लातूर जिल्ह्यातील उदगीर शहराला प्राचीन इतिहास आहे. या जिल्ह्यात उदगीर व औसा हे दोन सुंदर भूईकोट किल्ले आहेत. भूईकोट किल्ल्यांची सर्व वैशिष्ट्ये या किल्ल्यांमध्ये पहायला मिळतात. बालघाटाच्या डोंगर रांगेत वसलेल्या उदगीरचे प्राचीन नाव "उदयगिरी" होते. सदाशिवराव (भाऊ) पेशव्यांनी निजामा विरुध्दची लढाई उदगीर जवळ झालेली लढाई जिंकल्यामूळे हा किल्ला सर्वांना परीचित आहे.
औसा किल्ल्याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यात आढळणारे मोर.
इसवीसनाचा चौथ्या शतकात काकतीय घराण्याने कंधार किल्ल्याची निर्मिती केली आणि त्याला आपली राजधानी बनवले. राष्ट्रकुटांच्या काळात कंधार किल्ला कृष्णदुर्ग या नावाने ओळखला जात असे.
नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुदुर्गांमधील सर्वात मोठा किल्ला आहे. या किल्ल्याची तटबंदी जवळ जवळ ३ किमी लांब आहे. या तटबंदी मध्ये ११४ बुरुज आहेत.
सोलापूरचा भुईकोट बहामनी राज्याचा प्रधान महमूद गवान याने साम्राज्य विस्तारासाठी (शके / इ.स.) १४६३ च्या सुमारास बांधला.
|
|
|
|
|
१२ सप्टेंबर २०२५ | शुक्रवार रात्रौ छ.शि.म.ट. वरून ९ वाजता सुटणाऱ्या सीएमएसिटी बिदर एक्सप्रेस (22143) ट्रेन पकडून दुसऱ्या दिवशी सकाळी ७.३५ पर्यंत उदगीर स्टेशन येथे जमणे. ट्रेन मध्ये किंवा स्टेशनवर फ्रेश होऊन व नाश्ता करून सगळ्यांची ओळख परेड होईल. |
|
|
|
१४ सप्टेंबर २०२५ | सकाळी ८.३० वाजता किल्ले उदगीर येथे खाजगी बसने आगमन. दोन तासांत गडदर्शन आटोपून आपला प्रवास सूरू होईल किल्ले कंधार कडे. साधारण ११.३० पर्यंत आपण किल्ले कंधारला पोहोचून गडदर्शन करू. साधारण १ वाजेपर्यंत जेवण करून किल्ले औसा कडे प्रयाण. साधारण ४ वाजेपर्यंत आपण किल्ले औसाला पोहोचून गड भ्रमंती करणे. स्वच्छ, शांत आणि मनाला छान वाटेल अशा निसर्गरम्य ठिकाणी रात्रीच्या जेवणाचा आस्वाद घेऊन आराम करणे. |
|
|
|
|
महत्त्वाची सूचना
१. आपण पाहणार आहोत ते सर्व किल्ले शासनाच्या ताब्यात असल्यामुळे किल्ले बघण्याची वेळ ही सकाळी ९ ते संध्याकाळी ५ आहे. वेळेअभावी वरील किल्ले दर्शन कार्यक्रमात बदल होऊ शकतो.
२. दिनांक १४ सप्टेंबर रोजी रात्रीचे जेवण वैयक्तिक करायचे आहे.
३. दिनांक १३ सप्टेंबर चा नाष्टा वैयक्तिक घेऊन यायचा आहे.
४. दिनांक १३ सप्टेंबर रोजी सकाळी चहा संस्थेकडून मिळेल.
५. मुबंई ते उदगीर आणि सोलापुर ते मुंबई पर्यंत ट्रेनचा प्रवास वैयक्तिक करायचा आहे.
(१२ सप्टेंबर- सीएमएसिटी बिदर एक्सप्रेस (२२१४३) रात्री ८ वाजता मुबंईवरून उदगीरला पोचण्यासाठी आणि १४ सप्टेंबरला सिद्धेश्वर एक्सप्रेस (१२११६) रात्री १०.३० वाजता सोलापुर वरून मुबंईकरता)
६. जास्तीचे सामान बरोबर घेवून चालू नये, गड फिरताना आपल्याला त्रास होवू शकतो.
ट्रेक फी : - संपूर्ण खर्च रु.२,४०० (रुपये दोन हजार चारशे फक्त) प्रती व्यक्ती (उदगीर ते सोलापुर प्रवास, राहणे, नाश्ता व जेवण अंतर्भूत किल्ले प्रवेश फी.)
आजीव सदस्यांना ट्रेक फी :- रु.२,३०० असेल (संस्थेचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक आहे).
मोहिमेत सदस्य संख्या (कमीत कमी ३० जास्तीत जास्त ४७) मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. त्यामुळे रेल्वे बुकिंग साठी तुम्हालाच सोपे जाईल.
नाव नोंदणीची अंतिम तारीख १ सप्टेंबर २०२५ असेल. मोहीमेत जागा शिल्लक असल्यास १ सप्टेंबर २०२५ नंतर ट्रेक फी : रु. २५००/- असेल.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ छोटी सॅक. एक मोठी सॅक/बॅग जी बसमध्ये राहील. सामान कमीत कमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) बूट किंवा चप्पल, जरुरी पुरते कपडे,अंथरूण, पांघरूण, स्लीपिंग बॅग, ऊन पावसापासून संरक्षणासाठी टोपी.
३) ताट, वाटी/कप, चमचा.
४) साबण, दंतमंजन/पेस्ट, टूथ ब्रश इत्यादी.अंग पुसण्यासाठी पंचा (टॉवेल)
५) पाण्याची २ लिटर बाटली.
६) स्वतः पुरता सुका खाऊ.
७) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अतिआवश्यक.
८) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरणे जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.
आपण आपली ट्रेक फी पुढील बँकेत भरू शकता.
Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल..
नाव नोंदणी झाल्यावर "मराठवाडा मोहीम २०२५" या WhatsApp ग्रुपमध्ये ट्रेकच्या १० दिवस आधी समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल, जन्मदिनांक आणि स्वतःचा फोटो अनिकेत भुजबळ 8898180211 किंवा श्रीनिवास कऱ्हाडकर 9820324647 या क्रमांकावर WhatsApp करावे. पैसे भरल्यानंतरच तुमच्या नावाची ट्रेकसाठी नावनोंदणी होईल.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे व कार्यकारिणीचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपातकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास १ सप्टेंबर २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल(तुमच्या बदली दुसरा मिळाला तर) १ सप्टेंबर २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.
९) जंगलातून ट्रेक करताना कुठेही मोठा कॅमेरा वापरायचा असल्यास त्याचे शुल्क ज्याचे त्याने भरावे.
वरील सर्व नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र -
मोहीम प्रमुख - अनिकेत भुजबळ / 88981 80211
मोहीम कार्यवाह - श्रीनिवास कऱ्हाडकर / 9820324647
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
शिवशौर्य ट्रेकर्स –मुंबई/९३२०७५५५३९
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली - श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
वांद्रे - नम्रता सावंत / ९६१९७ ४५९७५
वसई –हार्दिक म्हात्रे/९०४९० १३६७७
खारघर - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
मुंबई - अजित नर / ९८१९५६६१२०
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
https://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers
|
|