्या टाक्यापर्यंत पोहोचलो. गडावरचे हे मोजकेच अवशेष पाहून मागे फिरलो अन् आल्या वाटेने पायरी मार्गाने खाली मार्गस्थ झालो.
थंड वातावरणामुळे तहानेने बेजार झालो नसलो तरी आता भुकेचे कावळे ओरडू लागले होते. किरण दादांच्या घरी पत्रावळी तयार होत्याच, लगेच पंगती बसल्या. डाळ-भात, चपाती, भाज्या, लोणचं, पापड असे सुग्रास घरगुती भोजन आटोपून परतीसाठी सज्ज झालो.
दिनांक : २६ - २७ नोव्हेंबर २०२२
मोहिम प्रमुख :धीरज निंबाळकर
मोहीम कार्यवाह : स्वप्निल चव्हाण
सहभागी सदस्य : ११५
आता वेळ होती खान्देश दौऱ्याची. मुंबई, पालघर, जळगाव, यावल येथील सदस्य दिनांक २६ नोव्हेंबरला पहाटे चाळीसगाव स्टेशनवर पोहोचले. ठरलेल्या ठिकाणावरून आन्हीक उरकून सर्व सदस्य बसने पाटणादेवीकडे रवाना झाले. गौताळा औट्राम अभयारण्याचे प्रवेशद्वार बंद असल्याने सर्वजण बसमधून उतरून सकाळच्या थंडीत अंगावर सोनेरी किरणे घेत औट्राम नावाविषयीची चर्चा करू लागले. त्यानंतर सदस्यांचा परिचय होऊन गरमागरम पोह्यांचा नाष्टा होताच अखेर प्रतिक्षा संपली आणि गौताळा अभयारण्याचे प्रवेशद्वार उघडल्याची बातमी आली. सर्वप्रथम प्राचीन हेमाडपंथी महेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. मंदिरावर आंतर्बाह्य मोठ्या प्रमाणावर कोरीवकाम आढळते. अनेक खांबांवर विविध प्रकारे किर्तीसूर कोरण्यात आले आहेत. मंदिराबाबत सविस्तर माहिती द्यायला पुणे येथील पुरातत्वज्ञ सरला भिरुड मॅडम सोबत होत्याच. त्यानंतर मंदिराच्या बाजूने जंगलातून कण्हेरगडाकडे जाणाऱ्या पायवाटेने मार्गक्रमण सुरू झाले. वाटेत महावीरांचे शिल्प कोरलेली नागार्जुन लेणी, बाजूलाच दगडात कोरलेले पाण्याचे टाके, सीतान्हाणी लेणी पाहत वाटचाल सुरू होती. बऱ्याच वेळाने कण्हेरगडाचे प्रवेशद्वार दिसले. ते जणू आमचीच वाट पाहत होते. प्रवेशद्वाराला लागून दोन बुरुज आहेत. पलिकडे खाली जाणारी पायवाट असावी. त्या नयनरम्य परिसराचा सर्वांना फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. फोटोसेशन झाल्यावर गडउतार होऊन पाटणादेवीच्या दर्शनासाठी निघालो.
पाटणादेवी परिसरातील बागेमध्ये दुपारच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. अगोदर पोटोबा मग विठोबा या म्हणीची आठवण करत सर्वांनी जेवणाकडे आपला मोर्चा वळवला आणि गरमागरम छोले भाजी व पोळी यांचा येथेच्छ समाचार घेऊन दर्शनासाठी मंदिराची वाट धरली. देवीचे दर्शन घेतल्यानंतर पितळखोरा लेणीकडे बस निघाली ती कन्नड घाटातून. तीन तासांच्या प्रवासानंतर पितळखोरा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ बस पोहचली. परंतु अभयारण्य बंद झाल्याने सर्वांचा हिरमोड झाला. शेवटी तेथील कर्मचाऱ्यांस विनंती करुन आम्हाला प्रवेश मिळाला. पितळखोरा लेणीचा धबधबा, तेथील कोरीव शिल्प पाहून मन अचंबित होते. अतिशय सुंदर कोरीव खोदकाम केलेले आहे. काही ब्राह्मी लिपीतील शिलालेख सुस्थितीत आढळले. पितळखोरा लेणी पाहिल्याचा आनंद मनात साठवत वाटेत भेळ आणि चहाचा आंनद घेत रात्रीच्या मुक्कामाकडे वाटचाल सुरू झाली व चार तासांच्या प्रवासानंतर रात्रौ ११.३० वाजता सोयगाव मुक्कामी पोहोचलो. थंडगार वातावरण असूनही सर्वजण जेवणासाठी गच्चीवर बसले. फक्कड असा शेवभाजीचा बेत असल्यावर थंडीची काय बिशाद...? शेवभाजीची मेजवानी झाल्यानंतर काही सदस्य खोलीत तर काहीजण थंडीचा अनुभव घेण्यासाठी गच्चीवरच झोपी गेले.
२७ नोव्हेंबरला सकाळचे सोपस्कार आटपून चहा-नाश्ता करून सोयगाव येथील अपरिचित प्राचीन श्री रुद्रेश्वर महादेव मंदिराकडे कूच केले. रुद्रेश्वर येथील धबधबा, महादेव, गणपती, नृसिंहाचे कोरीव शिल्प खूपच छान आहे. मंदिराच्या परिसरातच मुंबई येथील लेणी अभ्यासक श्री. विजय शंकर विखरणकर यांनी मंदिरवजा लेणी व त्यांच्या संग्रही असलेली दुर्मिळ नाणी दाखवून त्यांची देखील माहिती दिली. त्यानंतर पुढील प्रवास सुरू झाला तो जगप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांच्या दिशेने..! अजिंठाला पोहोचल्याववर अगोदर पायथ्याशी असलेल्या फुटहिल रेस्टॉरंटमध्ये सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला आणि मग लेणी दर्शन सुरू झाले. अर्ध गोलाकार डोंगरात वरतून खाली अशी अप्रतिम २७ लेणी कोरलेली आहेत. प्रत्येक लेण्यात बौद्धांची वेगवेगळी शिल्प कोरलेली आढळतात. त्या काळातील कारागीरांची किमया पाहून आपण चकीत होऊन जातो. अजिंठा लेणी दर्शन झाल्यानंतर जळगावी परतीच्या वाटेवर निघालो. संध्याकाळी ७.०० वाजता जळगांवला पोहचल्यावर, तिथे असलेला खान्देशी पाहुणचार वाट पाहत होता. सुप्रसिद्ध खान्देशी वांग्याचे भरीत, कळण्याची पुरी, पातोड्याची भाजी, गुळाचा शिरा या बेताने मोहिमेची सांगता झाली आणि सर्वजण रेल्वेने परतीच्या मार्गाला लागले.
खान्देशाचा अपरिचित इतिहास व ऐतिहासिक स्थळांची माहिती महाराष्ट्रातील लोकांना व्हावी आणि येथील पर्यटन वाढावे या उद्देशाने या मोहिमेचे आयोजन शिवशौर्य ट्रेकर्स, मुंबई तर्फे करण्यात आले होते. दोन दिवसीय ऐतिहासिक मोहिमेतील स्थळांना भेट देऊन तसेच जेवणातील वैविध्यपूर्ण मेजवानी चाखून जीवन धन्य झाल्याची भावना सहभागी सदस्यांना निश्चितच झाली असेल...!
