केवढं आपलं दुर्दैव ! सिद्दी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्याच्या कामगिरीत आपण त्या पालखीचे भोई होऊ शकलो नाही ! 'लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जिवंत राहिला पाहिजे' ही जाणीव आजही आपल्याला आहे. पण तो पोशिंदाही आज जिवंत नाही आणि कृतज्ञतेची ही अजरामर ज्योत तेवणारे ते नरवीर शिवाकाशिद आणि बाजीप्रभू सुद्धा ! म्हणूनच आज ३६५ वर्षानंतर तोच इतिहास पुन्हा जिवंत करुया !
शिवा काशिदांची पालखी स्वराज्यासाठी मृत्यूला सामोरी गेली, बाजी प्रभूंनी शिवरायांची पालखी विशाळगडी पोहोचत नाही तोपर्यंत शत्रूला पुढे सरकू दिले नाही. या दोन्ही पालख्यांमुळे छत्रपती शिवाजी महाराज मृत्युंजय ठरले. पर्यायाने हिंदवी स्वराज्य मृत्युंजय ठरले. म्हणूनच आपण घेऊन जात असलेली पालखी ही ''शिवमृत्युंजय पालखी'' आहे.
महाराज रात्रीच्या ज्या प्रहरी आपल्या अत्यंत विश्वासू व निवडक ६०० धारकऱ्यांसोबत निघाले तसेच आणि त्याचवेळी रात्रौ १० वाजता, आपणही मोठ्या संख्येने रात्रीच्या भयाण काळोखाला न घाबरता, पावसाचे वार अंगावर झेलत, वाटेत आडवी येणारी झाडं-झुडपं, नदी-नाले, ओढे यांना पार करत ''शिवमृत्युंजय पालखी'' सुखरूप पावनखिंडीकडे नेऊया.
३६५ वर्षांपूर्वी नरवीर शिवाकाशिद, बाजीप्रभू आणि त्यांच्या ६०० बांदल वीरांनी स्वामीनिष्ठा, स्वराज्य निष्ठेचे अनोखे दर्शन घडवून इतिहास घडवला. आपण इतिहास घडवायला नाही, तर तो जिवंत करायला चाललो आहोत. नतमस्तक होऊया त्या पावनखिंडीत, जिथे आपल्या पूर्वजांनी स्वराज्यासाठी रक्त सांडले आहे.
ही पालखी आहे आपल्या आराध्य देवाची, ही पालखी आहे शौर्याला आणि निःस्वार्थ बलिदानाला वंदन करणारी. तेव्हा चला, त्या पावन, पवित्र ''शिवमृत्युंजय पालखी''चे भोई होऊया !
|
|
|
|
|
गुरुवार दि. १० जुलै २०२५ | * सकाळी ८:०० पन्हाळगड येथील मोरोपंत पिंगळे नगरपालिका हॉल येथे रिपोर्टींग
* सकाळी ९:०० चहा नाश्ता
* सकाळी १०:०० स्थानिक जाणकारा सोबत पावनगड - शिव काशीद समाधी सह पन्हाळगडाचे इत्यंभुत दर्शन
* दुपारी १:३० वाजता जेवण
* जेवणानंतर विश्रांती
* दुपारी ४:०० वाजता चहा
* दुपारी ४:३० वाजता पालखी मोहिमे बाबत मार्गदर्शन (रात्र - मध्य रात्र - सकाळ अश्या तीन गटात सहभागी सदस्यांची विभागणी एकंदरीत ट्रेकचा अनुभव, वय, शारीरिक क्षमता या निकषांवर गट विभागणी)
* सहभागी सदस्यांच्या शंकांचे निरसन
* सायंकाळी ६:३० वाजता दुसऱ्या दिवशीचा पॅक नाश्ता वाटप
* सायंकाळी ७:०० वाजता सामान पॅकिंग आणि तयारीसाठी वेळ
* रात्रौ ८:०० वाजता जेवण
* रात्रौ ९:०० वाजता संभाजी मंदिरातून पालखीचे प्रस्थान
* रात्रौ ९:०० वाजता नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून "ऐतिहासिक शिव मृत्युंजय पालखी" पदभ्रमण मोहिमेला" सुरुवात.
