| जालन्याची लढाई जिंकून रायगडाकडे जात असताना मुघलांनी राजांची वाट अडवली. तेव्हा बहिर्जी नाईक यांच्या चातुर्याने मुघलांच्या हातावर तुरी देत महाराजांनी पट्टा किल्ला गाठला. किल्ल्यावरील नैसर्गिक वातावरण आणि हवामान महाराजांना आल्हाददायक वाटल्याने तब्बल ३५ दिवस महाराजांनी तेथे वास्तव्य केले. क्षीण घालवणारा किल्ला म्हणून महाराजांनी पट्टा किल्ल्याचे “विश्रामगड” असे नामकरण केले.
चला तर मग मोहीम आखूया, छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि ऐतिहासिक वैभव अनुभवलेल्या दुर्गाची.
|
|
|
|
|
शनिवारी ०२ ऑगस्ट २०२५ | रोजी प्रभादेवी / परळ पश्चिमेकडून (एल्फिस्टन Flyover) येथून रात्रौ ११ वाजता खाजगी बसने पट्टावाडी गावाकडे मार्गस्थ. |
|
|
|
रविवारी ०३ ऑगस्ट २०२५ | रोजी सकाळी पट्टावाडी गावात आगमन, सकाळचे विधी आटपून तयार होणे. चहा-नाश्ता, उपस्थितांची ओळख करून साधारण ७:०० वाजता किल्ल्याकडे मार्गस्थ होणे, साधारण २ तासात गडाच्या माथ्यावर पोहोचणे. दुर्ग भ्रमंती करून गड उतरण्यास सुरुवात. गावात आगमन झाल्यावर थोड्या विश्रांतीनंतर दुपारचे जेवण करून मुंबईच्या दिशेने रवाना. |
|
|
|
|
ट्रेक फी : - संपूर्ण खर्च रुपये १,१००/- (रुपये अकराशे फक्त) प्रती व्यक्ती (मुंबई ते मुंबई प्रवास, चहा-नाश्ता, जेवण अंतर्भूत).
आजीव सदस्यांना ट्रेक फी : रुपये १,०००/- (रुपये एक हजार फक्त) असेल.
मोहिमेत सदस्य संख्या ३५ इतकीच मर्यादित असल्याने लवकरात लवकर आपली नावे पूर्ण ट्रेक फी भरून नोंदविणे. ट्रेक फी भरलेल्या क्रमानुसार सदस्यांना बसमध्ये आसन क्रमांकांसाठी प्राधान्य दिले जाईल याची नोंद घ्यावी
नाव नोंदणीची अंतिम तारीख २८ जुलै २०२५ असेल.
आपण आपली ट्रेक फी पुढील बँकेत भरू शकता.
Bank Details : - Bank of Maharashtra (Prabhadevi Branch)
A/c. No. 60134804616, IFSC Code : MAHB0000318, Branch Code : 000318
A/c. Name : SHIVASHOURYA TREKKERS
ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. शुल्क प्राप्त झाल्याचे SMS मधून लगेचच कळवले जाईल..
नाव नोंदणी झाल्यावर "किल्ले विश्रामगड" या WhatsApp ग्रुपमध्ये समाविष्ट केले जाईल. ग्रुपवर ट्रेकच्या संबंधित माहिती, Updates आणि शंकांचे / प्रश्नांचे निरसन केले जाईल.
ट्रेकसाठी आवश्यक साहित्य :-
१) दोन्ही खांद्यावर घेता येईल अशी सॅक. ट्रेक मार्गावर जरुरी पुरते सामान नेण्यासाठी छोटी सॅक. सामान कमीतकमी आणावे. गरज असल्यास चालताना काठी.
२) वन्य प्राण्यांचा वावर असल्याने परफ्यूम, बॉडी स्प्रे, भडक रंगाचे कपडे टाळावेत.
३) चांगल्या प्रतीचे बूट, मोजे, एक्स्ट्रा चप्पल, नीकॅप, रेनकोट, जरुरी पुरते कपडे.
४) पाण्याची २-३ लिटर बाटली.
५) स्वतः पुरता सुका खाऊ.
६) व्यक्तिगत औषधे जवळ बाळगावीत, Zole-F Ointment व इलेक्ट्रॉल पाकीट अति आवश्यक.
७) वरील सर्व सामान छोट्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून त्या एका मोठ्या प्लास्टिक पिशवीत भरा जेणेकरून सॅकच्या आतील कपडे व्यवस्थित राहतील.
नियम :-
१) ट्रेक फी भरल्यानंतर बँकेत फी भरल्याची पावती न विसरता WhatsApp करावी. स्वतःचे नाव, व्यवसाय, मोबाईल, रक्तगट, पूर्ण पत्ता, घरातील एकाचा मोबाईल आणि जन्मदिनांक (विजय हरचंदे) ७७३८२६५८८९ किंवा (उन्मेश खैरे) ८४५९३४१२६४ या क्रमांकावर WhatsApp करावे.
२) शिवशौर्य ट्रेकर्स सर्वच गड किल्ल्यांचे पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सदर मोहिमेत कोणत्याही प्रकारचे व्यसन करू दिले जाणार नाही.
३) 'आवश्यक साहित्य' आणावेच लागेल अन्यथा तुमचीच गैरसोय होईल.
४) मोहीम प्रमुखाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करणे बंधनकारक आहे. कार्यक्रमात काही बदल करावयाचे झाल्यास सर्व अधिकार मोहीम प्रमुखाचे असतील.
५) सदर मोहिमेत काही आपतकालीन परिस्थिती उद्भवल्यास किंवा सहभागी सदस्यास काही दुखापत झाल्यास शिवशौर्य ट्रेकर्स संस्था जबाबदार असणार नाही.
६) नाव रद्द करायचे झाल्यास २८ जुलै २०२५ पूर्वी रद्द केल्यास भरलेली पूर्ण फी परत मिळेल. २८ जुलै २०२५ नंतर नाव रद्द करायचे झाल्यास भरलेली फी कोणत्याही कारणास्तव परत केली जाणार नाही.
७) निसर्गात फिरताना कचरा, प्लास्टिक वाटेत टाकू नये.
वरील आठही नियमांची सहभागी सदस्यांनी नोंद घ्यावी.
आपले नम्र -
मोहीम प्रमुख - उन्मेश खैरे / ८४५९३४१२६४
मोहीम कार्यवाह - विजय हरचंदे / ७७३८२६५८८९
शिवशौर्य ट्रेकर्सचे इतर संपर्क :-
पुणे - स्वप्नील चव्हाण / ७७९८३ ९६६६४
नाशिक - योगेश शिरसाट / ९९७०६ २६२६९
डोंबिवली - श्रीकांत नागांवकर / ९८२०२ ३७९०५
टिटवाळा - श्रीनिवास कऱ्हाडकर / ९८२०३ २४६४७
मुंबई - अजित नर / ९८१९५६६१२०
पालघर / वसई / विरार - हार्दिक म्हात्रे / ९०४९० १३६७७
नवी मुंबई - सागर हर्षे / ९७०२८ २५९८९
शिवशौर्य ट्रेकर्स आयोजित मोहीम फोटो अल्बम लिंक
https://www.facebook.com/pg/ShivashouryaTrekkers/photos/?tab=albums
शिवशौर्य ट्रेकर्स वेबसाईट
https://www.shivashouryatrekkers.org
शिवशौर्य ट्रेकर्स इंस्टाग्राम
shivashourya_trekkers
|
|