दिनांक : १० - ११ डिसेंबर, २०२२
मोहिम प्रमुख :अमित मेंगळे
मोहीम कार्यवाह : योगेश शिरसाट
सहभागी सदस्य : ३३
नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यात मार्कंडेय पर्वत ट्रेक करण्याचे शिवशौर्य ट्रेकर्सने ठरविले. कार्यवाह म्हणून योगेश शिरसाट आणि मोहीम प्रमुख म्हणून अमित मेंगळे या दोघांना ट्रेकची जबाबदारी संस्थेतर्फे देण्यात आली. साधारण १ महिना आधी मुक्कामाची आणि वाहनाची सोय त्यांनी केली. आणि दि. १० डिसेंबर २०२२रोजी भल्या सकाळी मुंबई, अहमद नगर आणि नाशिक येथील ३३ जणांचा चमू मुंबई नाका या ठिकाणी एकत्र येऊन छान असे तर्री मारके पोह्यांचा नाश्ता केला. चहा घेऊन किल्ले रामशेजकडे रवाना झालो. या ठिकाणी प्रभू रामचंद्र यांनी विश्रांती घेतली. हि जागा त्यांची शेज होती या अर्थाने या किल्ल्याचें नामाभिधान "रामशेज" झाले. हि होती याची पौराणिक ओळख. औरस चौरस जेमतेम आकारमान, जेमतेम उंची आहे या किल्ल्याची. इतर किल्ल्यांची भव्यता याला नाही पण ... साडे पाच वर्ष झुंजीचा अतिभव्य, गौरवशाली इतिहास हीच मोठी ओळख या किल्ल्याची आहे. उत्तम तटबंदी, पाण्याच्या १८ टाकी, देवड्या, कमानी, श्रीरामांच्या मंदिराखालील थंडगार पाणी, शिवाजी महाराजांची सिंहासनाधीश मूर्ती हि पाहण्याची ठिकाणे आहेत रामशेज किल्ल्यावर. पायथ्याशी मध्यान्ह भोजन करून आमचा ताफा मार्कंड्या पर्वताच्या दिशेने रवाना झाला. तासाभरात आम्ही पर्वताच्या पायथ्याशी म्हणजे मुळणबारी खिंडीत पोहचलो. रवळ्या जवळ्या किल्ल्यांची जोडी आपल्या स्वागतला याच ठिकाणी उभी असते. आमच्या वाहनांना "महिंद्राच्या" बोलोरो गाडयांना "टाटा" करून सर्व सामान आमच्या पाठीवर लादून "मारुतीच्या" अविर्भावात "झेपावे पर्वताकडे" केले. १ तासाच्या चढाई नंतर आम्ही पर्वताच्या मध्यावर माचीवर पोहचलो. माचीवरील नवनाथांच्या आश्रमात आम्ही डेरा टाकला. पाठीवरील ओझी आश्रमात टाकून आम्ही उर्वरित पर्वतारोहण सुरु केले. आता सूर्यदेवाने निरोप घेतला होता. अनपेक्षितरित्या नाईट ट्रेकच्या अनुभवाला सामोरे गेलो. अंधाराशी टॉर्चने सामना करत पर्वताच्या सर्वोच्च ठिकाणी मार्कंडेय ऋषींच्या मंदिरात पोहोचलो. मंदिरात प्रवेश करताच समोर मार्कंडेय ऋषींच ध्यानमग्न अवस्थेत बसले आहेत असा भास झाला. इतकी ती मूर्ती जिवंत भासत होती. मंदिराबाहेर समोरच सप्तशृंगी गडावरील वणीच्या देवीचे मंदिर असंख्य दिव्यांनी उजळून निघालेले दिसत होते. सुरुवातीला आल्हादायक असलेला शिखरावरील गार वारा आम्हाला आश्रमात परतण्यास सांगू लागला. नाईट ट्रेक करून सर्वच जण आता आश्रमात शेणाने सारवलेल्या जमिनीवर कोंडाळे करून बसले. विविध भागातून आलेल्या सर्वांनी आपापली ओळख करून दिली. काही जण ट्रेक बाबत नवखी होती तर काहींचे शेकडोंनी ट्रेक झाले होते. दिवसभर ट्रेक करूनही सर्वजण अगदी ताजेतवाने होते. कदाचित आश्रमातील त्या पवित्र आणि प्रसन्न वातावरणाचा परिणाम असावा. मोहीम प्रमुख आणि कार्यवाह यांनी ट्रेक, मार्कंड्या पर्वत या विषयी माहिती दिली. उद्याची रूपरेषा सांगितली. त्या नंतर गरमागरम खिचडी भाताचा आस्वाद घेऊन गप्पा, हास्य विनोद करित निद्रादेवीच्या अधीन झालो. दि. ११-१२-२०२२०, रविवार सकाळ झाली ती पक्षांच्या किलबिलाटांने. थोड्याच वेळेत आश्रमाची आरती सुरु झाली. आम्ही तयार झालो. पण नाश्ता तयार नसल्याने चहा विथ गप्पा, कोण झाडावर चढून फोटो काढून घेतंय, कोण आश्रमातील फुल झाडांचे फोटो सेशन करतंय. त्या नंतर नाश्ता होऊन पाठीवर सॅक चढवून आम्ही मार्कंडेय पर्वत उतरण्यास घेतला. आजची उतरण थोडी अवघड होती याची कल्पना होती. परंतु अपेक्षा पेक्षा जास्त वेळ उतरणीला गेला. मार्कंडेय पर्वताची घळ आम्ही उतरून आलो. या पुढील टप्पा आमचा सप्तशृंगी चढून जाण्याचा होता परंतु वेळेचं गणित कोलमडल्यामुळे आम्ही गाडीनेच गडावर जाण्याचे ठरवले. आमच्या पैकीच एक सुधाकर मांडवकर हे निवृत्त पोलीस निरीक्षक होते. कळवण पोलीस ठाणे त्यांच्याच अधिपत्याखाली होते. त्यांच्याच ओळखीने आम्ही VIP भोजन प्रसादाचा आणि त्यानंतर VIP दर्शन रांगेतून वणीच्या देवीच्या दर्शनाचा लाभ घेतला. सर्व काही नियोजित वेळेप्रमाणे होईल तो ट्रेक नव्हे. आमच्यातील दत्तात्रय जाधव पाठी राहिल्याने सामान्य दर्शन रांगेत घुसले आणि पुरते फसले. त्यांचा काहीच संपर्क होत नसल्याने ट्रेकची सांगता गोंधळानेच झाली. दोन तासांनी आम्ही परतीचा प्रवास सुरु केला. नाशिक आणि नगरच्या मित्रांचा निरोप घेऊन कसारा स्थानकातून ९. २१ ची ट्रेन पकडली. नाशिक स्थित मित्र मंडळी ७.३० वाजता घरी पोहचली तर विरारस्थित मंडळीनी मध्य रात्री २.३० वाजता घरी पोहचून महा प्रवासाची सांगता केली. रामशेजच्या चिवट इतिहास, मार्कंडेय ऋषींचा गूढ सहवास, आश्रमातील सेवेकऱ्यांनी निरपेक्ष भावनेने केलेली आमची पोटापाण्याची सेवा, सप्तशृंगी मातेने आमची पदोपदी घेतलेली परीक्षा, नवीन झालेला लोकसंग्रह यासाठी हा पौराणिक ऐतिहासिक ट्रेक कायम अविस्मरणीय असेल.
दिनांक : २० -२४ डिसेंबर, २०२२
मोहिम प्रमुख :शार्दूल खरपुडे
मोहीम कार्यवाह :
सहभागी सदस्य : ३२
'अपेक्षित-अनपेक्षित' हि जगाची सामान्य रीत, परंतु हीच रीत जर जंगलातील घटना असेल तर... मग काय 'सुखद क्षण हा भासे मला'... हीच सुखाची अपेक्षित-अनपेक्षित... रीत धांडोळण्यासाठी शिवशौर्यची आगळी जंगल मोहीम दरवर्षी असते, त्याप्रमाणे यंदाही होती आसाम येथील 'मानस-काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची'..तसे दोन्ही उद्याने जगाचे दृष्टीने 'नैसर्गिक वारसा स्थळे'.. याच वारसा स्थळांची मोहीम म्हणजे मोठा पल्ला.. हाच पल्ला गाठण्यासाठी ३२ जणांची टीम लगेचच जमली... काही महिने आधी या गोष्टीचे नियोजन चालू होते.. काही विमानाने काही रेल्वेने गुवाहाटी गाठणार होते.. त्याप्रमाणे प्रवासाचे नियोजन ठरले. रेल्वेने पूर्ण दोन दिवस तर विमानाने ३ तास असा गुवाहाटी पर्यंतचा प्रवास... नियोजित कार्यक्रम २१ डिसेंबरला गुवाहाटी येथुन चालू होणार होता.. परंतु रेल्वेने पोहचलेली मंडळी २० डिसेम्बरलाच गुवाहाटी येथे पोहचली..
दिवस पहिला २० डिसेंबर, गुवाहाटी (भटक्यांसाठी अतिरिक्त दिवस )
अतिरिक्त दिवस हा भटक्यांसाठी पर्वणी.. त्यात आम्ही पहाटेच गुवाहाटीला पोहोचलेलो.... सुप्रसिद्ध अश्या कामाख्या देवीच्या आवारातील भक्त निवास येथे आधीच राहण्याचे नियोजन असल्यामुळे आम्ही 'कामाख्या जंक्शन' स्थानकावरून थेट कामाख्या मंदिर गाठले. ५१ शक्तिपीठांपैकी एक आणि अत्यंत जागृत शक्तीपीठ अशी ओळख...भक्तनिवासात सकाळचे सोपस्कार आटोपून जवळील हॉटेलात नाश्ता उरकून आम्ही खाजगी वाहनाने गुवाहाटी दर्शनासाठी निघालो.. काही मंदिरे पाहून झाल्यावर आम्ही ब्रम्हपुत्रेच्या पात्रातील उमानंद मंदिरासाठी तिकीट काढणार ...तर बातमी आली कि, मंदिर बंद आहे कारण... मंदिराजवळ वाघोबा पोहत-पोहत आलेत.. अर्थात आमची आणि त्या वाघोबांची हि भेट नियोजित नव्हती.. आणि ती होणारही नव्हती.. तेथून आम्ही आसाम राज्य सरकारचे संग्रहालय पाहिले.. अत्यंत जिव्हाळ्याने बऱ्याच गोष्टी जपून ठेवल्यात.. वस्तुसंग्रहालये म्हणजे त्या त्या राज्याची सांस्कृतिक आणि नैसर्गिक ओळख तीच या संग्रहालयाच्या माध्यमातून जपलीत.. मस्ट विसीट.. अशी जागा.. परतून जेवण आटोपून आम्ही कामाख्या देवीच्या मंदिरात रांगेत उभे राहिलो ..साधारण ४ तासांनी दर्शन झाले.. अगदी गूढरम्य गर्भगृहात देवीची पूजा केली जाते....स्थानिक परंपरेनुसार 'उग्रबळी' परंपरा येथे पाळली जाते.. कदाचित त्याच परंपरेचा विचार करत-करत..अगदी मंदिर शेजारील भक्त निवासात.. त्या 'नीलाचल' टेकडीवर आम्ही निद्राधीन झालो..
दिवस दुसरा २१ डिसेंबर, गुवाहाटी ते मानस.. एकशिंगीची पहिली भेट..