* रात्रौ १०:०० वाजता राजदिंडी मार्गे गड उतार...
* रात्रीच्या पहिल्या गटाचे भोई काळोख्या रात्री, दाट धुक्यातून, चिखल तुडवत, दगड धोंड्यावर ठेचकाळत परंतु पालखीचे सुखरूप मार्गक्रमण सुरु !!! |
|
|
|
शुक्रवार दि. ११ जुलै २०२५ | * मध्य रात्री २:०० वाजता खोतवाडीत तयार असलेले "मध्य रात्रीचे भोई" यांचे पालखी घेऊन मार्गक्रमण सुरु
* सकाळी ७:०० वाजता माळेवाडीत तयार असलेले "सकाळ गटाचे भोई" यांचे पालखी घेऊन मार्गक्रमण सुरु
* दुपारी १२:०० वाजता मालाईवाडा येथे सर्व सहभागी पालखीचे भोई एकत्र येऊन दुपारचे जेवण
* दुपारी २:०० वाजता पावनखिंडीत "ऐतिहासिक शिव मृत्युंजय पालखीचे" आगमन, पावनखिंडीच्या इतिहासाचे अवलोकन, बाजीप्रभू, फुलाजीप्रभू आणि इतर ज्ञात-अज्ञात ६०० बांदल वीरांना अभिवादन आणि सर्व सहभागी सदस्यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून "ऐतिहासिक शिव मृत्युंजय पालखी" मोहिमेची सांगता.
* सायंकाळी ४:०० वाजता भाततळी गावात फ्रेश होऊन चहा अल्पोपहार करून एकमेकांचा निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात. |
|
|
|
मोहिमेत सहभागी होण्यासाठी..... | सदर मोहीम एका दैदिप्यमान इतिहासाला वंदन करण्यासाठी शिवशौर्य ट्रेकर्स संस्थेने आयोजलेली मोहीम आहे, या मोहिमेला सहल समजून गैरवर्तन आणि व्यसन करण्यासाठी या मोहीमेत सहभागी होऊ नये हि विनंती. नांव नोंदणी करण्याच्या आधी संपूर्ण मोहिमेचा कार्यव्रत्र्म तपशील आवर्जून वाचावा जेणेकरून आपल्याला मोहिमेत होणारी गैरसोय, त्रास वाचेल आणि निराशा होणार नाही. मोहिमेस इच्छुक असणाऱ्या सदस्यांना "शिवमृत्युंजय पालखी मोहीम" व्हाट्सअप ग्रुप मध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुप वर मोहिमे संबंधी सर्व माहिती, आवश्यक सामानाबाबत मार्गदर्शन करण्यात येईल तसेच आपल्या शंकाचे निरसन सुद्धा करण्यात येईल. |
|
|
ट्रेक फी : - रु. २,०००/- (रुपये दोन हजार फक्त) (फक्त मोहिमेचा खर्च - पन्हाळगड ते पावनखिंड दरम्यान राहणे, प्रवास भाडे, चहा-नाश्ता, जेवण, तज्ञांचे मार्गदर्शन खर्च अंतर्भुत).
आजीव सदस्यांना ट्रेक फी :- रु. १,९००/- (रुपये एक हजार नऊशे फक्त) असेल.
(मोहिमेतील कोणत्याही १५ वर्षाखालील दोन विद्यार्थीनींना शिवशौर्य ट्रेकर्स तर्फे २५% सवलत असेल).
(मुंबई, पुणे, नाशिक येथून वाहन व्यवस्थेची सोय करण्यास मदत केली जाईल. त्या वाहन व्यवस्थेची रक्कम वेगळी असेल. अन्यथा पन्हाळगडावर थेट रिपोर्टींग करु शकता).