आजचा दिवस अगदी लवकर चालू होणार होता..सकाळीच ७;३० ला आमची बस आली. हीच बस पुढील ४ दिवस आमच्या सोबत असणार होती.. गुवाहाटी ते मानस साधारण ३-४ तासाचे अंतर.. वाटेत आम्हाला त्यादिवशी येणारी मंडळी सोबतीला आली.. सगळ्यांसोबत सकाळची न्याहारी एका स्थानिक उपाहारगृहात आटोपली. बस उत्तम असल्यामुळे गुवाहाटी ते मानस हा प्रवास उत्तम झाला... आमच्या राहण्याची व्यवस्था एका स्थानिक बोडो मित्राच्या होम स्टेमध्ये करण्यात आली होती. एक साधे पण व्यवस्थित आणि स्वच्छ कॉटेज होम होते. आतून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड नव्हती... दुपारचे स्थानिक परंतु अत्यंत रुचकर जेवण घेऊन आम्ही आमच्या पहिल्या जीप सफारीला दुपारी २ वाजता निघणार होतो. आम्ही प्रति जीप ४-५ असा ग्रुप आणि मानसच्या जंगलात शिरायला सुरुवात केली... इथे आमचा 'अपेक्षित-अनपेक्षित' चा खेळ सुरु झाला.. खरंतर जंगल वाचन एक अत्यंत दुर्मिळ आणि खूप कमी लोकांना अवगत असलेली कला.. कदाचित निळवंतीच्या पोथी ( निळवंती जिला पशुपक्ष्याची भाषा अवगत होती तिचे संकलन) इतकी नाही..परंतु आपल्या कलेने तेथील जिप्सी वाहक..दूर प्रदेशावरून आलेल्या महाराष्ट्रातील आपल्या मित्रांना आपले समृद्ध असे मानस जंगल दाखवत होते...
भारत-भूतान सीमेवरील हे समृद्ध जंगल ..काहीसे 'तराई वन'..काहीसे 'मिश्र-सदाहरित' ..'सदाहरित तसेच वर्षा-वनाचा' मोठा टापू.. आणि हिमालयाच्या पायथ्याकडील वन..हे वन पाहणे.. अनुभवणे योग्य शब्द.. व्यकंटेश माडगूळकरांच्या शब्दात सांगावयाचे झाले तर ' तुम्हाला वाटते ना विचारी बनाव.. ,भावनातील पावित्र्य जाणाव तर अरण्यात जावे' अगदी असेच वन... पशु-पक्ष्यांनी समृद्ध..आधी थोडा तराईचा भाग..याच भागात आमची पहिली भेट झाली ती एक-शिंगी गेंड्याची.. तसा एकटाच वावरणारा प्राणी.. कधी उत्क्रांतीच्या काळापासून इथेच अस्तित्वात असलेला..अगदी डायनॉसॉरचे अस्तित्व पाहिलेला.. हा रायनोसॉर.. आपल्या पूर्वजांचा वारसा जपत हे जंगल राखणारा आणि विशेषतः पूर्णपणे शाकाहारी असणारा आणि सध्या शिकारीमुळे अगदी धोक्यात असणारा वन्य-जीव .....सध्या अगदी निवांत.. चरणारा.. वाटेत आशियाई हत्तीचा समूह दुरून दर्शन देत होता.. हत्ती गवत येथील वैशिष्टय..इथल्या या गवतात हत्तीचा समूह अगदीच सहज दिसेनासा होईल इतके उंच .. काही सपाट प्रदेशात बारसिंघा, हॉग डिअर अगदी निर्धास्तपणे चरत होते..कदाचित त्यांना या गवतात लपलेल्या वाघाची कल्पना नसावी.. एखादा सर्प-गरुड मधूनच जात होता.. आणि कदाचित सांगत असावा.. हिमालयाच्या पर्वतापासून ते या प्रदेश पर्यंत पक्षिराज मीच आहे.. त्याची भरारी त्याचे घरटे.. त्याचा हा अधिवास.. एखाद्या समृद्ध राज्यासारखा... वाटेत गेंड्या-हत्तीच्या विष्ठेवर फुलपाखरे क्षार ओढत होती.. जंगलाचे स्वतःचे एक नैसर्गिक अन्न-चक्र .. काहीही वाया जाणार नाही.. मजल-दर मजल करत अरण्यवाचन करत आम्ही 'मानस' नदीच्या किनाऱ्यावर पोहचलो ... नावातच उगमाची कहाणी सांगणारी.. दुरून तिबेट वरून मानस सरोवराच्या उत्तर तीरावरून उगम पावणारी मुख्य आणि मध्य हिमालयाला पार करून भूतान मार्गे भारतात प्रवेशणारी.. आणि आजूबाजूचा प्रदेश समृद्ध करणारी नदी... भूतान आणि भारताची राजकीय सीमा ठरवणारी नदी.. मानससरोवराचे ..हिमालयाचे पवित्र जल वाहून आणणारी नदी.. मग काय नदीच्या काठावर प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह तो आवरणार कसा? सेल्फी झाले ... समूह छायाचित्र झाले.. भारत-भूतान हि सीमा पाहून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो.. अर्थात आम्ही परत चाललो होतो.. परंतु या प्राण्यांना कसली सीमा.. त्यांचा संचार चालूच होता ..बिग फाईव्ह मधील एक असंणारी जंगली म्हैस आपल्या मोठ्या शिंगाचा तोरा मिरवत.. अनपेक्षितपणे सामोरी आली.... आणि आम्ही अगदीच दुर्मिळ म्हणजेच शेड्युल १ प्रजाती आहोत असे दर्शविणारा परंतु काहीसा सावध तोरा... या जंगलाने पहिल्याच सफारीत साऱ्या अपेक्षा पूर्ण केल्या..
पूर्वांचलमधील संध्याकाळ.. अगदी सायंकाळी ५ वाजता पूर्ण अंधार होतो.. त्या योगाने आम्ही परतीला लागलो.. जिप्सीने वेग घेतला होता.. अर्थात नियमात राहून..जंगलात तुम्हाला २० किमीच्या वर वाहन चालविता येत नाही.. हिमालकडून आलेले थंड वारे आत्ता चान्गलेच जाणवत होते.. खुट्ट व्हाव आणि एक-एक दिवा पेटवा.. अगदी तसाच प्रकार आमच्या सोबत होत होता.. उजेडात दिसणाऱ्या 'हत्ती-गवतावर' आत्ता.. एक एक काजवा आपले सांजप्रकाशात आपले अस्तिव दाखवत होता.. आम्हीही याच अन्नसाखळीतील महत्वाचे भाग आहोत.. फक्त पाहता आले पाहिजे. काजवे अगदी लख्ख..' काजव्यांची बाग' फुलावी..अगदी तसं.... कधी कधी जंगल अनुभवताना आपण बिग फाईव्ह ( वाघ, हत्ती, गेंडा, बारसिंघा आणि जंगली म्हैस )पाहण्याच्या नादात.. आपण अश्या अनुभवाला मुकतो.... .आम्ही केवळ १०० मीटर गेट पासून आत असू.. बाहेर निघण्याच्या नादात.. आमच्या जिप्सी वाहकाला एक हुंकार आम्हाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता.. तो दिसलाच नाही अगदी त्याला जिप्सी धडकणार.. इतक्यात सुदैवाने वेळ चुकली आणि आमची जिप्सी पुढे निघून गेली..आणि एक मोठा नर हत्ती त्या हत्ती गवतातून बाहेर आला.... त्याचे ते ४ फुटावरील दर्शन जितके रम्य तितकेच.. अर्ध्या मिनिटात खेळ संपविणारे होते.. या गडबडीत आमच्या जिप्सी मधील गुरुनाथ मयेकर यांचा मोबाइल तिथेच कुठेतरी पडला.. अर्थात त्यांना ते नंतर जाणवले.. सायंकाळी ५;३० च्या अंधारात आम्ही त्या 'अपेक्षित-अनपेक्षित' काजव्यांच्या बागेतील खेळातून बाहेर आलो....
दिवस तिसरा २२ डिसेंबर,मानस दुसरी सफारी आणि मानस ते काझीरंगा..
पूर्वांचल तसा भारतीय उपखंडाचा महत्वाचा घटक.. कारण येथे नांदणारी सांस्कृतिक एकजिन्नसता.. जिचा उगम याच आर्यावर्तात झालाय.. त्याची पाळे-मुळे इतकी घट्ट कि... अगदी अरुणाचल पासून आसाम पर्यंतचा माणूस भारताशी जोडलेला.अगदी त्यातील सलग जंगलासारखा... मानसचे जंगल अगदी तसेच सिक्कीम पासून ते थेट आसाम-काझीरंगा-अरुणाचलच्या 'पक्के टायगर रिझर्व्ह' पर्यंत पसरलेले.. पहाटेच जाग आली ती मंदिरातल्या किणकिण्या आवाजाने..होमस्टेच्या आवारातील शिवमंदिरात यजमान पूजा करीत होते.. भारताच्या ईशान्येस एक स्त्री आपल्या आराध्यास अर्घ्य अर्पण करत होती आणि मगच तिने चूल पेटवली.. मनोमन नमन करत.. पुढील आखणी चालू झाली.. चहा झाला.. खेळाचा दुसरा भाग आज सकाळीच रंगणार होता.. दुसऱ्या मानस सफारीसाठी मंडळी तय्यार झाली.. कदाचित आज या जंगलाचे वेगळे अंतःकरण जाणता येईल त्यायोगे त्या बोचऱ्या थंडीत प्रवास सुरु झाला.. सगळेच अंग चोरून होते.. हि सफारी थोडी वेगळ्या वाटेने चाललेली... आमच्यापैकी काही जिप्सिना शीळ मारणारे मारत रानकुत्रे दिसले..हा देखील शेड्युल १ चा दुर्मिळ प्राणी.. पण अत्यंत क्रूर म्हणून कुप्रसिद्ध.. समूहाने शिकार करून वाररणारा.. बिग फाईव्ह च्या जंगलात आपले वेगळे अस्तिव जपणारा.. काळाची पावले कोणासाठीही थांबत नाहीत.. तो नियम सगळ्यांनाच.. survival of the fittest..सृष्टिचक्राचा नियम.. यात फिट राहणारे सगळेच वन्यजीव या जंगलात आम्हाला अधून मधून डोकावत होते... अगदी साधा कोळी देखील.. आपल्या कौश्यल्याने सृष्टिचक्राच्या सौंदर्यात भर घालत होता..काही जिप्सिना एकशिंगी गेंडा, हत्ती, गवे असे प्राणी दिसतच होते..पण प्रत्येकाला उत्सुकता जंगलाच्या राजाची अर्थात वाघोबाची होती.. अर्थात त्याचे राज्य, तो ठरवणार... तो रुसलाच होता.. परतीची वेळ होत होती.. सूर्य आत्ता बराच वर आला होता... दुरून अभयारण्याच्या कमानी वरील धन्यवाद झाले... आणि आम्ही पुन्हा होमस्टे कडे परतलो.. कालची घडलेली एक घटना जिथे मोबाइल हरवला होता तिथेच तो आमच्या पैकी एका जिप्सीच्या 'गनमॅन' ला दिसला अर्थात तो मोबाईल रात्रभर त्याच जागी थिजून होता.. आणि प्रामाणिकपणे तो परत दिला गेला... येथे आपल्या ईशान्येकडील बांधवांचा अभिमान वाटतो.. अर्थात हा प्रामाणिक पणा निसर्गातूनच आलेला... परतून ब्रेकफास्ट आणि आवराआवर चालू झाली.. आज आम्हाला मानस ते काझीरंगा असा प्रवास होता.. आमच्या मित्राचा निरोप घेऊन साधारण बस सकाळी ११ वाजता सुटली.. बस सुटणार इतक्यात एक वाईट बातमी आली कि एका सांबराने एका वृद्धेवर हल्ला केला..इथेही न सुटणारा प्रश्न? सांबराने हल्ला केला कि मानवाने त्याच्या परिक्षेत्रावर अतिक्रमण केले ?...याच विचारात काझीरंगाकडे पुढील प्रवास सुरु झाला... ओरँग नॅशनल पार्क मार्गे आम्ही ब्रम्हपुत्रेच्या उत्तर तीरावरून.. तेजपूर गाठले(तेजपूर जे १९६२ च्या भारत-चीन युद्धात चीनने गिळंकृत केले होते... आणि जाचक अटी लादत माघारी दिले).. ईशान्येकडील सर्वात मोठा नदीवरील पूल ओलांडून आम्ही काझीरंगाच्या परिक्षेत्रात प्रवेश केला.. इथे जागो जागी आपल्याला जाणीव करून देणारे फलक आहेत.. इथे वन्यप्राणी रस्ता ओलांडत आहेत.. वेगमर्यादेचे पालन करा.. काझीरंगाला पोहचे पर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती आम्ही साधारण रात्री ९ वाजता आमच्या काझीरंगा येथील होमस्टे येथे पोहचलो.. जेवण झाले... रूम अलोकेशन झाले..सगळे लवकरच निद्राधिन झाले...दुसऱ्या दिवशीच्या अपेक्षित-अनपेक्षित खेळाचा भाग होण्यासाठी... उद्याचा डाव हा वेगळा असणार होता.. ब्रह्मदेवाने आणि भगवान परशुरामाने लोककल्याणासाठी पौराणिक काळात मांडलेला डाव ब्रह्मपुत्रच्या तीरावर कदाचित उलगडणारा असावा.. अगदी तशीच स्वप्ने रात्रभर पडत होती....
अगदी पहाटेच साडे चारला जाग आली.. सकाळचे सोपस्कार आटोपून .. काझीरंगाला पहिलीच भेट ती भेट साक्षात गजराजावर स्वार होऊन अर्थात हत्ती सफारी असणार होती.. थोडा उत्साह.. थोडा खेद..संपूर्ण भारतात कायद्याने हत्ती-सफरीवर बंधने आहेत(जे अगदी योग्य आहे) ती केवळ काझीरंगा मध्ये चालू आहे .. तेही स्थानिकांच्या आग्रहास्तव.. असो परंतु गजराजावर स्वार होऊन आम्ही वन्यप्राण्यांच्या अगदी जवळ जाणार होतो.. वजनानुसार माणसांची बैठक-रचना करून स्वारी निघाली जंगलात..काझीरंगाच्या पश्चिम विभागात... काझीरंगा..ब्रम्हपुत्रेच्या तराईचे जंगल.. एखाद्या कॅनवास वर तैलचित्र रेखावे आणि आपण त्या तैलचित्रात घुसावे..होय घुसावेच अगदी तसेच आम्ही त्या तराईत घुसलो.. पहाटेच्या धुक्याने आजूबाजूचे फार स्पष्ट नव्हते..जुमानजींच्या चित्रपटाप्रमाणे एक-एक प्राणी समोर येत होते.. काही गजराज तर अगदी गेंड्याच्या समोरूनच जात होते.. दोघेही 'प्युअर व्हेज'.. परंतु ताकदवान गडी.. या जंगलाचे अजून एक वैशिट्य म्हणजे इथे वाढणारे हत्ती गवत.. या गवतात हत्ती देखील लपेल.. याच गवताच्या साहायाने वन्यसृष्टी बहरलीय.. येथील 'बिग ५' म्हणजे पुन्हा ..गेंडा, हत्ती, वाघ, बारासिंघा आणि जंगली म्हैस.. अर्थात गजराजाला सफारीसाठी मर्यादा होत्या म्हणून बिग ५ पैकी ३ पाहून सफारी पूर्ण झाली.. पूर्ण झाल्यावर अजून एक कार्यक्रम म्हणजे या गजराजांना केळी खाऊ घालायचा.. अर्थात आपल्या मर्जीनुसार मंडळी गजराजांना केळी खाऊ घालत होते कोणी सेल्फी साठी गजराजांकडे आग्रह केला तरी ते आनंदाने सेल्फी काढू देत होते..कदाचित त्यांनाही 'इन्स्टा स्टोरी' बद्दल माहीत असावे... या तैलचित्राच्या स्टोरीमधून बाहेर पडायला थोडा वेळ लागला.. रानभूल व्हावी आणि आपण त्यात हरवून जावे अगदी तसच सगळं.. ही रानभूल घालवली ती कर्कश्य हॉर्नने ..
पुढील कार्यक्रम म्हणजे खवय्ये आणि भटके यांच्यासाठी पर्वणी असाच होता.. पारंपरिक-सांस्कृतिक आसामी केंद्र याची नियोजित भेट होती... .. येथेही येथील व्यस्थापकांनी अत्यंत नियोजन पूर्वक या ऑर्किड पार्क ची रचना केलीय..इथे आसामची संस्कृती आहे, लोकजीवन आहे..विविध आदिवासी जमातींची दालने आहेत..त्याच्या वापरातील वस्तू आणि त्यांची शस्त्रे यांचे वेगळे दालन आहे.. अगदी येथील पारंपारिक बियाणे देखील येथे जतन केले गेले आहे...अगदी आसामी कयाक बोटिंगचा देखील आनंद आपल्याला घेता येतो.. येथील चहाचे मळे, बांबूची बेटे आसामी लोकांचे निसर्गावरील अवलंबवित्व दर्शवितात..
सर्वात महत्वाचे म्हणजे येथील 'अमरीचे' अर्थात ऑर्किडचे संकलन..ईशान्य-पूर्व भागातील सर्व अमरीचे येथे संकलन उत्तम रित्या केले गेले आहे. काही अगदीच ठेंगण्या.. काही अगदी स्वैर वेली प्रमाणे आकाशाकडे झेपावणाऱ्या.. काही अगदी परावलंबवित्व दाखवणाऱ्या ऑर्किड ची माहिती येथील आदरातिथ्यशील कार्यकर्ते देत असतात.. या एकदलीय फुलांची माहिती ऐकत ऐकत आम्ही देखील त्या एकदलीय फुलाप्रमाणे त्या वेलीभोवती गुरफटले जात होतो..अर्थात निसर्गाचा गुंता..ज्यांच्या त्याने आपापल्याला पध्द्तीने सोडविला.. कारण वेळ होती दुपारच्या भोजनाची.. याच सांस्कृतिक केंद्रात आज आमचे दुपारचे आसामी पद्धतीचे भोजन असणार होते.. प्रत्येकाला उत्सुकता होती आसामी जेवण म्हणजे नक्की काय असेल? ताट समोर आले आणि पंगती बसल्या एक-दोन नव्हे तर जवळ-जवळ सतरा विविध पदार्थ त्या थाळीत होते..काही उमगणारे काही न-उमगणारे.. पदार्थ.. अर्थात चवीने खाणार त्यालाच देव देणार.. पण हि चव मुंबईकरांना फार अवगत नाही.. तरीही त्या जम्बो थाळीवर (अगदी बांबूच्या कोवळ्या कोंबावर देखील) ताव मारून मंडळींनी उर्वरित केंद्राची भटकंती केली.. मनसोक्त खरेदी देखील झाली.. (विशेषतः महिलावर्गाची).. दुपारची जीप सफारी आल्यामुळे वेळेचे बंधन पाळत आम्ही होमस्टेला परतलो...