नाव नोंदणीची अंतिम तारीख २५ जून २०२५ असेल, नंतर मोहिमेत जर जागा उपलब्ध असेल तर मोहिमेचे शुल्क रु. २,१००/- असेल (रुपये दोन हजार शंभर फक्त).
आपण आपली ट्रेक फी पुढील बँकेत भरू शकता.
Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता Whatsapp करावी.
शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल.
नाव नोंदणी झाल्यावर "पन्हाळगड ते पावनखिंड मोहीम" या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी १ मोठी सॅक (टेम्पो मधून मुक्कामाकडे जाणार) आणि १ छोटी सॅक (लंच बॉक्स, पाणी, एक्स्ट्रा चप्पल घेऊन ट्रेक वाटेवर घेऊन चालणे), सामान कमीत कमी आणावे. जरुरी पुरते कपडे, गरज असल्यास चालताना काठी.
२) चांगल्या प्रतीचे ट्रेकिंग बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, रेनकोट, जरुरी पुरते कपडे (कपड्यांचे फक्त २ सेट), टूथब्रश टूथ पेस्ट, साबण, टॉवेल.
३) जेवणासाठी ताट, वाटी, पेला, चमचा, पाण्याची १ लिटर बाटली, टिफिन बॉक्स (Pack Lunch घेण्यासाठी). स्वतः पुरता सुका खाऊ.
४) अंथरुण, पांघरुण, स्वतःच्या आकाराची प्लास्टिक शीट (ओल्या जमिनीवर अंथरण्यासाठी), टॉर्च, कॅमेरा.
५) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेकट्रोल पाकीट अतिआवश्यक.
६) वरील सर्व सामान छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या सर्व पिशव्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून पावसात सॅकच्या आतील कपडे सुके राहतील.
टिप :-
सदर मोहीम शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मार्गावरून मार्गक्रमण करत असल्याने मोहिमेत कसल्याही प्रकारचे व्यसन, गैर बोलू अथवा गैर वागू दिले जाणार नाही, ह्याची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी. आपली मोहीम ही मौज मजेसाठी निघालेली सहल नसून शिवप्रेमींची ही "पंढरीची वारीच" आहे. निसर्गवेड्या माणसाला स्वतःचा विसर पडावा अशी निसर्गाची विविध रुपे अनुभवायला मिळणार आहेत. अनेक आयुर्वेदिक पाना-फुलातून, मूळ-खोडातून खळखळ वाहणारे पाणी अमृताहून सरस आहे. शहरातील रस्त्यांच्या दुभाजकावर स्वतःला सावरत चालताना होणारा त्रास इथे शेताच्या बांधावरून चालताना होणार नाही. ओढयातून चालताना पडल्यावर आपल्या नावाने "गणपती बाप्पा मोरयाची" आरोळी पुढील काही दिवस आपल्या कानात घूमत राहतेच पण अनेक वर्ष ट्रेकच्या आठवणींचा हिस्सा होते.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची रिसीट न विसरता WhatsApp करावी.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. सदर कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास त्याचे सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही
६) नाव रद्द करायचे झाल्यास २५ जून २०२५ पूर्वी रद्द करून भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २५ जून २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास मोहीम शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाहीत.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
८) स्वतःच्या सामानाची जबाबदारी तुमची स्वतःची राहील.
वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र -
पालखी प्रमुख - श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
मुंबई - शिवशौर्य ट्रेकर्स / ९३२०७ ५५५३९
मुंबई - अमित मेंगळे / ९८६९१ ०९९७०
मुंबई - गुरुनाथ मयेकर / ९८६९० ८४९१२
मुंबई - शार्दुल खरपुडे / ९९६७४ ९३५३२
वांद्रे - नम्रता सावंत / ८८५०४ १२८१७
खारघर - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
डोंबिवली - प्रथमेश म्हात्रे / ९९३०४ ५११७८
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
पुणे - स्वप्निल चव्हाण / ७७९८३ ९६६६४
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
https://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers
|
|