दुपारची जीप सफारी साठी आम्ही काझिरंगाच्या 'सेंट्रल झोन' मध्ये प्रवेशकर्ते झालो.. येथील जंगल म्हणजे पुन्हा नवीन कॅनव्हास.. आत्ता आम्ही जंगलाच्या अगदी अंर्तर्भागात जाणार होतो.. प्रथम आमची भेट एकशिंगी गेंड्याशी झाली.. आपल्याच तोऱ्यात वावरणारा हा ताकदवान गडी..अगदी डायनॉसॉरचा वारसा सांगणारा हा सजीव कधीकाळी आपल्या कोकणात देखील होता( हजारो वर्षापूवीची कोकणातील आदिमानवाने कोरलेली कातळ शिल्पे हा याचा पुरावा).. एकटा वावरणारा.. गैरसमजुतीतून शिंगासाठी याची प्रचंड प्रमाणात शिकार झाली ... अत्यंत कमी संख्या या भागात राहिलीय.. राहिलीय ती केवळ वन-खात्याच्या सतर्कतेमुळे.. आपले वनखाते अत्यंत चोखपणे या राष्ट्रीय जैविक वारशाची जपणूक करतेय... त्यांच्या याच प्रयत्ननामुळे.. रायनोसोर पुन्हा आपली संख्या स्थिरावतोय....दुपारच्या उन्हात याची तुकतुकीत परंतु तेवढीच पोलादी त्वचा एखाद्या पोलादी जॅकेट प्रमाणे भासत होती..निसर्गानेच दिलेला जॅकेट...या जॅकेट वर आवर्जून नाचणारा पक्षी म्हणजे गायबगळा.. या पोलादी त्वचेवरील गोचीडी टिपून याचा उदरनिर्वाह चालतो... या विभागातून ब्रह्मपुत्रेचे अनेक उपप्रवाह वाहतात याच उपप्रवाहांच्या बाजूने आमचा प्रवास चालू होता.. गवताळ तराईतील विविध गडी पाहत.. गाडी MIGHTY ब्रम्हपुत्रेच्या पात्राजवळ पोहचली... अगदी आत्ता लिहितानाही अंगावर काटा उभा राहिला.. एव्हढा विशाल जलप्रपात.. त्यातील त्रिभुज प्रदेश.. आणि आजूबाजूला हत्ती गवताची कुरणे...त्यातून डोकावणारे हत्तीचे कळप.. उजव्या बाजूला वॉच टॉवर वरून दिसणारे बारासिंघाचे कळप.. अगदी कल्पने पालिकडील काही आहे ते इथेच आहे.. आणि या विशाल निसर्गाला माणूस ताब्यात घेऊ इच्छितो..अगदीच अशक्य…..निसर्ग तडाखा देतोच..कधी अतिवृष्टीने, कधी या विशाल जलप्रपाताच्या पुराने..या आसामधील या भागात मानवच काय परंतु निसर्ग नियम पाळणारे प्राणी देखील बळी पडतात.. आसामच काय पूर्ण या ईशान्येकडील भागाची भाग्य रेखा असणारी ब्रह्मपुत्र नद.. निसर्गाचे शिवतांडव काय असते..निसर्ग कसा परतफेड करतो.. त्यात या जंगलाचा देखील बळी जातो.. पुरात प्राणी फसतात..कितीही पोहणारा सजीव असो.. पंचमहाभूतांच्या दबावाने बळी जातातच..त्यातच सकारात्मक बाब म्हणजे या भागात कृत्रिम उंचवटे तय्यार केले गेलेत जेणे करून पूरस्थितीत प्राण्यांना आसरा घेता येतो.. पुरस्थितीत वनरक्षकांच्या नजरेत कधी कधी एकाच हायलँड वर सगळेच बिग ५ दिसतात.. वाघ, गेंडा, हत्ती, बारासिंघा, जंगली म्हशी.. अगदी हरणाचे छोटे मोठे कळप देखील संकटात निसर्ग नियम पाळून एकत्र पूर ओसरे पर्यंत आसरा घेतानाचे अनुभव येतात ..
..असे जंगलाचे विविध पैलू अनुभवत आम्ही परतीला लागलो.. एक सर्पगरुड वरून घिरट्या घालतात कदाचित आमचा निरोप घेत असावा.. आसमंत न्याहाळत असताना.. जमिनीवरील गोष्टीकडे दुर्लक्ष होते, अगदी तसाच प्रकार आमच्या एका जिप्सीबरोबर घडला.. एका गेंड्याने आमच्या एका जिप्सीचा पाठलाग सुरु केला..ड्राइवर तसा सतर्क होताच..त्यानेही तितक्याच वेगाने गाडी पुढे नेली.. गेंड्याच्या परिक्षेत्रातुन गाडी बाहेर पडली तेव्हा कुठे हा पाठलाग संपला... एका धडकेत गाडी उडविण्याची गड्याची ताकद.. उगाच कोण वाटेल जाईल.. .गाडीतील लोकांना कायम लक्षात राहणारा अनुभव.. हीच जंगलाची अनपेक्षित वृत्ती अनुभवून आम्ही बाहेर पडलो.. संध्याकाळचे साधारण ५;३० वाजता होमस्टेला परतलो..मागे सांगितल्याप्रमाणे या भागात लवकर अंधार होतो.. थोडा ब्रेक घेत आम्ही पुन्हा सांस्कृतिक केंद्राकडे वळलो.. दर संध्याकाळी येथे आसामी सांस्कृतिक नृत्ये सादर केली जातात...गर्दी खूप असते...आमचा प्रवेश काहीसा उशिराच झाला.. प्रवेश झाला तोच 'आसामी बिट्स' वाजू लागलेल्या..पुढे दोन तास आसाममधील विविध सांस्कृतिक नृत्ये सादर झाली.. प्रेक्षक हि अगदी तल्लीन होऊन त्या बिट्स मध्ये गुंग झाले.. होमस्टे ला परतून सुग्रास जेवण झाले.. आजचा दिवस तसा धावपळीचा परंतु सत्कारणी लागलेला.. निसर्गपुढे मती गुंग करणारा..थोडासा ठेक्यावर नाचवणारा ठरला.. उद्या आम्ही काझिरंग्याच्या पश्चिम भागात जाणार होतो..त्याच विचारात थकलेली गात्रे केव्हा निद्रिस्त झाली त्याचा पत्ता शरीलाला देखील नव्हता..
दिवस पाचवा २४ डिसेंबर,काझीरंगा सफारी.. एक अवलोकन..
काझीरंगा जंगल तसे दोन सफरीमध्ये बऱ्यापैकी माहीत झालेले.. तरीही काहीतरी वेगळे अनुभवयाला मिळेल म्हणून आम्ही पहाटेच 'वेस्ट झोन' मध्ये प्रवेशलो.. मावळतीचा जंगलाचा भाग पण आम्ही सूर्योदयाला पोहचलो.. ब्रह्मपुत्रेच्या पूर्वेकडून सुर्यभास्कराने आपली प्रभा संपूर्ण जंगलावर पसरली.. या सोनेरी प्रकाशात गवतावरील दवबिंदूंमुळे .. रानाचे रत्न स्नान चालू होते.. रत्नांच्या माळा विखुरल्याचा भास होत होता.. त्यातूनच आमच्या जिप्सीची मार्गक्रमणा चालू होती... परंतु आम्हाला उत्सुकता होती ती जंगलाच्या राजाची..वाघाची..तसा काझीरंगा मध्ये वाघ दिसणे अगदीच दुर्मीळ... राजाच तो.. तरीही आम्ही एका वॉचटॉवर वरून धुक्यात शोधण्याचा उगाचच प्रयत्न केला.. गडद धुक्यात रानवाट हरवलेली, पलीकडे ब्रम्हपुत्रेचा उपप्रवाह... हत्तीगवताच्या आधाराने अगदी शेकडो तृणभक्षी पलीकडे चरताना दिसत होते.. काही दृश्य काही अदृश्य धुक्याच्या दुलईत हा खेळ रंगला होता ... जागोजागी गेंडा स्वागत करतच होता परंतु जंगली हत्तीचे कळप आपली विशेष उपस्थिती दाखवत होते..तसा हा शांत प्राणी परंतु मानवाची दखल बिलकुल चालत नाही.. एक कुटुंबवत्सल कळप समोरून जात असताना.. अरण्यऋषीं मारुती चितमपल्लीनी नोंदवलेली गोष्ट पटकन आठवली.. येथेच कुठेतरी ब्रम्हपुत्रच्या पात्रात हत्ती डोह म्हणून आहे.. जिथे एखादा वृद्ध हत्ती, जर त्याला कळपा बरोबर मार्गक्रमण जमत नसेल तर तो त्या खोल पात्रात उभा राहतो आणि आपला देह सोडून देतो.. आत्मसमर्पण करून पंचमहाभूतात विलीन होतो.. (दोन वर्षापूर्वी केरळच्या हत्तींणी बरोबर झालेली बातमी तुम्हाला आठवली तर या गोष्टीचा नक्की संदर्भ लागेल).. एखाद्या योग्याचे जीवन जगणारा हा महाकाय विशाल जीव देखील आपल्या पुढच्या पिढीचा कित्ती विचार करतो..याच विचारात जिप्सी पुढे सरकत होती..सूर्य थोडा वर आला होता.. जागोजागी तृणभक्षींचे कळप अगदी शाळा भरल्यासारखे शांत बसून होते... कळपाचा म्होरक्या मध्ये आणि सभोवार त्याची मंडळी.. बारासिंघा, हॉग डिअर या सुंदर वातावरणाचा आस्वाद घेत होते..बाहेर पडता पडता आम्हाला सूर्यस्नाननं घेत असलेला नागराज(किंग कोब्रा ) आढळला.. अगदी रस्त्याच्या बाजूला पहुडला होता.. कदाचित त्याला आमच्या असण्याने फार फरक पडत नसावा.. वा कदाचित तो जखमी असावा.. कधीतरी केव्हातरी छायाचित्रातच पाहिलेला नागराज आज प्रत्यक्ष समोर.. किमान १० फूट तरी असावा.. नागराजाला तिथेच सोडून आम्ही परतिला लागलो... होमस्टेला येऊन ब्रेकफास्ट आणि थोडी विश्रांती घेऊन आम्ही आमच्या काझीरंगा मधील दुपारच्या अखेरच्या सफारीला निघणार होतो...
आताची आमची सफारी काझीरंगाच्या पूर्व विभागात असणार होती भारताच्या अगदी पूर्वेकडच्या भागाची असणारी आमची दुपारची सफारी वाटेत भोजन घेऊन सुरुवात झाली... हा पूर्वेकडील गेट तसा आमच्या होमस्टेपासून २० किमी लांब त्यामुळे थोडे लवकर निघून गेट वर पोहोचलो... या गेटवर आमचे आसामचे स्नेही श्री देबेश्वर पेंगू यांची पूर्वनियोजित भेट घडली. देबेश्वर यांचे गाव अगदी जंगलाला लागून... लहानपणापासून जंगलाच्या सानिध्यात वावरलेला हा अवलिया.. हत्तीची भाषा जाणतो..जंगली हत्तींशी संवाद साधतो... याची दखल घेऊन डिस्कव्हरी चॅनेलने यावर सुंदर डाक्युमेंट्रीदेखील बनवली आहे.. आत्ता हा अवलिया याच जंगलात निसर्ग मार्गदर्शकाचे काम करतो.. या अवलिया बरोबर सगळ्यांचे सेल्फी झाले.. एक ग्रुप फोटो गेट वर झाला आणि आम्ही आमच्या अखेरच्या सफारी साठी प्रवेशलो... हे पूर्वेकडील जंगल म्हणजे एक सुंदर रमणीय भूप्रदेश.. लँडस्केपची अगदी स्पर्धाच.. कधी नेच्यांचे जंगल अगदी नियोजित लावल्या सारखे कधी वर्षावनाची दाटी... तर कधी तराईची कुरणे.. सौंदर्याच्या गुंगीत जावे आणि हरवून जावे अगदी तसच सगळं.. जागोजागी एकशिंगी गेंडा दिसताच होता.. तसेच या भागाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे येथील 'सोनेरी बंगाली वाघ'... त्याचे दर्शन अत्यंत दुर्मिळ... त्याच्या वावराच्या खुणा जागीजागी अनुभवत होतोच... निसर्गनिर्मात्याची जबरदस्त निर्मिती सहजच थोडीच दिसणार..वाटेत परदेशी पक्ष्यांची वसाहत देखील सुखावणारी होती ..... एका उपप्रवाहावर कासवांची वसाहत पाहता आली... इवलेसे हे कूर्म खरंच आपणच जगाला पाठीवर घेऊन आहोत त्याच तोऱ्यात होते.. हे सुद्धा डायनॉसॉरच्या काळातील.. उत्क्रांतीच्या शर्यतीतीत मध्ये टिकून राहिलेले..
काझीरंगा म्हणजे खरंच रानभूल, हजारो प्राण्यांचे, पक्ष्यांचे आश्रय स्थान, सुंदर भूरचनेची स्पर्धा इथे कायम... रायनासॉर आपले दणकट अस्तित्व वनविभागाच्या सहकार्याने टिकवून वाढवणारे स्थान... हत्तींसाठी नंदनवन.. या रानात शिरतानाच तुम्हाला जंगलाच्या विविध ऑफर्स येतात अर्थात तुम्हाला त्या ऑफर्स अक्षरशः लुटता यायला हव्यात... एकदा का ती कला तुम्हाला अवगत झाली मग हे पूर्वेकडील जंगल तुम्हाला भरभरून दान देते..आणि विश्वास ठेवा हे दान अगदी आयुष्य भर पुरणारे असते.. मग हे जंगल एखाद्या कवीला कविता स्फुरविणारे असते तर एखाद्या तत्ववेत्त्याला तत्वज्ञान सुचविणारे असते.. निसर्गसंवर्धकाला प्रेरणा देणारे ठरते तर एखाद्या लेखकाला एखाद्या कथेची मांडणी सांगणारे असते..आणि आमच्या सारख्या पर्यटकांना किमान वर्षभर पुरविणारी उर्जा हे जंगल असते... हीच ऊर्जा घेऊन आम्ही परतीला लागलो. सांजकिरणे आम्हाला निरोप देत होती..तितक्यात एक गेंड्याची मादी आणि तिचे पिल्लू आम्हाला निरोप देण्याचाच आवेशात पुढ्यात आले....... कदाचित आमची पुढील पिढी देखील तुम्हा जबाबदार पर्यटकांचे स्वागत करेल... अशी ती आई म्हणत असावी... .परतीला जिप्सी अंधाराशी स्पर्धा होऊ नये म्हणून बाहेर पडण्याची घाई करत होत्या...घाईत धुरळा उडत होता... धुळीची ती वलये..अंगावर घेत...गेल्या चार-पाच दिवसातील अपेक्षित-अनपेक्षित रानभूल.... स्मृतींच्या रूपात कायम मेंदूच्या एखाद्या घडीत दडणार होती कधीही न विसरण्यासाठी...
आमचा प्रवास मानस नदीपासून चालू झालेला जी मानस सरोवराच्या उत्तरेकडून प्रवाहित होते आणि आमचा ब्रह्मपुत्रेच्या तीरावर आमचा प्रवास आजपुरता थांबणार होता जी.. मानस सरोवराच्या दक्षिणेकडून उगम पावून भारतात प्रवेशते... .... एक वर्तुळ पूर्ण झाले होते.
२५ डिसेंबरला भौतिक जगाचा परतीचा प्रवास सुरु झाला..आपलपल्या मार्गाने प्रत्येकाने परतीचा प्रवास केला...परतीला गीताईतील एका ओळीची आठवण नक्की येत होती...' घेई ओढोनि संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासवे तो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली..' भौतिकजगात प्रज्ञा स्थिरावण्यासाठी हि जंगलवारी, निसर्गवारी आवश्यक होतीच ...... कदाचित हाच विचार निर्मळ निसर्ग पाहून प्रत्येकाच्या मनात.. गेल्या ४-५ दिवसातील सफरीत कूजन घालून.... मेंदूच्या कुठल्यातरी कप्प्यात घट्ट झाला असेल...
दिनांक : २८ - २९ जानेवारी २०२३
मोहिम प्रमुख :गायत्री म्हात्रे
मोहीम कार्यवाह : गायत्री म्हात्रे
सहभागी सदस्य : २१
.....शिरपुंजे (९३५ मीटर) - भैरवगड माथा (१२५० मीटर) - घनचक्कर (१५१० मीटर) - गवळदेव माथा (१५२५ मीटर) - कुमशेत (८५० मीटर).....
सह्याद्री म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक. महाकाय, प्रचंड, राकट, दणकट, अन् काळाकभिन्न.....रामोश्यासारखा ! पण मनाने मात्र दिलदार राजा. आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य.
अशा या राकट सह्याद्रीच्या पश्चिम भारतातील डोंगर माळेतल्या सहा भैरवगडांपैकी दोन भैरवगड हरिश्चंद्र गडाच्या प्रभावळीत आहेत. हरिश्चंद्रगडावर टोलारखिंडीमार्गे येणाऱ्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी शिरपुंज्याचा भैरवगड आहे. शिरपुंजे गावाच्या मागे असलेल्या भैरवगडावरील भैरोबा हे पंचक्रोशीतल्या लोकांचे दैवत आहे. शिरपुंज्याचा भैरवगड, घनचक्कर आणि गवळदेव हे एका रांगेतले डोंगर. गवळदेव हे सहयाद्रीतले दुसऱ्या क्रमांकाचे, तर घनचक्कर हे तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे. या वाटेवर सहसा कोणी जात नाही. म्हणून शिवशौर्यने मनात आणले की या वर्षी या 'ऑफ बीट' रेंज ट्रेकची मोहीम आखून सह्याद्रीतलं अजून एक पान उलगडूया. या मोहिमेची वाट जरा अवघड आणि भुलवणारी...म्हणून सोबत वाटाड्या घ्यायच ठरलं. नेहमी हाकेला धावणारे कमळू दादा आणि संतोष दादा सोबत होते. मोहिमेची रूपरेषा ठरली आणि मुंबापुरीवरून एकूण २१ मावळ्यांची टोळी मोहीम फत्ते करण्यासाठी एकजूट झाली. २७ जानेवारीला रात्री १०.५० च्या लोकलने कसाऱ्याच्या दिशेने कूच केले. १.३० ला रात्री कसारा स्टेशनवरून जीपने शिरपुंजे गावाकडे रवाना होऊन पहाटे ४.५० ला भैरवगडाच्या पायथ्याशी पोहचलो.
मस्त हुडहुडी भरवणारी थंडी होती. जास्त वेळ जाऊ न देता, लगेच भैरवगड चढायला सुरुवात केली. स्थानिक गावकऱ्यांनी सुरुवातीला सिमेंटच्या पायऱ्या केल्या आहेत. स्थानिकांचा गडावर नेहमी राबता असतो. गडाची वाट मळलेली, नागमोडी वळणाची आाणि खड्या चढणीची आहे. अर्ध्यातासाच्या चालीनंतर कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि लोखंडी रेलिंगची वाट लागली. ही रेलिंग पार करून भैरवगडाच्या आणि शेजारच्या डोंगराच्या मधोमध असणाऱ्या खिंडीत पोहोचलो. उजवीकडे वळल्यावर पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. तिथून खाली उतरून गेल्यावर भैरोबाचे मंदीर आहे. पुढे गुहेकडे जाताना उजव्याबाजूला एक वीरगळ आहे. वीरगळीजवळ गणपतीच्या मूर्ती शेंदूर लावून ठेवलेल्या दिसतात. त्या पाहून कातळात खोदलेल्या पायऱ्या उतरून कडयाच्या टोकावर कोरलेल्या भैरोबाच्या गुहेत जाताना बाहेरच्या बाजूला एक वीरगळ आहे. गुहेत गेल्यावर उजव्या बाजूला भैरोबाची अश्वारूढ मूर्ती आहे. मूर्तीचे रंगकाम खूप सुंदर आहे. तिथे तासभर विश्रांती घेऊन चहा-नाश्ता उरकून सगळ्यांचा परिचय झाला. वाटेत कुठेच पाणी मिळणार नव्हते, म्हणून पाणी आणि सोबत मसाले भाताची शिदोरी घेऊन घनचक्करच्या दिशेने वाटचाल सुरू केली. भैरवगडाच्या खिंडीत उतरल्यावर उजव्या बाजूला लोखंडी शिडी बसवलेली आहे. घनचक्करची वाट चढ-उतराची असल्याने थोडी जोखमीची आहे. कळसुबाईच्या कुशीतील दूरदूर पसरलेल्या डोंगररांगा पाहत एका घनदाट जंगलात प्रवेश होतो आणि वेगवेगळ्या आकाराच्या विविधरंगी मनोहारी स्फटिकांचा निसर्ग आविष्कार पाहायला मिळतो. येथे स्फटिकांचा खजिनाच आहे, ज्याला आपण गारगोटी म्हणतो. पुढे १.३० च्या सुमारास जेवणं आटपून थोडी विश्रांती घेऊन पुढची वाट धरली. गवळदेवकडे जाण्यासाठी पूर्ण घनचक्कर उतरून खिंडीत येऊन दीड तासात गवळदेवच्या पायथ्याशी पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर पाठीवरचे ओझे तिथेच ठेवले व लगेच गवळदेव माथ्यावर जाण्यासाठी निघालो. गवळदेव शिखराच्या दरीच्या बाजूकडील वाट धरली, कारण शिखर जरी समोर दिसत असले, तरी संपूर्ण वेढा घालून मागच्या बाजूने माथा गाठावा लागतो. गवळदेव हे १५२५ मीटर उंचीवर असलेले महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर. उंची गाठायची तर मेहेनतही तितकीच ! वाटेत अनेक शिंदीची झाडे पार करत अखेर गवळदेवाच्या मंदिरात नमस्तक झालो. गवळदेवाचे वैशिष्ट्य म्हणजे या देवाला शेंदूर लावत नसून चुना लावतात. गवळदेव महाराष्ट्रातील कमी ज्ञात शिखर असून सर्वोच्च उंचीवर असलेले कळसुबाई नंतरचे दुसरे शिखर. भंडारदरा प्रदेश आणि आजूबाजूच्या पर्वताचे संपूर्ण विहंगम दृष्य माथ्यावरुन घडते. पाबरगड, साकीश, किरडा, सिंदोळा, अलंग-मदन-कुलंग, छोटा कुलंग, शिपनूर, रतनगड, कात्राबाई, करंटा, आजोबा, घोडीशेप, कलागड, कोंबडा, हरिश्चंद्रगड, तारामती हा सर्व परिसर आणि भंडारदरा बॅक वॉटरचे कमाल दृष्य दिसते. गवळदेव पायथ्यापासून २० मिनिटांच्या अंतरावर खाली पाणाच्या टाक्या आहेत तिथे रात्रीचा मुक्काम होता. सर्वांनी टेन्ट लावले आणि रात्रीच्या चांदण्यांनी भरलेल्या आकाशाखाली वरण-भात, मटकीची भाजी, पापड, लोणचे अशा बेताचा पोटभर आस्वाद घेतला. जेवणानंतर गप्पा रंगल्या त्या, या डोंगररांगांबद्दलची माहिती, त्याचा इतिहास याच्या. थकले असल्याने क्षणार्धात सगळे झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी सहाला उठून प्रातःविधी उरकून पोहे आणि फोडणीचा भात अशी न्याहारी झाली. सर्व उरकून ८.३० ला गवळदेव उतरायला सुरुवात केली. डाव्या हाताला विलोभनीय असं सह्याद्रीचं दृश्य आणि उजव्या हाताला कातळ अशी वाट होती. उन्हामुळे कोरड्या झालेल्या मातीवरून पाय सारखे घसरत होते. मागे मुडा पर्वत, तर समोर कात्राबाईची खिंड. डोंगर उतरताच वाटेत पाण्याचे झरे आहेत, तिथेच जेवणं उरकली आणि एक ग्रुप फोटो घेऊन परतीची वाट पकडली.
या मोहिमेसाठी निघालो होतो तेव्हा सगळे अनोळखी होतो. पण या दीड दिवसात प्रत्येकाच्या मनात एकमेकांबद्दलच्या न पुसल्या जाणाऱ्या आठवणी जमा झाल्या होत्या. शिवशौर्य परिवाराला जो एकदा जुळतो, तो कायमस्वरुपी परिवाराचा भागच होऊन जातो. पुन्हा एकदा नवीन मोहिमेत नव्या जोमाने भेटू असा विश्वास मनात ठेऊन या अविस्मरणीय मोहिमेची सांगता केली.
धन्यवाद...
🚩जय भवानी I जय शिवराय🚩
दिनांक : २५ आणि २६ फेब्रुवारी २०२३
मोहिमप्रमुख :भूषण कुलकर्णी
मोहीम कार्यवाह : श्रीनिवास कऱ्हाडकर
सहभागी सदस्य : १०
सदर मोहिमेकरता मध्य रेल्वेच्या आसनगांव स्टेशन पुर्वेस २४ फेब्रुवारी २०२३ ला रात्री ११ वाजता जमलो व ११:१५ च्या सुमारास मिनी टेंपोने माहुली गावाकडे प्रस्थान केले. रात्री त्या खुल्या टेंपोतून अवकाशातील चांदण्या न्याहळताना मजा वाटत होती. माहुली गावात ११:४० ला श्री. रघुनाथ आगिवले यांच्या घरी मुक्काम केला. २५ फेब्रुवारीला सकाळी ५:१५ ला उठुन आन्हिक उरकून चहा बिस्किटे खाऊन ऊष:काल होताच ६:३० ला माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या छोटेखानी शिव मंदिरात नमन करुन ग्रामदेवतचे दर्शन घेतले व परिक्रमेला सुरूवात केली. मोहीम कार्यवाह मात्र सामानाच्या टेंपोबरोबर येऊन संध्याकाळी मुक्कामाच्या गावी भेटणार होते.
परिक्रमेच्या पहिल्या टप्प्यात कातबाव गावाकडे जंगलातील पायवाटेने चालू लागलो. वाटेत सोनारखिंड या ठिकाणी काहीवेळ थांबलो. पुढे उतारवाट सुरू होऊन मग पुढे समतल जागेवर मार्गक्रमण होत ९ वाजता कातबाव गावाबाहेर श्री. विनेश पवार यांच्या शेतात आम्ही घरुन आणलेली न्याहारी खाल्ली व विनेश यांच्या सौ. नी बनवलेला गुळाचा चहा पीत असतानाच आमचे २ सदस्य आम्हाला येऊन सामिल झाले. आम्ही आपापल्या डब्यात पॅक लंच घेतले, पाणी भरुन व पवार दांपत्याचा निरोप घेऊन ११ वाजता नंदकेश्वर (नांदियापानी) ला रवाना झालो. बहुतांश वाट वजीर खिंडीपर्यंत चढावाची होती. यादरम्यान एका सदस्याला पायात क्रॅंप येत असल्याने त्यांना आधार देत देत नंदकेश्वरला १:३० वाजता पोहोचलो. येथे श्रीशंकराचे मंदिर असुन लगतच श्रीविठ्ठल, दत्त व अन्य संतांच्याही मुर्ती आहेत. परिसर पवित्र व रमणीय आहे. पॅकलंचमध्ये असलेल्या तांदळाची भाकरी व कडधान्याच्या रस्साभाजीवर आडवा हात मारून नंतर दुपारची उन्हे कमी होईपर्यंत आराम केला. नंतर पाणी भरुन ३:१५ ला खोर गावाकडे प्रयाण केले. वाटेत काही ठिकाणी मागे लागून गेलेल्या वणव्यामुळे आमच्या पायलट ट्रेकवेळी बांधलेल्या खुणेच्या रिबीनी स्वाहा झाल्या होत्या. त्यामुळे वाट शोधताना त्रेधातिरपिट उडाली पण अनुभव व स्मरणशक्तीला ताण देत आमची गाडी जास्त भरकटु न देता खोर गावात सायंकाळी ५:३० ला पोहोचलो, हा टप्पा बहुतांश उतार व काही ठिकाणी समतल होता. खोर गावी श्री. दशरथ भगत यांच्या घरी आम्ही उतरलो, चहापान होऊन अंगणात खुर्च्या टाकून आमची मैफिल सुरू झाली. रात्री जेवणानंतर श्री. भूषण कुलकर्णी यांच्या लग्नाचा १६वा वाढदिवस उपस्थित सदस्यांनी केक कापून त्यांच्या सौ. शिवाय जरी साजरा केला तरी त्यांनाही व्हॉट्सऍप्प व्हिडिओ कॉलद्वारे या कार्यक्रमात सहभागी केले गेले. दशरथ व कुटुंबियही या आनंदात सामील झाले. रात्री गावात शतपावली केली व मग घरी येऊन झोपी गेलो. सकाळी ५:३० ला उठून फ्रेश होऊन चहापान आटपले व नाश्ता डब्यात भरला.
सकाळी ७:२०ला आम्ही परिक्रमामार्गाने जंगलवाटेने माहुलीसाठी रवाना झालो, दशरथ भगत हे आम्हाला गावाबाहेर सोडण्यास आले होते. आजची वाट कालपेक्षा अधिक घनदाट होती. वाटेत एका ठिकाणी लागलेला वणवा आम्ही विझवला. पुढे पपईचे पाणी याठिकाणी ९:३० ला न्याहारी केली व लगेच निघालो. वाटेत जमिनीलगत एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर चढलेल्या जाडजूड व झोपाळ्याप्रमाणे भासणाऱ्या वेलींवर बसून फोटोसेशन केले व छोटे-छोटे ब्रेक घेत नागीरखिंड पार करुन १२:१५ ला माहुली गावात रघुनाथदादांच्या घरी पोहोचलो व जेवण करून लगेच सामानाच्या टेंपोने आम्ही २ वाजता आसनगांव स्टेशनला पोहोचलो. अशारितीने शिवशौर्य ट्रेकर्सची पहिलीच अशी ३८ किलोमीटरची किल्ले माहुली परिक्रमा रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी यशस्वीरित्या पूर्ण झाली.
दिनांक : ५ मार्च २०२३
मोहिमप्रमुख :आदिती कातकर
मोहीम कार्यवाह : नम्रता सावंत
सहभागी सदस्य : ५४
महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पहिल्या दोन ट्रेकला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे शिवशौर्यने यावेळेला महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखराला गवसणी घालण्याचा घाट घातला. आमचा ही उत्साह वाढला होता. मोहिमेची घोषणा झाल्यावर लगेचच नोंदणीसाठी फोन येऊ लागले. बघता बघता ६२ जणींची नोंदणी झाली. काही जणी कमी होत होत्या, शेवटी ५४ जणी उरल्या. ह्या सर्वांचा WhatsApp Group बनवून त्यांच्यापर्यंत आवश्यक सुचना पोहोचवणे, त्यांची माहिती गोळा करणे हे सर्व चालू झाले.
ह्यावर्षी महिला दिन हा बुधवारी येत असल्याने सर्वांना सोयीचा होईल असा रविवार म्हणजेच ५ मार्च २०२३ हा दिवस ट्रेकसाठी निश्चित करण्यात आला. सर्व गोष्टींची व्यवस्था होईपर्यंत शेवटी तो दिवस उजाडला. ह्यावर्षी महाराष्ट्रातील सर्वात ऊंच "शिखर कळसुबाई" येथे महिला दिन साजरा करायचा ठरला. ४ मार्च ला खाजगी बसने रात्री "शिखर कळसुबाई" ला जाण्याचे ठरले. ९.३० ला आम्ही कळसुबाईसाठी रवाना झालो. कृतुजा पेडणेकर यांचा वाढदिवस गाडीत केक कापुन साजरा केला गेला. वाटेत इतर सख्यांना घेऊन पहाटे ४.०० वाजता पायथ्याच्या बारी गावात पोहोचलो. सकाळचे सोपस्कार उरकून अंधारात कळसुबाई शिखराकडे कुच केली. कळसूबाईचा डोंगर चढायला सुरुवात केल्यावर पहिल्या टप्प्यावर कळसूबाईचे नविन मंदिर लागते. ज्या लोकांना शिखरावर जाणे शक्य नाही, त्यांच्या सोईसाठी हे मंदिर बांधलेले आहे. पुढे दुसरी शिडी पार केल्यावर कातळात दोन पावले कोरलेली आहेत, ती कळसूबाईची पावले आहेत अशी श्रध्दा आहे. अंगावर येणारा चढ असल्यामुळे लगेच दमछाक होत होती पण गार वार्यामुळे खुप छान वाटत होतं. कळसुबाई शिखराला शिड्या लावलेल्या आहेत, तेथे असलेल्या दिव्यांमुळे किती चालायचं आहे याचा अंदाज येत होता. बर्याच जणींचा हा पहिलाच ट्रेक असल्यामुळे धापा टाकत हळुहळू मार्गक्रमण होत होतं. चालत असताना बर्याच जणींचे मोबाईलमधील गजर वाजू लागले. त्या गजराबरोबर प्रत्येकीला आपापल्या घरातील कामांची आठवण होऊन एकमेकींसोबत चर्चा चालु झाल्या. स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही गेली कितीही तिने कामाच्या रामरगाड्यातून उसंत घेतली तरी डोक्यातून घरची कामे काही दूर होत नाहीत.
आता वेध लागले होते सुर्योदयाचे. उगवणार्या त्या भास्कराला आपल्या कॅमेरात टिपण्यासाठी चालायचा वेग आपोआप वाढला. पहिला झेंड्यासोबतच्या सख्या सकाळी ७.३० ला मंदिराजवळ पोहोचल्या. वरुन दिसणारे डोळ्याचे पारणे फेडणारे विहंगम दृश्य पाहुन इतकं चालुन आलेला थकवा क्षणात पळून गेला. जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी स्त्री किती संसारी असते पाहा ना. ट्रेकसाठी बॅटरी आणली नसेल पण देवीची ओटी भरण्याकरता खण नारळ सगळ्या घेऊन आल्या होत्या. सुख, समृद्धी, आनंद, प्रेम घरात नांदू दे, हे मागणं त्या कळसुआईकडे या रणरागिणी मागत होत्या. सगळ्या जणी आल्यावर देवीची प्रार्थना केली व ग्रुप फोटो काढला. खाली भंडारदर्याचा अथांग पसरलेला जलाशय लक्ष वेधून घेतो. शिखरावरून उत्तरेला रामसेज, अचला, अहिवंत, सप्तश्रुंग, मार्कंडा, धोडप, रवळया जवळया, कोळधेर अशी डोंगररांग नजरेस पडते. पूर्वेकडे औंढा, विश्रामगड, अलंग, मदन, कुलंग, माथेरान, हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात.
महाराष्ट्रातल्या सर्वोच्च असे सह्यशिखर सर केल्याने प्रत्येकीला काहीतरी मिळवल्याचं समाधान होतं. खाली असलेल्या विहीरीवरती जाऊन थंड पाण्याने तोंड धुतलं. भरभर चढलेली वाट आता उतरताना घाबरवणारी होती कारण आता शिड्यांजवळ वाट आपल्या पुर्वजांनी म्हणजेच माकडांनी अडवली होती. ही माकडं इतकी धीट झाली आहेत की तुमच्या पाठीवरच्या बॅगांवर उडी मारुन ती उघडतात व आत असलेला खाऊ लंपास करतात. पर्यटकांनी दिलेल्या खाण्याला ही माकड इतकी सोकावली आहेत की तुम्ही नाही दिलात तर दात विचकवून तुम्हाला घाबरवून हातातून खाणं पळवतील. असं आयतं खायला मिळत असल्यामुळे त्यांचं नैसर्गिक खाणं बंद झालय व त्यांच्या आरोग्यासाठी घातक असलेले पदार्थ ही माकडं सर्रास खाऊ लागली आहेत. दुपारी ११ वाजता खाली उतरायला घेतलं. पायथ्याशी कळसुबाई मित्र मंडळाने महिला दिनानिमित्त सर्व ट्रेकर महिलांचा सत्कार करायचा ठरवला होता त्यामुळे सगळ्याजणी भरभर पाय उचलत होत्या. पहिली बॅच साधारण १ वाजता पायथ्याशी पोहोचली. लगेच फ्रेश होऊन खाली असलेल्या हनुमान मंदिरात गेलो. तिथे मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आमची वाट पाहत थांबले होते. आम्ही आल्याबरोबर कार्यक्रमाला सुरुवात झाली. मान्यवरांची भाषणं झाली त्यात राम खुर्दळांसारखे अनुभवी वक्ते होते, अंजनाजी प्रधान दिव्यांग महिला गिर्यारोहक आणि किलीमांजारो सर केलेले गिर्यारोहक सागर बोडके उपस्थित होते. सगळ्या महिला ट्रेकर्सना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला गेला. शिवशौर्यतर्फे मान्यवरांना शाल श्रीफळ देऊन आभार व्यक्त केले. इतकं चालुन आल्यावर सगळ्यांना सपाटून भुक लागली होती. गावच्या रुचकर अशा जेवणावर प्रत्येकीने आडवा हात मारला. शिवशौर्यतर्फे सहभागी महिला सदस्यांना सर्टिफिकेट देण्यात आले. आता सगळ्याचजणींना घरचे वेध लागले होते. दुखरे पाय व गोड आठवणी सोबत घेऊन सर्व रणरागिणी संध्याकाळी ५ वाजता बसने मुंबईकडे रवाना झाल्या.